New year's 'long-term capital gains tax' proposal

 1. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वर्ष 2018-19 च्या अर्थसंकल्पात समभाग आणि म्युचुअल फंड्स यावर दीर्घकालीन भांडवल प्राप्ती कर (Long-Term Capital Gain Tax) लागू करण्याची घोषणा केली आहे.
 2. प्रस्तावानुसार, समभाग आणि म्युचुअल फंड्स यापासून प्राप्त झालेल्या 1 लक्ष रुपयांहून अधिक लाभावर दीर्घकालीन 10% कर आकाराला जाणार आहे. 
 3. आधी आपण भांडवल आणि भांडवल प्राप्ती कर म्हणजे काय ते जाणून घेऊया.
 4. भांडवल प्राप्ती कर:-
  1. भांडवल प्राप्ती म्हणजे कोणत्याही भांडवलापासून मिळणारा लाभ होय. भांडवलामध्ये घर, संपत्ती, अलंकार, गाडी, समभाग, ऋण बंध (Bond) आदींचा समावेश होतो.
  2. अश्या प्रकारच्या संपत्तीला देशाची संपत्ती मानली जाते आणि त्यावर मालमत्ता कर म्हणून एक कर सुद्धा आकारते, ज्याला भांडवल प्राप्ती कर म्हणून संबोधले जाते.
  3. या करांचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. स्थावर मालमत्ता, जसे की भूखंड, इमारत, घर गाडी आदी, याच्या बाबतीत LTCG कराचा कालावधी वित्त वर्ष 2017-18 पासून 2 वर्ष करण्यात आला.
  4. अस्थावर मालमत्ता, जसे की अलंकार, ऋण बंध, निश्चित कालावधीचे म्युचुअल फंड आदि, यांच्या बाबतीत हा कालावधी 3 वर्षांचं आहे.
  5. तोच समभागांच्या बाबतीत 1 वर्ष केला गेला आहे. याचप्रमाणे वेगवेगळ्या कालावधीसाठी LTCG कर दर वेगवेगळा असतो.

प्रस्तावित कर योजना

 1. आयकर कायद्याच्या कलम 10 (38) अन्वये सध्या समभागाच्या विक्रीसमयी STT (सेक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स) दिले गेले असल्यास 1 वर्षापासून गुंतवून ठेवलेल्या समभागावर मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. सध्या 1 वर्षाहून कमीच्या कालावधीसाठी राखून ठेवलेल्या समभागांच्या विक्रीपासून मिळणार्‍या लाभावर 15% दराने लघुकालीन भांडवल प्राप्ती कर लागू आहे आणि पुढेही चालू असणार.
 2. 1 एप्रिल 2018 पासून सुरू होणार्‍या नव्या वर्षापर्यंत समभागांच्या विक्रीवर किंवा म्युचुअल फंड्सच्या विक्रीवर कोणताही कर लागू केला जाणार नाही. मात्र त्यानंतर नवा कर नियमांनुसार लागू केला जाणार आहे.
 3. सध्या समभाग नसलेल्या म्युचुअल फंड योजनांवर 3 वर्षांनंतर LTCG कर लागू केला जातो. त्यापेक्षा अधिकच्या कालावधीत इंडेक्सेशननंतर 20% दराने LTCG कर लागू केला जातो. वर्ष 2004-2005 मध्ये हा LTCG कर तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी हटवला होता.


Using the developed vaccine on the cancerous heart of the cancer in the Stanford test

 1. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील संशोधकांनी कर्करोगावर उपचार करण्यासाठी एक लस शोधून काढलेली आहे.
 2. भविष्यात कर्करोगाला आळा घालणारी एक लस विकसित होण्यासाठी यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.
 3. प्रा. रोनाल्ड लेव्ही यांच्या नेतृत्वात संशोधकांच्या या चमूने या औषधाचा उपयोग कर्करोगाने ग्रस्त उंदरावर एका प्रयोगात केला.
 4. संशोधकांनी उंदीराच्या गाठीमध्ये दोन घटकांना सुईद्वारे सोडले, ज्यामुळे उंदरांची रोग प्रतिकारक क्षमता वाढली.
 5. या औषधीचे अगदी थोडे प्रमाण वेगाने कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात सक्षम आहे. यामध्ये खर्च देखील कमी आहे.
प्रयोगाबाबतच्या महत्त्वपूर्ण बाबी
 1. या उपचार पद्धतीमध्ये, औषध पूर्ण शरीरात सक्रियपणे कार्य करीत नसून, त्याचा परिणाम फक्त गाठीच्या आतमधील पेशींची कर्करोगाच्या विरोधात प्रतिकारक क्षमतेला सक्रिय करते. प्रयोगात असे आढळून आले आहे कि, उंदीराच्या संपूर्ण शरीरातील कर्करोगग्रस्त गाठी नष्ट झाल्या.
 2. साधारणपणे रोगप्रतिकारक क्षमता प्रणालीच्या माहितीत कर्करोग एक अनोळखी बाह्य तत्त्व म्हणून ओळखला जातो.
 3. रोगप्रतिकारक पेशी मुख्यताः T-पेशी कर्करोगामध्ये उपस्थित या वेगळ्याप्रकारच्या पेशींची ओळख करून घेते आणि त्यांना नष्ट करण्यास काम चालू करते. मात्र तरीही कर्करोगाच्या पेशींची वाढ होतच असते आणि गाठी वाढतच जातात.
 4. प्रयोगात या गाठीमध्ये जेव्हा नवे औषध सोडले गेले, तेव्हा T-पेशी पुन्हा एकदा सक्रिय होतात आणि कर्करोग नष्ट करण्यात मदत होते.
 5. अलीकडेच मनुष्यामध्ये आढळणार्‍या लिम्फेटिक कर्करोग (लिम्फोमा) च्या उपचारासाठी जानेवारीमध्ये एक प्रयोगात या औषधीचा वापर केला होता. हा शोधाभ्यास 'सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन' नामक नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आला.


