1. फलंदाजांनी सुरेख कामगिरी केल्यानंतर गत चॅम्पियन भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत  पावसाचा तीनदा व्यत्यय आलेल्या ब गटाच्या एकतर्फी लढतीत पाकिस्तानचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १२४ धावांनी पराभव करताना विजयी प्रारंभ केला.
  2. डकवर्थ लुईस नियमानुसार ४१ टकांत २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३३.४ षटकांत १६४ धावाच करू शकला.
  3. भारताकडून उमेश यादवने ३० धावांत ३ गडी बाद केले. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार सामन्यांत पाकिस्तानविरुद्धचा हा भारताचा दुसरा विजय आहे.


  1. लष्करात लढाऊ विभागांखेरीज इतर विभागांमध्ये भूमिका बजावणाऱ्या ‘मर्दानी’ आता लवकरच प्रत्यक्ष लढाऊ दलांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
  2. ‘महिलांना सैन्याच्या लढाऊ विभागांमध्ये सामावून घेण्यास परवानगी देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून सुरुवातीला त्यांना लष्करी पोलिस म्हणून लढाऊ नियुक्ती देण्यात येईल,’ अशी माहिती लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.
  3. ‘महिलांना जवानांच्या रूपात पाहता येईल, असे मला वाटते. मी लवकरच त्याबाबतची प्रक्रिया सुरू करणार आहे. सुरुवातीला लष्करी पोलिस म्हणून महिला जवानांची नेमणूक केली जाईल,’ असे जनरल रावत म्हणाले. ‘सध्या महिला जवानांचा विषय सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
  4. युद्धभूमीवरील आव्हानांना तोंड देताना महिलांना आपले सामर्थ्य आणि धैर्य दाखवून द्यावे लागेल. आपल्याभोवतीची काचेची भिंत फोडावी लागेल,’ अशी अपेक्षा लष्करप्रमुखांनी व्यक्त केली.
  5. सध्या लष्कराच्या वैद्यकीय, कायदा, सिग्नल, इंजिनीअरिंग या विभागांमध्ये महिलांना अधिकारी पदावर घेतले जाते. मात्र लढाऊ विभागांची कवाडे महिलांसाठी अद्याप खुली झालेली नाहीत.
  6. हवाई दलाने मात्र नुकतेच तीन महिला अधिका-यांना लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती दिली आहे. अवंती चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहनासिंह या हवाई दलातील पहिल्या तीन लढाऊ वैमानिक ठरल्या आहेत.
  7. नौदलही युद्धनौकांवर महिलांची नियुक्ती करण्याबाबत धोरण आखले जात आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.