lalita babar will appointed as deputy collector

 1. माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले.
 2. ललिता बाबर-भोसले यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला होता.
 3. या खेळात नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 4. राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत ललिता यांच्या नावाची शिफारस केली होती.
 5. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशीस मान्यता दिली.
 6. तसेच यामुळे ललिता यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे.
 7. महसूल विभागाच्या मान्यतेनंतर अंतिम नियुक्तीचा आदेश निघणार आहे.


niraj chopra has won gold medal in javelin throw

 1. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलंडमधील सावो गेम्समध्ये ८५.६९ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक पटकावले.
 2. आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन तैपेईच्या चाओ सुन चेंगचा पराभव केला. चेंगने ८२.५२ मीटरपर्यंत भालाफेक करीत रौप्य जिंकले.
 3. २३ वर्षीय चेंग हा एकमेव आशियाई खेळाडू आहे ज्याने ९० मीटरपेक्षा पुढे भालाफेक करीत विक्रम नोंदवला आहे.
 4. त्याने चीन तैपेईत गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सीटी गेम्समध्ये ९१.३६ मीटर अंतरावर भाला फेकत विक्रम नोंदवला होता.
 5. नीरजने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मे महिन्यांत दोहा येथे झालेल्या डायमंड लीग मिटिंगमध्ये त्याने ८७.४३ मीटर भालाफेकत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता.
 6. या सुवर्णपदकामुळे त्याने आशियातील विक्रमवीर चेंगला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्याचा मान पटकावला आहे.


sourabh verma has won russian open badminton title

 1. भारताचा माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेता सौरभ वर्माने जपानच्या कोकी वातानाबेला पराभूत करत रशिया ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपदपटकावले.
 2. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या कोकी वातानाबेची झुंज १९-२१, २१-१२, २१-१७ अशा ३ सेट्समध्ये मोडून काढली.
 3. दुखापतीमुळे बराच काळ ग्रस्त असलेल्या सौरभने २०१६मध्ये चायनीज तैपेई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतरचे त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे.
 4. याशिवाय सौरभने बेंगळुरूत झालेली अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन स्पर्धा जिंकून आशियाई स्पर्धेतील स्थानही निश्चित केले आहे.
 5. याच स्पर्धेच्या मिश्र दुहेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.
 6. रोहन कपूर आणि कुहू गर्ग या जोडीने मिश्र दुहेरीचे रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत रशियाचा व्लादिमिर इव्हानोव्ह आणि कोरियाची मिन क्यूंग किमने त्यांना पराभूत केले.


smruti mandhane has more half century record in womens T20

 1. इंग्लंडमधील केआयए (KIA) सुपर लीग स्पर्धेत भारताच्या स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे.
 2. वेस्टर्न स्ट्रॉम संघाकडून खेळताना स्मृतीने १८ चेंडूत अर्धशतक केले. या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्मृतीने या सामन्यात १९ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावांची खेळी केली.
 3. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या केआयएसुपर लीग स्पर्धेत खेळणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
 4. याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टर्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता.


Top