Former ICC president is now the chairman of the Pakistan Cricket Board

 1. आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
 2. मणी यांना ३ वर्षांसाठी या पदावर नियुक्त केले असून मंगळवारी (४ सप्टेंबर) याबाबतची अधिकृत माहिती पीसीबीच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.
 3. मणी यांनी लगेचच पदभार स्वीकारला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संचालक मंडळाने ही निवड केली आहे. आतापर्यंत या पदावर नजाम सेठी विराजमान होते.
 4. २१ ऑगस्टला त्यांनी आपला पदभार सोडला. राजीनामा देताना त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
 5. पेशाने लेखापरीक्षक (सीए) असलेल्या मणी यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना या पदी नियुक्त करण्यात आले आहे. १९८९ ते १९९६ या काळात त्यांनी पाकिस्तानचे ‘आयसीसी’त प्रतिनिधित्व केले.
 6. त्यानंतर २००३ साली त्यांची ICCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.


T-Twenty World Cup hero RP Singh retires from cricket

 1. भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या पहिल्या टी ट्वेण्टी विश्वचषकाचा हिरो आर पी सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
 2. एकेकाळी टीम इंडियाच्या मध्यमगती गोलंदाजीचा कणा असलेल्या आर पी सिंहने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. 32 वर्षीय आर पी सिंहने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं ट्विट केलं.
 3. योगायोग म्हणजे आर पी सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण 4 सप्टेंबरलाच 2005 रोजी केलं होतं. त्यानंतर त्याने निवृत्तीही 4 सप्टेंबरलाच घेतली.
 4. अत्यंत भावनिक होत आर पी सिंहने ट्विट केलं आणि आपण याच दिवशी 4 सप्टेंबर 2005 रोजी टीम इंडियाची जर्सी घातली होती, असं म्हटलं.
 5. आर पी सिंहने 2007 मधील भारताने जिंकलेल्या टी 20 विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 6. संपूर्ण मालिकेत 12 विकेट घेत तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.
 7. आर पी सिंहचं क्रिकेट करियर जवळपास 6 वर्षांचं राहिलं. तीनही फॉरमॅटमध्ये त्याने 82 सामने खेळत 100 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. आर पी सिंहने 14 कसोटीत 40 विकेट्स, 58 वन डे सामन्यात 69 विकेट्स आणि 10 टी ट्वेण्टी सामन्यात 15 विकेट्स घेतल्या.
 8. एकेकाळी आर पी सिंह हा भारताचा प्रमुख गोलंदाज होता. धोनीच्या नेतृत्त्वात त्याने उत्तम कामगिरी केली होती. त्याने धोनीचाही विश्वास संपादन केला होता. मात्र 2011 नंतर आर पी सिंहला टीम इंडियात स्थान मिळालंच नाही.


Top