chalu ghadamodi

1. बेरोजगार युवकांनी पदवी पूर्ण केली किंवा समकक्ष पदवी पूर्ण केली तर त्यांना राजस्थान सरकारकडून बेरोजगार भत्ता मिळेल.
2.
पुरुष अर्जदारांना 3,000 / महिना मिळतील
3.
मुख्यमंत्री युवा संबल योजने अंतर्गत महिला आणि इतरांना 3,500 / - रुपये मिळतील.अर्जदारांनी राजस्थानच्या निवासी असणे आवश्यक आह


chalu ghadamodi

1. केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट अफेयर्सचे मंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्ली येथे झालेल्या आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) 20 व्या बैठकीचे अध्यक्ष होत्या.
2. बैठकीत सध्याच्या जागतिक आणि स्थानिक आर्थिक परिस्थिती आणि बँकिंग आणि एनबीएफसी संबंधित वित्तीय स्थिरता समस्यांचे पुनरावलोकन केले.
* आर्थिक स्थिरता आणि विकास परिषद बद्दल
i) आर्थिक स्थिरता आणि विकास परिषद (एफएसडीसी) हा भारत सरकारद्वारा गठित एक उच्चस्तरीय संस्था आहे.
ii) ही सुपर रेग्युलेटरी संस्था प्रथम
2008 मध्ये रघुराम राजन कमिटीने मांडली होती.
iii) भारताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संपूर्ण आर्थिक क्षेत्रातील आर्थिक नियमिततेने हाताळणारी स्वायत्त संस्था स्थापन केली.


chalu ghadamodi

1. केंद्रसरकारने पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा अडचण वाढवली आहे. पश्चिम बंगालचे नामांतर ‘बांग्ला’ करण्याची ममतांची मागणीला केंद्र सरकारने नकार दिला आहे.

2. तसेच केंद्रीय गृह राज्यामंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बोलताना बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे सांगितेले आहे. तसेच राज्याचे नाव बदलण्यासाठी संविधानिक दुरुस्तीची गरज असल्याचे ही ते म्हणाले.

3. तर 29 ऑगस्ट 2016 ला विधानसभेच्या सर्वसाधारण सभेत पश्चिम बंगालचे नाव तीन वेगवेगळ्या भाषेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यात बंगालीमध्ये ‘बांग्ला’, इंग्रजीत ‘बेंगाल’ आणि हिंदीत ‘बंगाल’ ठरले होते.

4. मात्र त्यावेळी विरोधात असलेल्या काँग्रेस आणि भाजपने विरोध केला होता. तर केंद्र सरकारने सुद्धा यावेळी आक्षेप घेतला होता. त्या नंतर 26 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्याचे नाव बांग्ला करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर करण्यात आला.

5. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी गृह मंत्रालयायकडे पाठवण्यात आला होता. मात्र राज्यसभेत बोलताना नित्यानंद राय यांनी बंगाल सरकारच्या नामांतराच्या कोणत्याही प्रस्तावला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.


chalu ghadamodi

1. सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत.

2. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अ‍ॅप गुगलच्या भाषांतराच्या अ‍ॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल.

3. तर या सेवेच्या सकारात्मक परिणामासाठी सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व उच्च न्यायालयांची मदत घेणार आहे.

4. जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाकडून या सेवेचा प्रारंभ केला जाईल. या सेवेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या अप्पू घर येथील नव्या कार्यालयात केले जाणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल.


chalu ghadamodi

1. भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 मध्ये झाला होता.

2. सन 1903 मध्ये मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

3. सन 1947 मध्ये भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

4. नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान सन 1997 मध्ये मंगळावर उतरले.

5. सन 1999 मध्ये लष्कराच्या 18व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.


Top