Oscar Awards 2018

 1. 90 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्काराचे सुत्रसंचलन अभिनेता जिम्मी किमेल यांनी केले.
 2. सन 2017 मध्ये निर्मित सर्वोत्तम चित्रपटांना बहुमान देण्यासाठी हा सन्मान दिला गेला. गईलर्मो डेल टोरो यांच्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले.
 3. पुरस्कारांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:-
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट – द शेप ऑफ वॉटर
  2. सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट – ए फँटॅस्टिक वुमन (स्पॅनिश)
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेता – गॅरी ओल्डमन (डार्केस्ट अवर)
  4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सिस मॅकडोरमंड (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
  5. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गईलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)
  6. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सॅम रॉकवेल (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)
  7. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ऍलिसन जेनी (आय, टान्या)
  8. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर – इकरस
  9. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म – डिअर बास्केटबॉल
  10. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड  चित्रपट – कोको
  11. सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गुण) – द शेप ऑफ वॉटर
  12. सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गीत) – रिमेंबर मी (कोको)
  13. सर्वोत्कृष्ट लिखाण (मूळ पटकथा) –  गेट आऊट
  14. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405
  15. सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) – द सायलेंट चाईल्ड
  16. सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – कॉल मी बाय युवर नेम
  17. सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा – डार्केस्ट अवर चित्रपट
  18. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – फॅन्टम थ्रेड
  19. सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन आणि ध्वनिमिश्रण – डंकर्क
  20. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन – द शेप ऑफ वॉटर
  21. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्लेड रनर 2049
  22. सर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क
ऑस्कर पुरस्कार
 1. ऑस्कर पुरस्काराबद्दल:-
  1. "ऑस्कर पुरस्कार" या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतील चित्रपट उद्योगात चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) द्वारा 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.
  2. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता. 1930 साली पुरस्कार सोहळा पहिल्यांदा रेडिओ वर प्रसारित केला गेला होता आणि 1953 साली याचे प्रथमच दूरदर्शन (TV) प्रक्षेपण केले गेले होते.
 2. सन्मानचिन्हाचा इतिहास:-
  1. "ऑस्कर” ची मूळ रचना MGM कला दिग्दर्शक सेडरीक गिबोन्स यांच्याकडून केली गेली होती. प्रारंभीक चिन्हात एक नाइट (सैनिक) हातात तलवार आणि चित्रपटफिती घेऊन उभा आहे असा पुतळा होता.
  2. नवीन चिन्ह शिकागो मधील पुरस्कार बनवणारी RS ओवेन्स अँड कंपनी कडून 1982 सालापासून बनवण्यात येत आहे. प्रतिमेची उंची 13½ इंच आहे आणि वजन 8½ पाउंड असते. प्रतिमा ब्रिटानिया धातूपासून बनविली जाते. त्यावर तांबे, निकेल, चांदी आणि शेवटी 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढविण्यात येतो.
 3. लक्षात घेण्यासारख्या बाबी:-
  1. रचेल मॉरिसन ही ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी नामांकन मिळालेली प्रथम महिला आहे.
  2. जॉर्डन पिले हा मूळ पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला आफ्रिकी वंशाचा अमेरिकेचा निवासी आहे.
  3. गईलर्मो डेल टोरो हा पाच वर्षांमध्ये चौथ्यांदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा मॅक्सिकोचा एकमेव दिग्दर्शक आहे.


