1. 2017चा साहित्यातील नोबेल पुरस्कार ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना जाहीर झाला आहे.' नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स' या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 2. या पुरस्कारासाठी मार्गारेट  अॅटवूड, नूगी वा थिओंगो आणि हरुकी मुराकामी हे लेखकही शर्यतीत होते. मात्र, नोबेलवर अखेर इशिगोरो यांचे नाव कोरले गेले. 
 3. जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या ' नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स' या पुस्तकातून केल्याचे स्वीडिश अॅकेडमीने सांगितले आहे.
 4. इशिगोरो (वय 64 वर्षे) यांचा जन्म जपानमध्ये झाला असून ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबिय युकेमध्ये स्थलांतरित झाले. 
 5. इशिगोरो यांनी लिहीलेले ' द रिमेन्स ऑफ दि डे' (1989) या प्रसिद्ध कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे. इशिगोरो यांनी आठ पुस्तके लिहीली आहे त. त्याचबरोबर त्यांनी सिनेमा आणि टिव्ही कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे.


 1. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देत सुमारे 27 वस्तूंवरील कर कमी करण्यात आलेआहेत. यामुळे कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी 18 टक्क्यांऐवजी 12 टक्क्यांवर आला आहे. सर्व सामान्यांसह छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सरकारने दिवाळीची भेटच दिली आहे. 
 2. जीएसटीत सध्या  5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टप्पे असून या चार टप्प्यांमध्ये येणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याची मागणी होत होती. याशिवाय निर्यातदारांच्या समस्यांवरही तोडगा काढण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. 
 3. आयुर्वेदिक औषधांवर 12 टक्के कर होता. मात्र यापुढे आयुर्वेदिक औषधांवर 5 टक्के कर असेल. याशिवाय खाकरा, चपाती, नमकीन पदार्थांवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे. 
 4. तसेच याशिवाय पोस्टर कलरसह अनेक शालेय उपयोगी साहित्यांवर 28 ऐवजी 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. 
 5. प्लास्टिक वेस्ट, रबर वेस्ट आणि पेपर वेस्टवर पाच टक्के कर आकारण्यात येईल. तर आयजीएसटी (इंटरस्टेट) करिता निर्यातदारांना सहा महिन्यांचा दिलासा देण्यात आला. 
 6. निर्यातदारांसाठी एप्रिल 2018 पासून ई-वॅलेट सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही वित्त मंत्रीनी केली. 
 7. हातमागावर यापूर्वी 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता, तो आता 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.


 1. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रत्नागिरीतील कळकवणे, तर सिंधुदुर्गतील चार महसुली मंडळातील केळी पिकांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या आधी आंबा, काजू पिकांना ही योजना लागू आहे. या वर्षी विमा भरपाईही घेणाऱ्यांची संख्या व रक्कम दोन्ही वाढली आहे. 
 2. गेली दोन वर्षे येथील केळीचे उत्पादन वीस हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्यामुळे कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला या  वर्षी मान्यता देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या मागण्यानुसार या वर्षी केळी पिकासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळकवणे ( चिपळूण) महसुली मंडळाची निवड करण्यात आली आहे.
 3. या मंडळातील काही गटांनी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. वीस हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर येथील महसुली मंडळातून केळीचे पीक घेतले जाते. गेली दोन वर्षे अवकाळी  पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानभरपाई मिळालेली नव्हती. त्यासाठी कृषी विभागाने शासनाकडे केळी पिकासाठी या महसुली मंडळाचा विचार केला जावा, अशी मागणी केली होती.
 4. त्याला हिरवा कंदील मिळाला व या मंडळाचा समावेश झाला. त्याचे निकष उर्वरित  33 जिल्ह्याप्रमाणेच निश्‍चित केले आहेत. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  बांदा, मडुरा (सावंतवाडी),  तळकट, भेडसी (दोडामार्ग) या महसुली मंडळातील केळी पिकांसाठी पीक विमा योजना लागू केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सांगितले.


 1. पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यांमध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील गडांवर पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवास व्यवस्था उभी करण्याचा विचार आहे. 
 2. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावलयांनी सांगितले.
 3. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत  5 ते 25 ऑक्‍टोबर दरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. 
 4. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, कंपन्या यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.


Top