Maharashtra has three awards for National Tourism

 1. देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि एका संस्थेला आज केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 2. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने आज विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2016 -17 वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
 3. यावेळी पर्यटन सचिव रश्मी वर्मा उपस्थित होत्या. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 4. मुंबई येथील मेलुहा-द-फर्न आणि औरंगाबाद येथील ‘लेमन ट्री हॉटेल’ यांच्यासह मुंबई येथील ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले.
 5. मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरण स्नेही हॉटेल ठरले आहे.पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरण स्नेही वातावरण जपण्यात आले आहे.
 6. औरगांबाद येथील लेमन ट्री हॉटेल देशातील सर्वोत्तम थ्री स्टार हॉटेल ठरले आहे. अजिंठा व वेरूळ लेण्यांना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसह चिखलठाणा, वाळुंज, चितगाव, शेंद्रा व पैठण या औद्योगिक क्षेत्रांना भेटी देणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती या हॉटेलला मिळाली आहे.
 7. मुंबई येथील ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेला देशातील सर्वोत्तम ग्रामीण कृषी पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 8. या संस्थेने ग्रामीण भागाशी नाड राखून ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.


Nobel Laureate in Chemistry

 1. जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा मागील काही दिवसांपासून होत आहे. यातील रसायनशास्त्र विभागातील पुरस्कार्थींची घोषणा करण्यात आली आहे.
 2. अमेरिकेतील फ्रान्सिस अरनॉल्ड यांची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच जॉर्ज स्मिथ आणि ग्रेगरी विंटर यांचीही घोषणा कऱण्यात आली आहे.
 3. प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. अशापद्धतीने तयार केलेले एन्झामाईन जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील.
 4. यासोबतच स्मिथ आणि विंटर यांनीही अनुक्रमे प्रोटीन निर्मिती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे.
 5. याआधी सोमवारी औषधशास्त्र विषयातील नोबेल विजेत्यांची नावे जाहीर केली.
 6. अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या जाहीर झाला आहे. या दोघांना हा पुरस्कार कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात येणार आहे.
 7. या दोघांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते. तर भौतिकशास्त्रासाठी दिला असून ३ जणांना तो देण्यात येणार आहे.
 8. आर्थर आश्कीन यांना तसेच गेरार्ड मोरौ आणि डोना स्ट्रीक्लंड यांना विभागून देण्यात आला आहे.
 9. डोना या कॅनडातील असून या तिघांनीही लेझर फिजिक्स विषयात केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल देण्यात आला आहे.
 10. हे तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
 11. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे.
 12. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.


The first Global Skills Park (GSP) in India

 1. मध्यप्रदेशाच्या भोपाळ शहरात देशातले पहिले-वहिले ‘ग्लोबल स्किल्स पार्क’ (GSP) उभारले जाणार आहे.
 2. यामुळे राज्यातल्या तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (TVET) प्रणालीची गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार.
 3. पार्कच्या स्थापनेसाठी भारत आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्या दरम्यान $150 दशलक्षचा कर्ज करार केला गेला आहे.


Top