Seed bank is being restructured due to increasing arctic temperature

 1. आर्क्टिक पर्वतात उभारलेल्या अण्वस्त्राच्या हल्ल्यात उद्भवणार्‍या तापमानातही टिकून राहू शकणार्‍या जगातील सर्वात मोठ्या ‘स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट’ या बियाणे बँकेची पुनर्रचना केली जात आहे.
 2. परंतु उष्ण तापमानाने त्या सभोवतालचे वातावरण विस्कळित झाले आहे. 
 3. त्यामुळे बर्फाचा पृष्ठभाग, ज्यामुळे व्हॉल्टमध्ये नेहमी -18 डिग्री सेल्सिअस (-0.4 फॅरनहाइट) तापमान राखण्यास मदत होते, ते वर्ष 2016 मध्ये वितळला आणि त्या पाण्याने आतमध्ये प्रवेश केला. शिवाय आर्क्टिक पृथ्वीच्या अन्य भागांच्या तुलनेत दुप्पट वेगाने तापत आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे संरक्षणार्थ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
 4. ‘स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट’ संबंधी:-
  1. युद्धे किंवा नैसर्गिक संकटांमधून जागतिक पिकांच्या जैवविविधतेचा समूळ नाश होण्याच्या धोक्यापासून त्यांना संरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेली जगातली सर्वात मोठी बँक (जागा/साठा) आहे.
  2. उत्तर ध्रुवापासून सुमारे 1,000 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायम गोठलेल्या प्रदेशात एका अलिप्त बेटावर भूमिगत अशी एक जनुकीय बँक आहे. हे ठिकाण नॉर्वेचा मुख्य भूप्रदेश आणि उत्तर ध्रुव दरम्यान स्वालबार्ड द्वीपसमूह येथे स्थित आहे.
  3. जगातील इतर बियाणे बँका नष्ट झाल्यास एक मास्टर बॅकअप म्हणून 2008 साली उघडली गेलेली बँक आहे.
  4. कंसंल्टेटीव ग्रुप ऑन इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर रिसर्च (CGIAR) यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञ कॅरी फ्लॉवर यांनी ही बँक सुरू केली.
  5. ही बँक नॉर्वे सरकार, ग्लोबल क्रॉप डायव्हर्सिटी ट्रस्ट (GCDT) आणि नॉर्डिक जेनेटिक रिसोर्स सेंटर (NordGen) यांच्या दरम्यान झालेल्या तिहेरी करारांतर्गत व्यवस्थापित केली जाते.
  6. आर्क्टिक बेटावरील जागतिक बियाणांच्या या हिमाच्छादित बँकेची 4.5 दशलक्ष नमूने संग्रहित करून ठेवण्याची क्षमता आहे.
बियाणे बँकाचे महत्त्व
 1. बियाणे बँकेत साठवलेल्या बियाणांमुळे युद्धे किंवा नैसर्गिक संकटांमधून नष्ट होण्याचा धोका असलेल्या पिकांचे वाण संवर्धित करता येतात.
 2. त्यामुळे जागतिक पिकांची जैवविविधता राखता येऊ शकणार आहे.
 3. शिवाय, पुनर्गठीत केलेली बियाणे हवामानाशी जुळवून घेणारी पिके विकसित करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
 4. यामधून समोर येणार्‍या प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यास मदत होईल.


Veteran actress Shammi died

 1. ज्येष्ठ बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री शम्मी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
 2. त्या ८९ वर्षांच्या होत्या.
 3. चित्रपटसृष्टीत त्यांचे मोलाचे योगदान असून २०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
 4. विनोदी भूमिकासांठी त्या ओळखल्या जायच्या. ‘कुली नं १’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
 5. छोट्या पडद्यावरील ‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’ आणि ‘फिल्मी चक्कर’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे त्या लक्षात राहिल्या होत्या.
 6. शम्मी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
 7. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
 8. फॅशन डिझायनर संदीप खोसलानेही सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.


Konrad Sangma is elected as the new Chief Minister of Meghalaya

 1. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) चे नेते कोनराड संगमा यांची मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. त्यांचा शपथविधी 6 मार्चला होणार आहे.
 3. अलीकडेच पार पडलेल्या मेघालय विधानसभा निवडणुकीनंतर, NPP-भाजपा युतीने राज्यात सरकार बनवण्याचा दावा केला आहे.
 4. 7 मार्चला आधीच्या विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे.
 5. भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
 6. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
 7. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
 8. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


Dr Akhil Bhartiya Sammelan was elected president. See Ramachandra

 1. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या सहयोगाने पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत दिनांक ७ व ८ एप्रिलला अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे.
 2. संमेलनाच्या अध्यक्षपदी  लोककला आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे, अशी माहिती  अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 3. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवसीय संमेलन होणार आहे.
 4. स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड झाल्याचे लोकरंग सांस्कृतिक मंचाचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे यांनी जाहीर केले होते. 
 5. संमेलनाध्यक्षांची ओळख:-
   
  1. डॉ. देखणे यांची ललित संशोधनात्मक, चिंतनात्मक अशी ४७ पुस्तके प्रसिद्ध झालीआहेत.
  2. कथा कादंबरी संत साहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहीत्यावरील संशोधनात्मक आणि सामाजिक विषयावरील वैचारिक ग्रंथ तसेच बालसाहित्याचा समावेश आहे.
  3. नाथांचे बहुरूपी भारूड यावर संशोधन केले असून त्यांच्या बहुरूपी भारुडाचे २१०० हून अधिक प्रयोग केले आहेत. 


India's Manu Bhaker gold medal in ISSF World Cup

 1. मॅक्सिकोच्या ग्वादलजारा शहरात ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर हिने महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
 2. या प्रकाराचे रौप्य मॅक्सिकोची अलेजांड्रा जवाला वजाक्वेज हिने तर कांस्यपदक सेलीन गॉबविलने जिंकले.
 3. 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 4. दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात.
 5. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे.
 6. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.


The Importance of Today's Day in History 6 march

महत्वाच्या घटना:-

१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.

१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले. २००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

 

जन्म
 1. १८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
 2. १९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.
 3. १९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

 

मृत्यू
 1. १९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे  यांचे निधन.
 2. १९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.
 3. १९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)
 4. १९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.
 5. २०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.


Top