Indian shooter Om Prakash won gold in World Championships

 1. भारताचा 23 वर्षीय ओम प्रकाश मिथर्वालने दक्षिण कोरियात सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
 2. त्याने 50 मीटर पिस्तुल प्रकारात 564 गुणांच्या कमाईसह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. 
 3. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कनिष्ठ गटात पुरुषांच्या 50 मीटर पिस्तुल वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते.
 4. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय नेमबाज आहे. स्पर्धेतील या प्रकारात 2014साली जितू रायने रौप्यपदक जिंकून दिले होते.
 5. त्यानंतर पदक जिंकणारा मिथर्वाल हा पहिलाच भारतीय आहे. मात्र, यंदा जितू रायला अपयश आले आणि त्याला 552 पदकांसह 17व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 6. 50 मीटर पिस्तुल प्रकार ऑलिम्पिकमध्ये नसल्याने मिथर्वालला ऑलिम्पिकला कोटा मिळू शकलेला नाही. 
 7. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिथर्वालने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 10 मीटर एअर पिस्तुल आणि 50 मी.
 8. पिस्तुल प्रकारांत कांस्यपदकं जिकंली होती. त्याने 10 मीटर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीत 584 गुणांची नोंद करताना राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाशी बरोबरी केली होती. 
 9. दरम्यान महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेर, हीना सिधू आणि श्वेता सिंग यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले.
 10. त्यांना अनुक्रमे 13, 29 व 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 


Vice President's speech in 'World Hindu Congress'; 60 countries will have 2,000 representatives present

 1. शिकागोतील वर्ल्ड हिंदू काँग्रेसची परिषद या आठवड्याच्या अखेरीस सुरू होत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूया कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती स्तराची व्यक्ती प्रथमच त्यात सहभागी होत आहे.
 2. वर्ल्ड हिंदू काँग्रेस ७ सप्टेंबरपासून तीन दिवस चालेले. स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मध्ये वर्ल्ड काँग्रेसला संबोधित केल्याच्या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रथमच भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
 3. ९ सप्टेंबर रोजी ६० देशांचे २००० प्रतिनिधी हजर राहणार असून यात नायडू यांचाही समावेश आहे. उपराष्ट्रपतींचे भाषण भारत आणि इतरत्र टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे.
 4. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे परिषदेस उपस्थित राहू शकतात. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संयुक्त महासचिव दत्तात्रय होसबळे यांचीही तिथे भाषणे होणार आहेत.
 5. ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’चे आयोजन दर चार वर्षांनी एकदा होते. जगभरात काम करणाºया हिंदू संघटनांचा हा एक समूह आहे. दलाई लामा, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि चिन्मय मिशनचे प्रमुख स्वामी स्वरूपानंद हेही प्रमुख वक्त्यांपैकी एक असतील.


Asian Games 2022 to be filled in China

 1. पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला.
 2. भारताने आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले. भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकून 69 पदकांची कमाई करताना आठवे स्थान पटकावले.
 3. महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने निरोप समारंभात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. ध्वजधारकाचा मान तिला देण्यात आला होता.
 4. पदकांच्या क्रमवारीत चीनने पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केली. चीनने 289 (132 सुवर्ण, 92 रौप्य व 65 कांस्य) पदक जिंकली. त्यापाठोपाठ जपान 205 ( 75 सुवर्ण, 56 रौप्य व  74 कांस्य) आणि दक्षिण कोरिया 177 ( 49 सुवर्ण, 58 रौप्य व 70 कांस्य) पदकांसह अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर इंडोनेशिया ( 98 पदकं), उजबेकिस्तान ( 70 ), इराण ( 62) आणि चायनीज तैपेई ( 67) यांनी स्थान पटकावले आहे. यावेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी सर्व खेळाडूंचे आभार मानले.
 5. पुढील आशियाई स्पर्धा 2022 मध्ये चीनमधील हँगझाऊ शहरात होणार आहे. 10 ते 25 सप्टेंबर असा या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. 


Top