CRISIL, announces India's first MSE Motion Index for SIDBI

 1. क्रिसिडेक्स (CriSidEx) या भारताच्या प्रथम MSE मनोभाव निर्देशांक (MSE Sentiment Index) याला जाहीर केले आहे.
 2. हा निर्देशांक लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी क्रिसिल आणि भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) यांच्याद्वारा तयार करण्यात आला आहे.
 3. क्रिसिडेक्स बाबत:-
  1. क्रिसिडेक्स हा एक संमिश्र निर्देशांक आहे, ज्याला 8 वेगवेगळ्या निर्देशांकाला मिळवून तयार केले गेले आहे.
  2. हा निर्देशांक लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिक मतांचे 0 (एकदम नकारात्मक) ते 200 (पूर्णपणे सकारात्मक) या दरम्यानच्या गुणांमध्ये मूल्यमापन करतो.
  3. नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये 1100 लघु व मध्यम उपक्रमांमधून (550 उत्पादन प्रकल्प आणि 550 सेवा संयंत्रे) मिळालेल्या माहितीच्या आधारावर मानकांना निश्चित करण्यात आले आहे.
 4. क्रिसिडेक्समध्ये दोन निर्देशांक आहेत:-
  1. 'तिमाही' साठी, ज्यामध्ये सर्वेक्षण केले गेले आहे.
  2. 'पुढील तिमाही' साठी, ज्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर सर्वेक्षणाच्या आधारावर तयार केले गेले आहे.
 5. यापासून मिळाले ल्या माहितीमुळे कोणत्याही संभाव्य अडचणीमध्ये आणि उत्पादन श्रृंखलेमध्ये परिवर्तनासंबंधी माहिती देणार ज्यामुळे बाजाराची कार्यकुशलता वाढणार आहे.
 6. सोबतच आयात आणि निर्यात करणार्‍यांच्या मतांविषयी माहिती मिळवून विदेशी व्यापारासंबंधी पावले उचलण्यासाठी आवश्यक संकेत देखील उपलब्ध करणार आहे.
क्रिसिडेक्सचे निष्कर्ष
 1. क्रिसिडेक्स 107 च्या गुणासह ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यानच्या काळ सौम्यपणे सकारात्मक भावना दर्शविते.
 2. जानेवारी-मार्च 2018 साठी, हा भाव अधिक सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे.
 3. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्याहून अधिक जणांनी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च या तिमाहीत आपल्या व्यवसायाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा केली.
 4. निर्माण आणि सेवा या दरम्यानच्या क्षेत्रात, निर्माण क्षेत्रात अधिक सकारात्मक भाव दिसून आला. MSE च्या निम्म्यापेक्षा अधिक जणांनी जानेवारी-मार्चमध्ये ऑर्डरमध्ये वेगाने वाढ होण्याची आणि क्षमता वाढीची अपेक्षा दर्शवली.
 5. निर्यातदारांनाही जानेवारी-मार्चमध्ये व्यवसायामध्ये सुधारणा होण्याची आशा होती. त्यापैकी एक तृतीयांश जण सर्वसाधारण ऑर्डरबुकपेक्षा अधिकची अपेक्षा करीत होते.
 6. दुसरीकडे, देशांतर्गत MSE पैकी निम्म्याहून अधिक जणांनी जानेवारी-मार्चमध्ये ऑर्डरबुकमध्ये वाढ होण्याची पूर्वसूचना दिली होती.


World Cancer Day - 4th February

 1. दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा दिवस जागतिक आरोग्य संस्था (WHO) कडून जागतिक कर्करोग दिवस जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे पाळला जात आहे.
 2. वर्ष 2016-2018 दरम्यानच्या 'वुई कॅन. आय कॅन.' या मोहिमेअंतर्गत (ही संकल्पना सुद्धा आहे) या दिवशी जगातील सर्वात प्राणघातक रोगाशी लढण्याकरिता अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्याच्या अर्थाने आयोजित केला. 'वुई कॅन. आय कॅन.' मोहीमेचे हे तिसरे वर्ष आहे.
 3. जागतिक कर्करोग दिवस हा दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित केला जातो.
 4. या दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ने वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’ चे समर्थन करण्यासंदर्भात केली होती.
 5. कर्करोगासंबंधी जागतिक दृश्य आणि मानवी पुढाकार:-
  1. गेल्या दोन दशकांत दरवर्षी जवळपास 21.7 दशलक्ष लोकांना कर्करोग झाल्याचे आढळून येत आहे.
  2. या भयंकर परिस्थितीला पाहता या रोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे.
  3. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.
  4. शारीरिक क्रियेला चालना देण्यासाठी खेळ हा एक सर्वोत्तम उपाय आहे.
  5. त्यामुळे मोठ्या संख्येनी जगभरातील क्रीडा संघटना, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांनी याविषयी जागृती करण्यासाठी ‘सपोर्ट थ्रू स्पोर्ट’ पुढाकारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शिवाय रोगाबाबत जागृतीसाठी ‘#नो हेयर सेल्फी’ ही चळवळ चालवली जात आहे.   
 6. कर्करोगासंबंधी भारतामधील परिस्थिती आणि उपाययोजना:-
  1. भारतात दरवर्षी 2.2 दशलक्ष लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात. यासंदर्भात कर्करोगाचे प्रमाण पुरुषाहून अधिक महिलांमध्ये आहे. हे चित्र पाहता भारत सरकारकडून देशभरात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबवविला जात आहे.
  2. भारतात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम वर्ष 1975-76 मध्ये सुरू करण्यात आला. प्राथमिक प्रतिबंध, लवकर निदान, उपचार आणि पुनर्वसन हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत कार्यक्रमामध्ये तीनदा सुधारण्या झाल्या असून डिसेंबर 2004 मध्ये तिसरी पुनरावृत्ती झाली आहे.
  3. या सुधारित कार्यक्रमामध्ये 5 योजनांचा समावेश आहे. 
   1. 5 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून नवीन प्रादेशिक कर्करोग केंद्र (RCCs) उभारणे.
   2. 3 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून विद्यमान RCCs बळकट करणे.
   3. सरकारी संस्था (वैद्यकीय महाविद्यालये तसेच सरकारी रुग्णालये) यांना 3 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून ऑन्कॉलॉजी विभाग उभारणे.
   4. 5 वर्षांच्या कालावधीत 90 लाख रुपये प्रदान करून जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रम चालवणे.
   5. IEC उपक्रमसाठी स्वयंसेवी संस्थांना प्रति मोहिमेमागे 8000 रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यास विकेंद्रित स्वयंसेवी संस्था योजना राबवणे.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC)
 1. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी, जगभरात 160 देशांमध्ये 1000 सदस्य असलेली संस्था आहे. यांच्यामध्ये जगातील प्रमुख कर्करोग संस्था, आरोग्य मंत्रालये, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्णाचे समूह सदस्य आहेत.
 2. ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे.
 3. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत.
 4. UICC हा NCD युतीचा संस्थापक सदस्य देखील आहे. NCD युती हे 170 देशांमधील जवळजवळ 2,000 संस्थांचे एक जागतिक नागरी समुदाय जाळे आहे.


