1. नेपाळ मधील ज्येष्ठ नेते आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.
  2. नेपाळच्या संसदेत झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत देऊबा यांना ३८८ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ १७० मतांवर समाधान मानावे लागले.
  3. गेल्या महिन्यात माओवादी नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नेपाळचे पंतप्रधानपद रिक्त झाले होते.
  4. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर देऊबा यांची पंतप्रधान पदावर निवड झाल्याने ही अस्थिरता संपुष्टात आली आहे. तसेच नेपाळचे पंतप्रधानपद भूषणवण्याची देऊबा यांची ही चौथी वेळ आहे.


  1. ठाण्याचा सुपुत्र अमेय वायंगणकरने दुबईच्या बुडोकान कप २०१७ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून भारताला रजतपद मिळवून दिले.
  2. अमेयची निवड या वर्षाअखेरीस मलेशिया आणि इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या कराटेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली असून तो भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार आहे.
  3. बुडोकान कप २०१७  च्या माध्यमातून विविध देशांतील मार्शल आर्टसच्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
  4. तसेच या वर्षी या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि नेपाळ या देशातले खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचा मुकाबला करून रजतपदक जिंकून अमेयने विजयश्री खेचून आणली.


Top

Whoops, looks like something went wrong.