1. 2017 सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक LIGO डिटेक्टरच्या संशोधनात उल्लेखनीय योगदान देणार्‍या रेनर वेईस, बॅरी सी. बॅरीश, कीप एस. थॉर्न या तीन वैज्ञानिकांना दिले जाणार असल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेसने जाहीर केले आहे. $1.1 दशलक्षचे हे पारितोषिक तिघांमध्ये वाटून देण्यात येणार आहे.
 2. लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव अब्जर्व्हेटरी (LIGO) डिटेक्टर हे गुरुत्वाकर्षण लहरीमुळे निर्माण होणार्‍या विश्वातील थरथराटाला शोधणारे यंत्र आहे. LIGO ही गुरुत्वाकर्षणावर लहरी शोधण्यासाठी भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा आणि वेधशाळा आहे. LIGO हा अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे मधील वैज्ञानिकांचा एक संयुक्त प्रकल्प आहे.
 3. 100 वर्षांपूर्वी अल्बर्ट आईनस्टाइन यांनी भाकीत केलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या लहरीला 14 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच शोधण्यात आले होते. दोन कृष्णविवरांची टक्कर झाल्यास निर्माण होणार्‍या या लहरींना LIGO डिटेक्टरपर्यंत पोहचण्यासाठी 1.3 अब्ज प्रकाशवर्ष लागतात, असा यात निष्कर्ष काढण्यात आला. या संशोधनात एकूण 20 देशांतील हजारपेक्षा अधिक वैज्ञानिकांनी काम केले आहे.
 4. रेनर वेईस - रेनर वेईस यांचा जन्म जर्मनीच्या बर्लिन शहरात 1932 साली झाला. 1962 साली कॅम्ब्रीज विद्यापीठातून पीएचडी प्राप्त करून ते तेथेच प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
 5. कीप थॉर्न  - अमेरिकेचे कीप थॉर्न यांचा जन्म 1940 साली झाला. 1965 साली प्रींकटॉन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त करून कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
 6. बॅरी बॅरीश - बॅरी बॅरीश यांचा जन्म अमेरिकेत 1936 साली झाला. 1962 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केल्यानंतर तेथेच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
 7. सुरुवातीस, किप थॉर्न आणि रेनर वीस या दोघांनाही खात्री होती की गुरुत्वाकर्षण लहरी शोधता येऊ शकतात. 1970 च्या दशकाच्या मध्यात, रेनर यांनी आधीच पार्श्वभूमीच्या मागचे गोंधळ माजवणार्‍या आवाजाचे संभाव्य स्त्रोतांचे विश्लेषण केले होते, जे मोजमापांमध्ये अडथळा ठरू शकेल आणि लेझर-आधारित इंटरफेरॉमीमीटर देखील संरचित केले होते, जे या आवाजावर मात करेल.


 1. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे व्दिमासिक पतधोरण 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केले असून रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही
 2. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.गेल्या व्दिमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यंदाच्या पतधोरण समितीच्या  बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती. 
 3. 3 ऑक्टोबरपासून पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली होती. 4 ऑक्टोबर रोजी ही बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवले आहे. 
 4. तसेच यानुसार रेपो दर  6 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट  5.75 टक्क्यांवर कायम आहे. विकासदर  6.7 टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बॅंकेने वर्तविले. यापूर्वी हाच अंदा  7.3 टक्के इतका वर्तविण्यात आला होता.


 1. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित भारत आणि जिबुती या दोन देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी जिबुतीचे अध्यक्ष ओमर गुलेह ही उपस्थित होते.
 2. जिबुती आणि इथिओपिया या दोन देशांच्या  चार दिवसांच्या दौऱ्यासाठी कोविंद यांचे येथे आगमन झाले. राष्ट्रपती झाल्यानंतरचा गोविंद यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. 
 3.  कोविंद यांचे अध्यक्षीय निवासस्थानी गुल्लेह यांनी समारंभपूर्वक स्वागत केले. त्यानंतर कोविंद आणि गुलेह यांच्यात शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा झाली.
 4. तसेच त्यानंतर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी ' ऑपरेशन राहत'च्या काळात जिबुतीने केलेल्या सहकार्याबद्दल कोविंद यांनी गुलेह यांचे आभार मानले. 
 5. 2015 मध्ये युद्धग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी जिबुतीकडून मदत देण्यात मिळाली होती.  जिबुतीने  आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा गटात (आयएसए) सहभागी होण्याची विनंती कोविंद यांनी केली.
 6. जिबुतीला भेट देणारे कोविंद हे  पहिलेच भारतीय नेते आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिबुतीमध्ये चीनने आपला पहिला देशाबाहेरील लष्करी तळ उभारला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविंद यांच्या जिबुती दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. 


 1. 3 ऑक्टोबर 2017 रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष दीपक कुमार यांच्या हस्ते NHAI च्या जागतिक दर्जाच्या नव्या बहुभाषी संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
 2. या संकेतस्थळाच्या माध्यमातून जनसामान्य राष्ट्रीय महामार्गांची रेटिंग करू शकणार.  संकेतस्थळावर संस्‍ था, HR,  प्रकल्पे,  धोरणे,  चलचित्र आणि  प्रकल्पांची छायाचित्रे यासंबंधी पूर्ण माहिती आहे. पारदर्शिता राखण्यासाठी महितीला सार्वजनिक केले गेले आहे.
 3. तसेच ‘ प्रोजेक्ट मॉनिटरिंग इन्फॉर्मेशन सिस्टम (PMIS) मोबाइल अॅपचेही अनावरण करण्यात आले. हे अॅप मोबाइलवर राष्ट्रीय महामार्गांसंबंधित प्रकल्पांची घरातच बसून देखरेख करण्यास सुविधा प्रदान करणार. बोस्टन कंसल्टिंग ग्रुप च्या सहकार्याने हे अॅप तयार केले गेले.


Top