Odisha wins 'Geospatial World Excellence Award 2018'

 1. ओडिशाने ‘भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार 2018’ जिंकला आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिला गेला आहे.
 2. हैदराबाद येथे पार पडलेल्या 10 व्या ‘भूस्थानिक जागतिक मंच’ च्या बैठकीत हा पुरस्कार दिला गेला.
 3. ओडिशा सरकारला हा पुरस्कार i3MS संकेतस्थळ आधारित सॉफ्टवेयरच्या माध्यमातून वास्तविक वेळेत खनिज उत्पादन, प्रेषण आणि मूल्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याकरिता माहिती तंत्रज्ञानासंबंधी अनुप्रयोगाचा यशस्वीपणे वापर केल्यामुळे देण्यात आला आहे.  
 4. i3MS संकेतस्थळ आधारित सॉफ्टवेयर हे GPS शी जोडलेले एक व्यासपीठ आहे, ज्याला भुवनेश्वरमधील ओडिशा स्पेस अॅप्लिकेशन सेंटर येथील शास्त्रज्ञांनी तयार केली आहे.
 5. सध्या राज्याचे पोलाद व खाण विभाग 43,000 वाहनांवर देखरेख ठेवत आहे.
भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार
 1. पार्श्वभूमी:-
 2. भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार हा जागतिक भूस्थानिक उद्योग क्षेत्रात अनुकरणीय नवकल्पना आणि प्रथा वापरत आणणार्‍याला दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशंसनीय खाजगी पुरस्कार आहे. वर्ष 2007 पासून या पुरस्काराला दिले जात आहे. भूस्थानिक जागतिक मंच (Geospatial World Forum) कडून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.


Shyam Benegal V. Shantaram lifetime achievement award

 1. 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या कालावधीत पार पडलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF-2018) मध्ये प्रसिद्द चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांना प्रतिष्ठित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 2. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा वृत्तचित्र, लघुपट व चलचित्रपट निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे.
 3. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि 10 लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  
 4. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट संघाकडून हा पुरस्कार दिला जातो.


BJP MLA Hukum Singh passed away

 1. उत्तरप्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे आमदार हुकूम सिंह यांचे निधन झाले आहे.
 2. ते 82 वर्षांचे होते.
 3. हुकूम सिंह हे कैराना मतदारसंघामधून सभेवर सलग सातवेळा निवडून आलेले होते.
 4. ते उत्तरप्रदेशामधून सात वेळा विधानसभेवर निवडून आले होते.
 5. वर्तमानात आमदार बनल्यानंतर ते लोकसभा अध्यक्षच्या संसदीय समितीमध्ये सदस्य आणि भारत सरकारच्या जल मंडळ समितीचे अध्यक्ष देखील होते.


Tamilnadu 19 medal winners India school sports championship winners

 1. खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या शेवटी पदकतालिकेत तामिळनाडू 19 पदकांसह प्रथम स्थानी होता.
 2. 19 पदकांमध्ये 5 स्वर्ण, 8 रौप्यपदकांचा समावेश आहे.
 3. पदकतालिकेत तामिळनाडूनंतर केरळ (17), हरियाणा (12) आणि महाराष्ट्र (11) या राज्यांचा क्रमांक लागतो. या सर्वांना 5 सुवर्ण पदक प्राप्त झालेत.
 4. उत्तरप्रदेशाला 16 पदक मिळालीत, मात्र त्यामध्ये फक्त 2 सुवर्ण पदक आहेत.
 5. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती. समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 दरम्यान ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले.
 6. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
 7. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल .
 8. अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार आहे.
 9. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल. शालेय खेळांमध्ये 16 क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.


Top