1. देशातील सर्वात मोठ्या बँकेला नवा अध्यक्ष मिळाला आहे. केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी रजनीश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली. 
 2. अपॉईंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेटकडून (एसीसी) तीन वर्षांसाठी रजनीश कुमार यांना या पदावर नियुक्त केले जाणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी ते आपला पदभार स्वीकारतील.
 3. रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये  व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. सन 1980 मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले. 
 4. सन 2015 मध्ये नॅशनल  बँकींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बनण्यापूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्टेट बँकेची मर्चंट शाखा आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचे काम सांभाळत होते.
 5. सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यांना सरकारकडून या पदावर राहण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. भट्टाचार्य यांनी ऑक्टोबर 2013 मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळली होती.
 6. गेल्याच वर्षी सरकारने त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या  पहिल्या महिल्या आहेत. सन 1977 मध्ये त्या स्टेट बँकेत रुजू झाल्या होत्या.


 1. वन्यजीवांचे संवर्धन आणि स्वच्छ परिसरासाठी भारत सरकारने पुढील 15 वर्षांसाठी एक राष्ट्रीय वन्यजीव कृती योजना 2017 – 2031 (National Wildlife Action Plan) तयार केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सन 2017 पासून ते सन 2031 पर्यंत राबविण्यास ही योजना जाहीर केली.
 2. NWAP 2002-2016 च्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि; सन 2017-2031 साठी वन्यजीवांच्या संरक्षणार्थ पथदर्शी दिशादर्शन तयार करणे.
 3. ही योजना जैविक विविधता आणि शाश्वत विकासाच्या संरक्षणावर केंद्रित आहे. NWAP चे  5 घटक, 17 संकल्पना, 103 संरक्षणार्थ कृती आणि 250 प्रकल्प. वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांच्या एकीकृत व्यवस्थापनाला बळकटी आणि प्रोत्साहन देणे.
 4.  हवामान बदलाशी जुळवून घेणे आणि भारतामध्ये पाण्यामधील जैवविविधतेच्या एकीकृत शाश्वत व्यवस्थापनाची जाहिरात करणे.   र्यावरण अनुकूल पर्यटन, निसर्ग शिक्षण आणि सहभागी व्यवस्थापन यांची जाहिरात करणे. वन्यजीव संवर्धनात मनुष्यबळाच्या विकासावर देखरेख ठरणे आणि वन्यजीव संशोधनाला बळकटी आणणे.
 5. भारतात वन्यजीवांच्या  संवर्धणासाठी धोरणे व संसाधने सक्षम करणे. योजनेमधून चालवल्या जाणार्‍या काही मुख्य बाबी.
 6.  हवामान बदल – हवामान बदलासंबंधी बाबीला वन्यजीव योजनेसोबत एकीकृत करणे.
 7. संरक्षित क्षेत्राच्या जाळ्यात सुधारणा आणणे, सर्व अकृषक वनस्पती आणि न पाळल्या जाणार्‍या जीवांसाठी जमिनीला अनुसरून असलेल्या पद्धती अवलंबणे, तटीय आणि सागरी वातावरणातील अधिवासांचे संरक्षण करणे.
 8.  जैव विविधता - संकटग्रस्त प्रजातींचे पुनर्वसन, वन्यजीवांचे आरोग्य, अवैध शिकारीवर नियंत्रण आणणे.
 9.  मानव-पशु संबंध – मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष थांबवणे.
 10.  प्रशासन आणि कायदे – देशातील कायद्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबाजवणीमध्ये सुधारणा करणे, वन्यजीवन क्षेत्रासाठी अडथळारहित वित्तपोषण सुनिश्चित करणे, अन्य क्षेत्रांमध्ये चालणार्‍या कार्यक्रमांसोबत राष्ट्रीय वन्यजीव कृती योजनेचे एकीकरण करणे.
 11.  संशोधन आणि पारंपरिक ज्ञान – संशोधन आणि देखरेख मजबूत बनवणे, मनुष्यबळाचा विकास करणे, लोक सहभाग वाढवणे.
 12. यापूर्वी सन  1983-2001 आणि सन 2002-2016 या कालावधीसाठी सोन NWAP बनविण्यात आलेले आहे.


 1. भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे. 
 2. तसेच  9 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाईल.
 3.  केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यंदा सर्जनशील कलेसाठी  मंगला बनसोडे यांचा गौरव केला जाणार आहे. 
 4. तमाशासारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा सन्मान या पुरस्काराच्या निमित्ताने होत असल्याने अखेर सरकार दरबारी  लोककलावंतांची दखल घेतली गेल्याची भावना लोककलावंत व्यक्त करत आहेत.


 1. जॅक्स डबोके, ओकाईम फ्रँक, मायकल हेंडरसन या तिघांनाही यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. पदार्थांच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी जे योगदान दिले त्याचमुळे हे नोबेल त्यांना दिले जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
 2.  जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून नोबेल या पुरस्काराची ओळख आहे. मंगळवारी पदार्थ विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले, त्यानंतर बुधवारी रसायन शास्त्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले. ‘ हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
 3. डबोके, फ्रँक आणि हेंडरसन या तिघांनी पदार्थाच्या जैव रेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या तिघांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळे जैवरेणू गोठवून त्यांचा अभ्यास करणे हे संशोधकांना सोपे जाणार आहे.
 4.  १९०१ पासून आजवर रसायनशास्त्रासाठी १०९ नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये १७० पेक्षा जास्त वैज्ञानिकांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो ते आल्फ्रेड नोबेल हे रसायनशास्त्रज्ञच होते.
 5. फ्रेडरिक सँगर या  ब्रिटीश बायोकेमिस्टला १९५० ते १९८० या दरम्यान दोनवेळा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. साहित्यातील नोबेल आणि शांततेचे नोबेल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नोबेल समितीने दिली.


Top