1. डोकलाम आणि लडाखमध्ये भारत- चीनचे सैन्य आमने-सामने आल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. सुमारे तासभर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत डोकलामसारखी स्थिती पुन्हा नको, असा सूर दोन्ही नेत्यांनी आळवला.
 2. चीनमधील शियामेन येथे ब्रिक्स परिषद सुरु असून या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.  डोक लाम आणि लडा येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला असताना ही चर्चा झाली. या चर्चेकडे जगभराचे लक्ष लागले होते. चर्चेनंतर भारताचे परराष्ट्र सचिव एस.
 3. जयशंकर यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली. दोन्ही देशातील सैन्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये  चांगले संबंध निर्माण होण्यासाठी शांतता आवश्यक असून यासाठी सीमवेर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
 4. डोकलामच्या मुद्द्यावर काही चर्चा झाली का याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता जयशंकर म्हणाले, भविष्याचा विचार करुन दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. भूतकाळात काय झाले यापेक्षा यापुढील वाटचालीवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.  मसूद अझहरविषयी चर्चा झाली का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.
 5. यावर ते म्हणाले, या विषयावर चर्चा झाली नाही.मात्र ब्रिक्स परिषदेतील घोषणापत्रात  दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचे स्पष्ट होते. द्विपक्षीय चर्चेपूर्वी शी जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत केले. तर मोदींनीही शाही स्वागतासाठी जिनपिंग यांचे आभार मानले.


भारताच्या लष्करात सुधारणा करण्याच्या प्रथम टप्प्याला मंजूरी

 1. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराच्या सोबत विचाराअंती भारतीय लष्करात योजनाबद्ध पद्धतीने सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. या प्रक्रियेच्या प्रथम टप्प्यात अधिकारी/JCO/OR आणि अन्य कर्मचार्‍यांच्या सुमारे 57,000 पदांचे पुनर्गठन केले जाणार.

प्रथम टप्प्यात समाविष्ट बाबी:-

 1. अधिकाधीक उपयोगासाठी रेडियो देखरेख कंपनी, कोर्प्स एयर सपोर्ट सिग्नल रेजिमेंट, एयर फॉर्मेशन सिग्नल रेजिमेंट, संयुक्त सिग्नल रेजीमेंट या संकेत प्रदान करणार्‍या आस्थापणांचे तसेच कोर्प्स ऑपरेटिंग आणि इंजीनियरिंग सिग्नल रेजिमेंट यांना विलीन केल्यानंतरच्या आस्थापणांचे अनुकूलन करणे.
 2. लष्करामधील दुरूस्ती केंद्रांची पुर्नसंरचना करणे. त्याअंतर्गत लष्करातील बेस वर्कशॉप, एडवांस बेस वर्कशॉप आणि स्टेटिक/स्टेशन वर्कशॉप यांचा समावेश केला जाईल.
 3. आयुध विभागाची पुर्नसंरचना करणे. त्याअंतर्गत इन्व्हेंटरी कंट्रोल यंत्रणेच्या पुनर्रचनेसोबतच वाहन डिपोट, आयुध डिपोट आणि केंद्रीय आयुध डिपोट यांचा समावेश केला जाईल.
 4. पशु परिवहन यूनिट आणि पुरवठा व परिवहन विभागांचा चांगला उपयोग केला जाईल.
 5. शांतीपूर्ण क्षेत्रांमधील मिलिटरी फार्म आणि सैन्य डाक आस्थापने बंद करणे.
 6. लष्करामधील वाहन चालक आणि लिपिकांच्या पदभर्तीसाठी मानकीकृत उच्च स्तरीय प्रक्रिया आणणे.
 7. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या कार्यक्षमतेत सुधारणा आणणे.
 8. सुरूवातीला 39 मिलिटरी फार्म बंद करण्यास सुरुवात केली जाणार आहे. या सुधारणा 31 डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केल्या जातील. यामधून भारतीय लष्कराची कार्यक्षमता आणि युद्ध क्षमता यांच्यात वृद्धी करण्याच्या उद्देशाने कार्य होणार आहे.


5 सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस साजरा

 1. संयुक्त राष्ट्रसंघ आज 5 सप्टेंबरला ‘आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस (International Charity Day)’ साजरा करीत आहे. हा दिवस जागतिक स्तरावर एकजुटीची भावना व्यक्त करते आणि विशेषत: गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देते.
 2. हा दिवस सूक्ष्म उपक्रमे ते सहकारी संस्था ते बहुराष्ट्रीय कंपन्या आणि नागरी समाज संस्था आणि लोकोपकारी संस्था अश्या विविध खाजगी क्षेत्रांची नव्या कार्यक्षेत्राच्या अंमलबजावणीमध्ये भूमिका दर्शवते.
 3. तसेच 1979 साली नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कोलकाता (भारत) येथे सेवा देणार्‍या मदर टेरेसा यांची पुण्यतिथी साजरी करण्याकरिता 5 सप्टेंबर या तारखेची निवड करण्यात आली.

धर्मादाय करण्याची गरज का आहे?

 1. स्वयंसेवा आणि लोकोपत्काराच्या विचारांप्रमाणे दान केल्याने वास्तविक सामाजिक संबंध प्रस्थापित होतात आणि सर्वसमावेशक समुदाय तयार होण्यास मदत होते. यामधून आपत्ती काळात मानवतावादी कार्ये पार पाडण्यास मदत होते.
 2. संस्कृती, विज्ञान, क्रीडा आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपण्यास मदत होते.

