S-400 system will make India 'Powerful'

 1. भारताने आज रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली तर कदाचित अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घातले जाऊ शकतात.
 2. मात्र अमेरिकेची नाराजी ओढवून घेऊनही भारत हा पाच अब्ज डॉलरचा करार करण्यावर ठाम आहे. त्यामागे काही कारणे आहेत.
 3. एस-४०० सिस्टिम:-
  1. एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे.
  2. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे.
  3. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.
  4. जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.
  5. एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे.
  6. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.
  7. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० फायटर तसेच टेहळणी विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलचा लक्ष्यभेद करु शकते. ही सिस्टम एकाचवेळी १०० लक्ष्यांचा माग काढू शकते.
  8. अमेरिकेचे रडारला न सापडणारे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमानही या सिस्टिमच्या नजरेतून सुटू शकत नाही.
  9. २००७ सालापासून रशियाने एस-४०० चा वापर सुरु केला. मॉस्कोच्या सुरक्षेसाठी ही सिस्टिम तैनात आहे. २०१५ साली रशियन नौदल आणि फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी सीरियामध्ये ही सिस्टिम तैनात करण्यात आली.


The Vishnudas Bhave Award for the year 2018 has been announced by Dr. Mohan Agashe

 1. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली च्या वतीने देण्यात येणारा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे.
 2. रंगभूमीदिनी 5 नोव्हेंबर 2018 रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 3. दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणा-या ज्येष्ठ कलाकारास विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 4. मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते.गौरव पदक,स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ व पंचवीस हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 5. डॉ. मोहन आगाशे यांची कारकीर्द मोठी असून एमबीबीएसच्या शिक्षणानंतर त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. लहानपणापासूनच त्यांनी सई परांजपे यांच्या बालनाट्यात काम करायला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर 1958 ला त्यांनी पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशनच्या नाटकांमधून लक्ष वेधून घेतले.
 6. अशी पाखरे येती या नाटकावेळीच ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीसांची भूमिका दिली.
 7. या व्यक्तिरेखेमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले. या नाटकाचे त्यांनी सलग वीस वर्षे देश-परदेशात आठशेहून अधिक प्रयोग केले.
 8. धन्य मी कृतार्थ मी, तीन पैशाचा तमाशा, बेगम बर्वे, तीन चोक तेरा, वासांशी जीर्णानी, सावर रे यासह इतर नाटकांतही काम केले.
 9. अलीकडे ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचेही त्यांनी अडीचशेवर प्रयोग केले आहेत. ‘सामना’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
 10. त्यानंतर जैत रे जैत, सिंहासन, एक होता विदूषक, देवराई, वळू, विहीर या मराठी चित्रपटांबरोबरच निशांत, आक्रोश, मशाल, मृत्युदंड, गंगाजल, अपहरण, रंग दे बसंती या हिंदी चित्रपटातही त्यांच्या भूमिकांना रसिकांसह समीक्षकांची पसंती मिळाली.
 11. 2013 मध्ये बारामती येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
 12. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक हजार भूकंपग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे.  बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी व वेगळ्या पध्दतीने मुलांची नाटके सादर करणा-या ‘ग्रिप्स’ चळवळीचा परिचय त्यांनी भारतीय रंगभूमीला करून दिला. 
 13. डॉ. मोहन आगाशे यांना 2002 मध्ये आर्डर अॉफ मेरीट अॉफ द फेडरल रिपब्लीक अॉफ जर्मनी या पुरस्काराने आणि मार्च 2004 मध्ये गोएथे पदकाने सन्मानित करण्यात आले.
 14. 1990 च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले.
 15. 1996 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार , 1998 मध्ये  ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.


GI rating for Konkona haapus mango

 1. कोकणातल्या हापूस आंब्यालाला अखेर जीआय मानांकन मिळालं आहे. जीआयमुळे हापूसच्या मूळ उत्पादनाची जागा, त्याची चव, दर्जा याबद्दलची मान्यता मिळाली असल्याने हापूसला स्वत:ची ओळख मिळाली, असेही म्हणता येईल.
 2. 2008 पासून कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. मात्र या प्रस्तावाला अनेक हरकती आल्यामुळे कोकणच्या हापूसचे जीआय मानांकन रखडले होते.
 3. मात्र 3 ऑक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावानं हापूसला जीआय मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे जीआय प्रमाणपत्र मिळालेला हापूस आंबा 139 वा फळ ठरला आहे.
 4. यापूर्वी 323 जीआय मानांकन प्रमाणपत्र भारत सरकारतर्फे देण्यात आली आहेत.
 5. कोकणच्या हापूसचा 324 वा क्रमांक आहे. यापूर्वी आंब्यांमध्ये मराठवाड्याच्या केशर आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे.
 6. तर कोकणातील कोकमालाही यापूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे.
 7. हापूसला जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा हापूसच्या उत्पादकांबरोबरच हापूसच्या खरेदीदारांनाही मिळणार आहे. कोकणातून येणारा हापूस आता जीय मानांकनाच्या लोगोसह बाजारात येण शक्य होणार आहे.
 8. जीआय मानांकन:-
  1. विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.
  2. भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.
  3. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते.
 9. जीआय मानांकनामुळे होणारे फायदे :
  1. शेतीमालास प्रतिष्ठा
  2. शेतीमालाची नेमकी ओळख
  3. गुणवत्तेची खात्री
  4. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी


Dennis Mukewege and Nadia Murad declare Nobel Peace

 1. ​​​​​​​शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या 2018 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहेत. 
 2. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
 3. या दोघांनीही युद्धभूमीवर लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा सुरु केला होता.
 4. यावर्षीच्या शांततेसाठीच्या नोबेलसाठी एकूण 331 जणांना नामांकन देण्यात आलं होतं. यात 216 व्यक्ती तर 115 संघटनांचा समावेश आहे.
 5. 2016 साली शांततेसाठीच्या नोबेलसाठी 376 व्यक्तींना नामांकन देण्यात आलं होतं, त्यामुळे यावर्षी नामांकनासाठीची दुसरी सर्वात मोठी संख्या होती.
 6. आतापर्यंत शांततेसाठी 98 नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत. ज्यात 104 व्यक्ती आणि 27 संघटनांचा समावेश आहे. एकूण 104 नोबेल विजेत्यांपैकी 16 महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 7. 2017 साली ICAN संस्थेला शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 8. ही संस्था आण्विक शस्त्रांविरोधात काम करते. इंटरनॅशनल कँपेन टू एबोलिश न्यूक्लीअर वेपन्स असं या संस्थेचं पूर्ण नाव आहे.


Major General of the country for the first time in Bangladesh Army

 1. बांगलादेशातील इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात मेजर जनरल होण्याचा मान डॉ. सुसाने गिती यांच्या रूपाने एका महिलेला मिळाला आहे.
 2. गिती या सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथालॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
 3. त्या एमबीबीएस असून त्यांच्याकडे MCPS, FCPS, MMAD या पदव्याही आहेत.
 4. त्यांचे पती निवृत्त ब्रिगेडियर जनरल असदुल्ला हसिन साद हे स्वतः एक सैन्यातील फिजिशियन होते.
 5. गिती यांनी १९८५ मध्ये राजशाही वैद्यकीय महाविद्यालयातून आपली डॉक्टरकीची पदवी घेतली.
 6. त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये सेन्यदलात कॅप्टन पदावर फिजिशियन म्हणून कामास सुरुवात केली.
 7. १९९६साली हेमॅटॉलॉजी विषयात FCPS पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहीमेत त्यांनी पॅथालॉजिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


Top