1. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील सुमारे दीड अब्ज लोकांना येत्या काही दहशकांत जीवघेण्या उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा अमेरिकेतील "मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी" ने (एमआयटी) केलेल्या अभ्यासातून दिला आहे. उष्णतेच्या लाटांमुळे तापमान प्रचंड वाढेल; तसेच अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते, अशी शक्यताही या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.
 2. जागतिक हवामान बदलामुळे या शतकाच्या अखेरीस दक्षिण आशिया भागात अत्यंत कडक उन्हाळा जाणवेल. भविष्यातील या भयंकर परिणामांना रोखण्यासाठी प्रयत्न करण्यास अद्यापही वेळ आहे. आताच उपाय केले जागतिक तापमानवाढीच्या परिणामांना रोखता येईल, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
 3. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाली नाही, तर उष्णतेच्या लाटांमुळे येत्या काही दशकांत सिंधू आणि गंगा नदीच्या सुपीक खोऱ्याला फटका बसेल, असेही संशोधकांनी म्हटले आहे. सिंधू आणि गंगा नदीच्या खोऱ्यातच मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे उत्पादन होते.
 4. धोका असलेले भाग  पर्शियाच्या आखातात तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल उत्तर भारतात उष्ण तापमान असेल, तर तापमान वाढलेल्या भागांत पूर्व चीन तिसऱ्या स्थानी असेल.  बांगलादेश, दक्षिण पाकिस्तान या भागांनाही उष्णतेच्या लाटांचा फटका बसण्याचा धोका आहे.
 5. "वेट-बल्ब" तापमान  उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता यांच्या एकत्रित मोजमापाला "वेट-बल्ब" तापमान म्हटले जाते. नव्या अभ्यासातील निष्कर्ष या आकडेवारीवर आधारित आहेत. मानवी शरीरात उर्ध्वर्तनाची प्रक्रिया होत असते. त्याद्वारे शरिरातील अंतर्गत ओलावा घामाद्वारे बाहेर टाकला जातो आणि शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते.  ३५ अंश वेट-बल्ब तापमानाला मानवी शरीर स्वतःहून थंड होऊ शकणार नाही. त्यामुळे या तापमानात माणसाला काही तासांहून अधिक काळ राहता येणार नाही.
 6. पूर्वीचे अभ्यास काय सांगतात सध्या जगात कोठेही वेट-बल्ब तापमान क्वचितच  ३१ अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे, असे यापूर्वीच्या अभ्यासांवरून समोर आले आहे. पर्शियाच्या आखातात  २०१५च्या  उन्हाळ्यात वेट-बल्ब तापमान ३५ अंश सेल्सियसच्या मर्यादेपर्यंत पोचले होते. त्याच वर्षी दक्षिण आशियात जीवघेण्या उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये  ३५०० लोकांचा मृत्यू झाला होता. सध्याच्या हवामानात भारतातील दोन टक्के लोकसंख्येला काही वेळा ३२ अंश सेल्सियस वेट-बल्ब तापमानाचा सामाना करावा लागतो.


