RAMESH BHATKAR

  1. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचा वयाच्या 70व्या वर्षी (4 फेब्रुवारी) निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

  2. रमेश भाटकर यांचा रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोटा पडदा अशा तिन्ही मंचावर वावर होता. मात्र त्यांचं खरं प्रेम हे रंगभूमीवरच होतं. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं असून त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

  3. रमेश भाटकर यांना खरी ओळख रंगभूमीमुळे मिळाली. त्यांच्या अनेक नाटकांचं आजही आवर्जुन नाव घेतलं जातं. 1975 साली रंगमंचावर सादर झालेल्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकामुळे रमेश भाटकर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. या नाटकात ते मुख्य भूमिकेत झळकले होते.

  4. या नाटकांव्यतिरिक्त अशी बरीच नाटक आहेत ज्यामध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. ‘मुक्ता’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ या नाटकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले असून या नाटकांनी त्याकाळी रंगभूमी गाजविली होती.

  5. विशेष म्हणजे रमेश भाटकर यांनी 50 हून अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले होते. तर गेल्या वर्षी त्यांना 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


DIN VISHESH

  1. चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.

  2. सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.

  3. सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

  4. पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.


Top