NASA  ची पहिली लघुग्रह विक्षेपण मोहीम विकसित

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशनने (NASA) भविष्यात पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार्या लघुग्रहाला पृथ्वीपासून दूर दुसर्या दिशेला वळवण्याच्या उद्देशाने ‘डबल एस्टरॉइड रीडायरेक्शन टेस्ट (DART)’ या नावाची अंतराळ मोहीम विकसित करीत आहे.

जॉन हॉपकिन्स अप्लाइड फिजीक्स लॅबोरेटरी या मोहिमेची संरचना आणि निर्मिती करीत आहे, जे पुढे त्यांच्याकडून व्यवस्थापित केले जाईल.

DART:- 

 1. DART मोहीम ही कायनेटिक इमपॅक्टर तंत्रावर आधारित आहे.
 2. या तंत्राच्या सहाय्याने लघुग्रहावर प्रहार करून त्याच्या कक्षेत बदल घडवून त्याची दिशाभूल केली जाऊ शकते.
 3. या मोहिमेची यशस्वीता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ऑक्टोबर 2022 आणि पुढे 2024 साली दोन लहान लघुग्रहांना लक्ष्य केले जाणार आहे.
 4. 'डायडीमॉस’ या "जुळ्या" लघुग्रहांची निवड करण्यात आली आहे.
 5. हे लघुग्रह म्हणजे डायडीमॉस A (आकार: सुमारे 780 मीटर) आणि डायडीमॉस B (160 मीटर).
 6. मात्र, सुरुवातीला DART फक्त डायडीमॉस B वर चाचणी घेणार.
 7. 2003 सालापासून या लघुग्रहांच्या अभ्यास चालू आहे.
 8. डायडीमॉस B चे शरीर हे खडकाळ S-प्रकारचे आहे.

DART ची कार्यप्रणाली:-

 1. DART डायडीमॉस B कडे जाऊन आणि आपल्या स्वायत्त लक्ष्यीकरण प्रणालीचा वापर करून त्याला लक्ष्य बनविणार.
 2. त्यानंतर रेफ्रिजरेटरच्या आकाराएवढे अंतराळयान बंदुकीच्या गोळीच्या नऊ पटीने वेगाने म्हणजेच सुमारे प्रती सेकंड सहा किलोमीटर या वेगाने लघुग्रहावर आदळणार.


अरब राष्ट्रांनी केला कतार बहिष्कार

 1. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या अरब राष्ट्रांनी कतारसोबत त्यांचे सर्व संबंध तोडले.
 2. या तेल संपन्न देशांनी कतारवर दहशतवादाला आर्थिक सहाय्य पुरवित असल्याचा आरोप केला आहे.
 3. आखाती राष्ट्रांमधील या संकटाच्या निवारणासाठी आणि संबंधांना पुनर्स्थापित करण्याच्या हेतूने 22 जून 2017 रोजी या राष्ट्रांनी कतारसमोर आपल्या मागण्या सादर केल्या होत्या.
 4. यात एकूण 13 मागण्या केल्या आहेत आणि सर्व मागण्या मंजूर करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला होता.
 5. मात्र शेवटच्या 3 जुलै 2017 रोजी, ही कालमर्यादा आणखी 48 तासांसाठी वाढवण्यात आली आहे.

मागण्या :-

 1. इरानबरोबरचे राजनैतिक संबंध कमी करणे आणि कतारमधील इरानची राजनैतिक मोहिम बंद करणे.
 2. ताबडतोब टर्कीचे लष्करी तळ बंद करणे आणि कतारच्या आत तुर्कीसोबतचे सहकार्य थांबवणे.
 3. सर्व "दहशतवादी, सांप्रदायिक आणि वादीत वैचारिक संस्था" यांच्याशी संबंध तोडणे..
 4. इतर राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी गटांना आर्थिक सहाय्य देणे बंद करणे.
 5. चारही राष्ट्रांमधील असलेले गुन्हेगार आणि संबंधित सर्व माहिती त्यांच्या-त्यांच्या देशांना सोपवणे.
 6. त्यांची संपत्ती गोठवणे.
 7. अल जझीरा आणि त्याचे संलग्न केंद्रे बंद करणे.
 8. सार्वभौम देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे बंद करणे.
 9. निर्वासित नागरिकांना कतारचे नागरिकत्व देणे थांबवणे.
 10. अलीकडच्या वर्षांत कतारच्या धोरणांमुळे झालेल्या जीवनाची आणि इतर आर्थिक नुकसान भरपाई देणे.
 11. 2014 च्या करारानुसार कतारचे लष्करी, आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरणांना इतर आखाती/अरब देशांबरोबरच संरेखित करणे.
 12. सौदी अरेबिया, UAE, इजिप्त आणि बहरीन मधील राजकीय विरोधकांसोबतचे संपर्क बंद करणे आणि यासंबंधी त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील देणे.
 13. कतारद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अर्थसहाय्यीत सर्व वृत्तसंस्थांना बंद करणे.
 14. या सर्व मागण्या 10 दिवसांच्या आत मान्य किंवा अमान्य करणे.
 15. मागण्या मान्य झाल्यानंतर पुढील 12 वर्षांत लेखापरीक्षणास मंजूरी दर्शवणे.


जेहान दारुवालाने FIA फॉर्म्युला 3 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली

 1. जेहान दारुवालाने नूरेमबर्ग (जर्मनी) मधील नूरेमबर्ग सर्किट (2.3 कि.मी) येथे आयोजित 2017 FIA फॉर्म्युला 3 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली आहे.
 2. या विजयासोबतच दारुवाला ही शर्यत जिंकणारा पहिला भारतीय चालक बनला आहे.
 3. 18 वर्षीय दारूवाला याने कनिष्ठ शर्यत जिंकलेली आहे.
 4. तो सहारा फोर्स इंडिया अकॅडेमीचा विद्यार्थी आहे.
 5. फॉर्म्युला 3 ही शर्यत जगातली सर्वात कठीण कनिष्ठ शर्यतीच्या श्रेण्यांपैकी एक आहे.


सुंदरम रवी : ICC एलिट पॅनेलमध्ये एकमेव भारतीय पंच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एलिट पॅनेलने 2017-18 हंगामासाठी पंचांची यादी घोषित केली आहे.

या यादीत सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचाचा समावेश कायम आहे.

इतर पंचांमध्ये

 1. अलिम दार,
 2. कुमार धर्मसेना,
 3. मरेइस एरास्मस,
 4. क्रिस गॅफनी,
 5. इयान गौल्ड,
 6. रिचर्ड इलिंगवर्थ,
 7. रिचर्ड केटलबोरोफ,
 8. निगेल लोंग,
 9. ब्रूस ऑक्सेनफोर्ड,
 10. पॉल रायफेल
 11. आणि रॉड टकर यांचा समावेश आहे.

तसेच, ICC ने मॅच रेफरींच्या यादीत कोणताही बदल केला नाही.

यामध्ये

 1. डेव्हिड बून,
 2. ख्रिस ब्रॉड,
 3. जेफ क्रो,
 4. रंजन मदुगले,
 5. अँडी पायक्रोफ्ट,
 6. जवागल श्रीनाथ
 7. आणि रिची रिचर्डसन यांचा समावेश आहे.


Top