David Malpawas: 13th President of the World Bank Group

 1. जागतिक बँक समुहाचे 13 वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 2. मालपास यांनी दक्षिण कोरियाचे जिम यॉंग किम यांचे स्थान घेतले. 
 3. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 4. त्यांचा कार्यकाळ वर्ष 2022 साली संपणार होता.
 5. वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपास हे पूर्वी अमेरिकेच्या सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उप-सचिव होते.
 6. जागतिक बँक (WB) :-
  1. ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.
  2. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.
  3. समूहात आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.
  4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
  5. 1949 सालापासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते.


The National Seminar on 'Green and Geography' concludes in New Delhi

 1. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (CPWD) नवी दिल्लीत ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
 2. शहरी भागातले हरित क्षेत्र सामाजिक आणि नैसर्गिक स्थिरता आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
 3. हरित आणि स्वच्छ शाश्वत विकासाच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
 4. या कार्यक्रमात पाणी, वायू, ऊर्जा, भूमी, जैवविविधता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर, अक्षय ऊर्जा, पाण्याचे संवर्धन, सांडपाण्यावरील पुनर्प्रक्रिया अश्या विविध पैलूंवर उजाळा टाकण्यात आला.
 5. यादरम्यान केल्या गेलेल्या शिफारसी –
  1. बांधकामासाठी लाकूडाला पर्याय स्वीकारण्याची गरज आहे. बांबूसारख्या पर्यायी सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे.
  2. भूदृष्य आणि फलोत्पादन या क्षेत्रामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाविषयी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे.
  3. निरोगी आणि पौष्टिक आहारासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.


MOU between Indian Navy and CSIR for the development of Advanced Technology

 1. भारतीय नौदलासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या संयुक्त संशोधन व विकासासाठी, भारतीय नौदल आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.
 2. या करारामुळे यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, प्रपल्शन प्रणाली, धातूशास्त्र आणि नॅनो-तंत्रज्ञान आदी प्रगत क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास कार्याला चालना मिळेल.
 3. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR):-
  1. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी एक स्वायत्त संस्था आहे.
  2. त्याची स्थापना दिनांक 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.
  3. त्याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.


Praful Patel: First Indian member of the FIFA Executive Council

 1. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची ‘FIFA कार्यकारी परिषद’ याचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. प्रफुल पटेल या मंडळात सामील करण्यात आलेले पहिले भारतीय ठरले आहेत. सन 2019 ते सन 2023 या काळात ते या पदावर राहतील.
 3. FIFA:-
  1. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो.
  2. FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे.
  3. 1904 साली FIFAची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे.
  4. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.


World Health Day: 07 April

 1. दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.
 2. यावर्षी “युनिव्हर्सल कव्हरेजः एव्हरीवन, एव्हरीव्हेअर” ही या दिनाची संकल्पना आहे.
 3. इतिहास:-
  1. 1948 साली जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
  2. हा निर्णय सन 1950 पासून प्रभावी करण्यात आला.
  3. प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो.
  4. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते.
  5. जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे.
  6. इतर सात मोहिमा - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.


Top