1. आसाम राज्य सरकारने २ सप्टेंबर २०१७ पासून ६ महिन्यांसाठी संपूर्ण राज्याला " अशांत क्षेत्र" म्हणून घोषित केले आहे. राज्य गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम १९५८ अंतर्गत देण्यात आलेल्या शक्तीनुसार, राज्याचा कारभार पूर्वपदावर येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.
 2. कायद्यासंदर्भात सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम (AFSPA) १९५८ हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून " अशांत क्षेत्र" घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात.
 3. "अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम १९७६" नुसार एखाद्या क्षेत्राला " शां " घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी. भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी १५ ऑगस्ट १९४२ रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.


 1. हॉकी इंडियाने राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक रोएलंट ओल्टमन्स यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ष २०१६ आणि वर्ष २०१७ मध्ये अप्रभावी कामगिरी दर्शवल्या प्रकरणी पदावरून काढले आहे.
 2. पुरुष संघासाठी नव्या प्रशिक्षकाची निवड होईपर्यंत डेव्हिड जॉन हे  कारभार सांभाळणार आहेत.
 3.  रोएलंट ओल्टमन्स हे नेदरलँडचे डच हॉकी प्रशिक्षक आहेत. त्यांची हॉकी इंडियाच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती.


 

 1. अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाने सहावी अणुचाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असून सरकारी मीडियाने या वृत्तास दुजोरा दिला आहे. 'आज हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी राहिली.
 2. हा बॉम्ब आंतरखंडिय क्षेपणास्त्रानेही डागला जाऊ शकतो', अशी माहिती  उत्तर कोरियाच्या सेंट्रल टेलिव्हिजनकडून देण्यात आली. उत्तर कोरियाकडून अणुचाचणी घेण्यात आल्याची पक्की माहिती आमच्याकडे असल्याचे सर्वात आधी  जपानचे परराष्ट्र मंत्री  तारो कोनो यांनी माध्यमांना सांगितले होते. हवामान विभाग आणि अन्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर उत्तर कोरियाकडूनच याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.
 3. उत्तर कोरियाने घेतलेल्या पाचव्या अणुचाचणीच्या तुलनेत आज झालेला स्फोट  ९.८ पटीने अधिक शक्तिशाली होता. या स्फोटाने आधी ज्या ठिकाणी चाचणी घेण्यात आली होती तिथेही हादरे बसले, असे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे. चीन आणि अमेरिकेनेही अशा प्रकारचा शक्तिशाली स्फोट झाल्याचे नमूद केले आहे.
 4.  दक्षिण कोरियाई वृत्तसंस्था योनहापने सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अशा प्रकारची अणुचाचणी उत्तर कोरियाकडून घेतली जाऊ शकते, अशी शक्यता आधीच व्यक्त केली होती. ही शक्यता खरी ठरली.

 


 1. पीयुष गोयल यांना केंद्रीय रेल्वेमंत्रीपद मिळाल्याने आता रेल्वे खात्याचा कारभार आणखी सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. 'कैफियत एक्स्प्रेस' आणि 'उत्कल एक्प्रेस' या दोन अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच सोपवला होता. 
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सुरेश प्रभू यांना थोडे थांबा एवढेच सांगितले होते आणि राजीनामा स्वीकारला नव्हता. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या वेळी रेल्वे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाणार याची चर्चा होती.
 3. तसेच याआधी पीयुष गोयल हे राज्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे  उर्जा आणि कोळसा खात्याचा स्वतंत्र कार्यभार होता. या खात्यात पीयुष गोयल यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. 
 4. 2014 मध्ये भारतात अशी  18 हजार गावे होती ज्या गावांमध्ये वीज पोहचली नव्हती, मागील तीन वर्षांच्या काळात म्हणजेच पीयुष गोयल यांनी कार्यभार सांभाळल्यापासून ही संख्या  4 हजार गावांवर आली आहे. 
 5. 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रचार, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांसोबत संवा साधण्याची जबाबदारी पीयुष गोयल यांच्यावर टाकण्यात आली होती.


Top