मदर टेरेसा यांचे जीवन आणि कार्य:-

 1. मदर टेरेसा या एक अल्बेनियन-भारतीय रोमन कॅथोलिक साध्वी आणि मिशनरी होत्या. त्यांचा जन्म स्कोप्जे (आता मॅसिडोनिया) येथे झाला होता.
 2. 18 वर्षे मॅसिडोनिया मध्ये वास्तव्यानंतर, त्या आयर्लंड मध्ये आल्या आणि तेथून मग त्या भारतात आल्या, येथे त्यांनी त्यांचे उरलेले आयुष्य घालविले.
 3. 5 सप्टेंबर 1997 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
 4. मदर टेरेसा या माणुसकीच्या एक खर्‍या अनुयायी होत्या. त्यांना "प्रभु येशू चा अवतार" मानले जात होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील गरजू व बेबंद लोकांची सेवा करण्यासाठी झोकून दिले.
 5. त्यांना भारताचे नागरिकत्व 1948 पासून ते 1997 पर्यंत मिळालेले होते. त्यांना 1962 मध्ये पद्मश्री आणि 1969 मध्ये  जवाहरलाल नेहरू पुरस्कार देखील मिळाला. त्यांना 1980 मध्ये भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांचे अधिकृत चरित्र 'मदर टेरेसा' नावाने नवीन चावला या भारतीय नागरी सेवकाने लिहिलेले आहे आणि ते 1992 मध्ये प्रकाशित झाले होते.
 6. पोप फ्रान्सिस यांनी 4 स्पटेंबर ला व्हॅटिकन सिटी मधील सेंट पीटर च्या स्क्वेअर येथे आयोजित संतांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या कार्यक्रमात मदर टेरेसा - एक संत म्हणून घोषित केले.
 7. त्यांच्या जीवनकाळात मोठ्या प्रमाणावर गरिबांची सेवा करण्याच्या उद्देशाने केलेल्या मानवतावादी कार्यासाठी “saint of the gutters” म्हणून ओळखल्या जाणार्‍या मदर टेरेसा या मृत्यू (1997) झाल्यानंतर अवघ्या 19 वर्षातच संत म्हणून घोषित करण्यात आलेल्या एकमेव आहेत.

पार्श्वभूमी:-

 1. मानवतावादी संकटात आणि मानवी दु:ख कमी करण्यासाठी आणि यासाठी होणार्‍या देशांमधील धर्मादाय संस्था आणि व्यक्तींच्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ आणि मदर टेरेसा यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाने ठरावामधून 5 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय दानधर्म दिवस’ म्हणून पाळण्याचे स्वीकारले.


BRICS देशांच्या नेत्यांनी ‘झियामेन घोषणापत्र’ अंगिकारले         

 1.  4 सप्टेंबर 2017 रोजी चीनच्या झियामेन शहरात "BRICS: स्ट्रॉंगर पार्टनरशीप फॉर ए ब्राइटर फ्युचर" या संकल्पनेखाली पार पडलेल्या नवव्या BRICS शिखर परिषदेत BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रिका) देशांच्या नेत्यांनी ‘झियामेन घोषणापत्र’ अंगिकारले.
 2. घोषणापत्रात सर्वप्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्याकरिता व्यापक दृष्टिकोन अवलंबण्यास सर्व देशांनी सहमती दर्शवलेली आहे.

घोषणापत्रात समाविष्ट ठळक बाबी:-

 1. प्रदेशातल्या सुरक्षाविषयक परिस्थितीसंदर्भात आणि तालिबान, ISIL/DAISH, अल-कायदा आणि त्यांच्याशी संलग्न संस्था, जश्या  ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट, इस्लामिक मूव्हमेंट ऑफ उझबेकिस्तान, हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा, जयश-ए-मोहम्मद, TTP आणि हिजाब उत-ताहरिर यांच्याद्वारा केल्या जाणार्‍या हिंसाचाराविषयी आपले विचार मांडले आहेत.
 2. 2006 साली स्थापन केलेल्या BRICS ने परस्पर संबंध, समजूत, समानता, एकता, मोकळेपणा, सर्वसमावेशकता आणि परस्पर लाभकारी सहकार्य दाखविलेले आहे.

BRICS नेत्यांनी पुढील बाबींना सहमती दर्शवली:-

 1. विकासाला चालना देण्यासाठी व्यावहारिक सहकार्य वाढवणे.
 2. अधिक न्यायसंगत आंतरराष्ट्रीय आर्थिक आचारसंहिता वाढवण्यासाठी जागतिक आर्थिक प्रशासन सुधारणे.
 3. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेचे रक्षण करण्यासाठी न्याय कारवाई करण्यावर भर देणे.
 4. सांस्कृतिक विविधतेची जपवणूक आणि त्याला प्रोत्साहन देणे.
 5. वित्तीय लेखा प्रक्रीयेसंबंधी मानके तयार करणारे आणि ऑडिट रेग्युलेटर यांच्यात सहयोग आणि समन्वय प्रस्थापित करण्यास प्रोत्साहन देणे.
 6. BRICS स्थानिक चलन कर्जरोखे बाजारपेठांच्या विकासास प्रोत्साहन दिले जाईल आणि BRICS स्थानिक चलन कर्जरोखे निधीची स्थापना केल्या जाणार आहे.
 7. BRICS देशांच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वाने सहकार्य करण्यासाठी वित्तमंत्र्यांनी आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांनी केलेल्या कराराबाबत चर्चा करण्यात आली.
 8. याशिवाय, विभिन्न क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सहमती दर्शवलेली आहे.

BRICS समूह:-

 1. BRICS हा ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे.
 2. 2011 मध्ये BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS नाव दिले गेले.
 3. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.  


Top