1. उत्तरप्रदेशचा शामली जिल्हा आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
  2. यासोबतच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये सामील जिल्ह्यांची एकूण संख्या दिल्ली व्यतिरिक्त २२ जिल्हे (हरियाणाचे १३, उत्तरप्रदेशचे ७ आणि राजस्थानचे २) असे २३ झालेली आहे.
  3. NCR मध्ये सामील शहरांना 'राष्ट्रीय राजधानी क्षेत्र योजना मंडळ (NCRPB)' कडून क्षेत्रासाठी विकासासाठी आकर्षक दरांवर निधी उपलब्ध करून दिला जातो.
  4. १९८५ साली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) आणि संलग्न राष्ट्रीय राजधानी क्षेत्र योजना मंडळ (NCRPB) यांची स्थापना करण्यात आली. हे मंडळ या प्रदेशाच्या विकासाची योजना आखते आणि क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नियंत्रणासाठी योग्य धोरणे तयार करते.


  1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रोम स्थित अन्न व कृषी संघटना (Food and Agriculture Organisation- FAO) च्या नेतृत्वात ५ डिसेंबर २०१७ रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जात आहे.
  2. या वर्षी "केयरिंग फॉर द प्लॅनेट स्टार्ट्स फ्रॉम द ग्राऊंड" या विषयाखाली हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
  3. अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण आणि मानव कल्याणासाठी मृदेच्या गुणधर्मांचे महत्त्व पट‍वून देणारे संदेश पसरवणे.
  4. मृदा हे एक मर्यादित नैसर्गिक स्त्रोत आहे. मानवी कालखंडात मृदा पुनर्निर्मित केली जाऊ शकत नाही. तथापि, मानवी जीवनामध्ये मृदेची भूमिका महत्त्वाची असूनही, अनुचित व्यवस्थापन पद्धतीमुळे मृदेचा कस कमी होण्यामध्ये जागतिक स्तरावर वाढ होत आहे.
  5. वामानातील बदल, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकास यादृष्टीने कार्य करण्यासह अन्नसुरक्षा, कृषी यासाठी मृदाचे महत्त्व यासंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो.
  6. जून २०१३ मध्ये 'वैश्विक मृदा भागीदारी' च्या चौकटीत FAO परिषदेकडून प्रस्तावित प्रस्तावादाखल, डिसेंबर २०१३ मध्ये ६८ व्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ५ डिसेंबर २०१४ रोजी प्रथम अधिकृत 'जागतिक मृदा दिवस' साजरा करण्याचे मान्य केले गेले. प्रत्यक्षात ही कल्पना २००२ साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायंसेस (IUSS) द्वारा प्रस्तावित केली गेली होती.


Top