Bala Anand Chopade appointed as BHU Vice-Chancellor

 1. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बाळू आनंद चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. गेल्यावर्षी बीएचयूमध्ये मुलींची छेडछाड झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होते.
 3. ही परिस्थिती हाताळण्यात बीएचयूचे कुलगुरू प्रा. जी एस त्रिपाठी यांना अपयश आल्यामुळे त्यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठविण्यात आले होते. त्यामुळे सध्या बीएचयूमधील कुलगुरुपद रिक्त होते.
 4. त्यानंतर कोणतेही आरोप नसलेले आणि पदासाठी पात्र ठरणारे कुलगुरू शोधण्याचे प्रक्रिया राष्ट्रपतींनी सुरू केली होती.
 5. बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडे यांची मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ४ जून २०१४ रोजी नियुक्ती करण्यात आली होती.


Balarangbhoomi's born Sudha Karmarkar dies

 1. मराठी बालरंगभूमीच्या जन्मदात्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका सुधा करमरकर यांचे  हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले.
 2. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. मिलिंद करमरकर आहे. 
 3. शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला.
 4. यावेळी जयंत सावरकर, विजय केंकरे, लीला हडप, विलास गुर्जर, संजय क्षेमकल्याणी, प्रवीण कारळे, अरविंद पिळगावकर, अरुण काकडे, श्रीनिवास नार्वेकर, सुचित्रा बांदेकर, मधुरा वेलणकर, तुषार दळवी, विनय येडेकर, अशोक समेळ, रमेश भाटकर आदी उपस्थित होते.
 5. अखेरच्या श्‍वासापर्यंत सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीला वाहून घेतले होते.
 6. 2 ऑगस्ट 1969 रोजी केवळ बालनाट्याला वाहिलेली लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमीची स्थापना त्यांनी केली होती. या रंगभूमीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. नाट्यशिक्षणासाठी करमरकर परदेशी गेल्या.
 7. त्यांनी अमेरिकेत बालरंगभूमी अभ्यासली. तिथे त्यांनी मुलांची नाटके पाहिली, आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.


P. V. The runner-up of Sindhu 'India Open' competition

 1. ‘इंडिया ओपन’ या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूचा अमेरिकेच्या बिवेन झँग कडून पराभव झाला आणि सिंधू स्पर्धेची उपविजेती ठरली आहे.
 2. इंडिया ओपन ही 2008 सालापासून भारतात आयोजित केली जाणारी बॅडमिंटन स्पर्धा आहे.
 3. वर्ष 2011 मध्ये याला BWF सुपरसिरिज स्पर्धेत रूपांतरित केले गेले. तेव्हापासून नवी दिल्लीत सिरीफोर्ट क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा खेळली जाते.
 4. स्पर्धेचे अन्य विजेते:-
 5. पुरुष एकेरी गट - चीनचा शी युकी (तायवानच्या चौ तीएन चेन चा पराभव)
 6. महिला एकेरी गट- अमेरिका बिवेन झँग(भारताच्या पी. व्ही. सिंधूचा पराभव) 
 7. मिश्र दुहेरी गट – मॅथियस ख्रिस्तियनसेन व ख्रिस्टिना पेडरसन (डेन्मार्कची जोडी)
 8. महिला दुहेरी गट – ग्रेसिया पोली आणि अप्रियानी राहायु (इंडोनेशियाची जोडी)


 Five Indian cricketers have won the ICC Under-19 World XI

 1. पाच भारतीय क्रिकेटपटूंनी 11 सदस्यांच्या ‘ICC अंडर-19 वर्ल्ड XI’ संघात जागा मिळवलेली आहे.
 2. ‘ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ च्या संघातील या पाच भारतीयांमध्ये कर्णधार पृथ्वी शॉ, मंजोत कालरा आणि शुभमन गिल हे तीन फलंदाज तर अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटी या दोन गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
 3. या संघाचा कर्णधार म्हणून रेनॉर्ड वान टोंडर (दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार) याला घोषित करण्यात आले आहे.
 4. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे.
 5. सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
 6. ICC मध्ये 105 सदस्य आहेत, त्यात 12 पूर्ण सदस्य जे कसोटी सामने खेळतात, 37 सहयोगी सदस्य आणि 56 संलग्न सदस्य आहेत.
 7. याचे मुख्यालय संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईमध्ये आहे.


Top