MPSC chalu ghadamodi, current affairs

1. विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे.

2. तर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वाड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे.

3. अभिनंदन वर्थमान यांच्या धाडसाचं कौतुक सगळ्या देशानं केलं होतं. आता वायुदलाकडून त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

4. एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरीया हे अभिनंदन यांच्या स्क्वार्डनचा विशेष सन्मान करणार आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले.

2. तसेच शेख हसिना यांनी सांगितले की , दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांत उच्च पातळीवर असून सागरी सुरक्षा, नागरी अणुऊर्जा, व्यापार या विषयांवर आम्ही सहकार्य करीत आहोत. तत्पूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हसिना यांची भेट घेऊन चर्चा केली.

3. तर भारत व बांगलादेश यांच्या पंतप्रधानांमध्ये व्यापक चर्चा होऊन त्यात एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी व त्यांच्या समपदस्थ शेख हसिना वाजेद यांच्यात ही चर्चा झाली. एकूण तीन प्रकल्प यावेळी सुरू करण्यात आले.

4. बांगलादेशातून द्रव पेट्रोलियम वायू आयात करण्यात येणार असून त्याचे वितरण ईशान्येकडील राज्यात केले जाणार आहे. दोन्ही देशात जलस्रोत, युवक कामकाज, संस्कृती, शिक्षण, सागरी क्षेत्र टेहळणी या मुद्दय़ांवर चर्चा होऊन त्यात
सखोल सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले.

5. मोदी यांनी यावेळी सांगितले की, बांगलादेशबरोबरच्या संबंधांना भारत अग्रक्रम देतो. शेजारी देशांशी सहकार्य वाढवण्याचे भारताचे प्रारूप हे जगासाठी आदर्श आहे. आजच्या चर्चेतून द्विपक्षीय संबंधांना ऊर्जितावस्था प्राप्त होईल अशी आशा आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही देशांनी बारा प्रकल्प राबवले असून त्यात तीन प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ढाक्यामध्ये विवेकानंद भवन उभारलं जाणार असा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झाला आहे.

2. ढाका येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद भवनाचा प्रकल्प उभारला जाणार. या दोन महान व्यक्तींचं आयुष्य आपल्याला कायम प्रेरणा देतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

3. तर या भवनामध्ये 100 हून अधिक विद्यापीठांमधील विद्यार्थी संशोधन स्कॉलर्सना राहण्याची संधी उपलब्ध होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

4. एवढंच नाही तर या दोघांच्या भेटीमध्ये एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी बांगलादेशहून एलपीजी आयात करण्याला मंजुरी दिली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याची दीर्घकाळाची मागणी मान्य करून युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक सहायता सध्याच्या 2 लाखांवरून 8 लाख करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

2. तर युद्धातील शहिदांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सैनिक कल्याण निधीच्या अंतर्गत ही मदत करण्यात येईल.

3. युद्धात शहीद झालेल्या आणि 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या सैनिकांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते. ही मदत पेन्शन, सैन्य सामूहिक विमा, सेना कल्याण निधी याशिवाय दिली जाते.

4. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता 2 लाखांवरून 8 लाख करण्यात आली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रेडिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1866 मध्ये झाला.

2. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर सन 1949 रोजी खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

3. सन 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

4. जेसन लुइस याने 2007 या वर्षी वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.


Top

Whoops, looks like something went wrong.