 1. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या खेलरत्न सन्मानासाठी या वर्षी पॅरा-अॅथलिट (दिव्यांग खेळाडू) देवेंद्र झझारिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांची शिफारस करण्यात आली आहे. "खेलरत्न" साठी शिफारस करण्यात आलेला पहिला अपंग खेळाडू ठरला आहे.
 2. निवृत्त न्यायाधीश  सी. के. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विशेष समितीने गुरुवारी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी विविध क्रीडाप्रकारांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केली. भालाफेकपटू असलेल्या ३६ वर्षीय झझारियाच्या नावावर दोन पॅरालिम्पिक सुवर्णपदके जमा आहेत.
 3. २००४ साली अथेन्समध्ये आणि मागील वर्षी रिओमध्ये झझारियाने ऑलिम्पिक सुवर्णपदकाची कमाई केली होती. या दोन्हीवेळी त्याने नवे विश्वविक्रम प्रस्थापित केले होते. याशिवाय, त्याने २०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.
 4. सरदारची निवड खेलरत्नसाठी शिफारस झालेला  ३१ वर्षीय सरदार हा भारताच्या सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक समजला जात असून, त्याने आतापर्यंत  ११३ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ मध्ये तो भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला होता. २०१४ मधील इंचॉन आशियाई स्पर्धेत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात सरदारचे महत्त्वाचे योगदान होते. याशिवाय ठक्कर समितीने अर्जुन पुरस्कारासाठी   ७ खेळाडूंची शिफारस केली आहे.
 5.  अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेले खेळाडू : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अॅथलेटिक्स), अरोकिन राजीव (अॅथलेटिक्स), प्रशांती सिंह (बास्केटबॉल), एल. देवेंद्रो सिंह (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (महिला क्रिकेट), ओईनाम बेम्बेम देवी (फुटबॉल), एसएसपी चौरासिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीर सिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (शूटिंग), अँथनी अमलराज (टेबल टेनिस), साकेत मायनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियन (कुस्ती), मरियप्पन थंगवेलू (पॅरा-अॅथलिट), वरुण भाटी (पॅरा-अॅथलिट).


 1. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय अर्थव्यवस्थेत सतत होणाऱया गुंतवणुकीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 2 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.भांडवली बाजारात रुपया मजबूत झाल्याने 63.69 पर्यंत पोहोचला होता. यापूर्वी  10 ऑगस्ट 2015 रोजी या पातळीवर रुपया पोहोचला होता.
 2. रुपया मजबूत झाल्याने आयात होणाऱया वस्तूंपासून सरकारी तिजोरीला लाभ होण्याची शक्यता आहे. देशात खनिज तेलाची मोठय़ा प्रमाणात आयात होत असून त्याचे देणे डॉलरमध्ये द्यावे लागते.धातू, इंजीनियरिंग क्षेत्रात मागविण्यात येणाऱया कच्च्या मालाच्या बिलात कमी येईल, मात्र औषध, आयटी क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.


 1. बँकिंग नियामक (सुधारणा) विधेयक, 2017 लोकसभेत संमत करण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सादर केले. मे महिन्यात या विधेयकासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.  बँकिंग क्षेत्रातील वाढत्या अनुत्पादक कर्जाचा आकडा आणि आरबीआयला कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे.
 2. सध्या लागू असणाऱया बँकिंग नियामक कायदा, 1949 ची जागा हे नवीन विधेयक घेणार आहे. यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा आदेश बँकांना देण्याचा अधिकार आरबीआयला मिळणार आहे.
 3. अनुत्पादक कर्जाची समस्या सोडविण्यासाठी आरबीआयला समिती स्थापन करण्याचा आणि अधिकाऱयांची नियुक्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. या विधेयकाला आवाजी बहुमताने संमत करण्यात आले.


 1. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी "भारत-2022 ईपीएफ" ची घोषणा केली. 2018 या आर्थिक वर्षासाठी सरकारचे लक्ष्य आणि निर्गुंतवणूक प्रक्रिया सहजपणे पार पाडता यावी यासाठी याचा वापर होणार आहे. एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये 22 कंपन्या असतील.
 2. सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक बँक आणि सरकारची गुंतवणूक करणाऱया काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांत ‘सु  टी’ या उपक्रमामार्फत गुंतवणूक करण्यात आली आहे. या ईटीएफमध्ये सहा क्षेत्रातील कंपन्या आहे आहेत.
 3. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात 72,500 कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आतापर्यंत निर्गुंतवणुकीतून 8,427 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 72,500 कोटीपैकी 46,500 कोटी कंपनीतील हिस्सा विक्री करत, 15 हजार कोटी रणनीति आधारित निर्गुंतवणूक आणि विमा कंपन्या सूचीबद्ध करत 11 हजार कोटी उभारण्यात येतील.


Top