1. निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना उपाध्यक्षपदावर संधी दिली आहे. तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.१ ऑगस्ट रोजी पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ३१ ऑगस्टरोजी ते आयोगातील पदभार सोडतील.
  2. डॉ. कुमार हे सध्या "सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च" येथे कार्यरत आहेत. अर्थविषयक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. याशिवाय "फिक्की" चे ते माजी महासचि वदेखील आहेत.
  3. लखनौ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते. एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.


  1. इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बीआरडीसी या ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने विजेतेपद पटकावले आहे. १९ वर्षांनंतर एखाद्या भारतीय रेसरने ही स्पर्धा जिंकली आहे. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती.
  2. कृष्णराज कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असून, गेली ८ वर्षे तो कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी करत आहे.गो कार्टिंगमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभागी होत आहे.
  3. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली.


  1. वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या १०० मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले.
  2. जागतिक मैदानी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीची शनिवारी मध्यरात्री अंतिम फेरी पार पडली. १०० मीटर कारकिर्दीची अखेर  बोल्ट सुवर्णनेच करतो काय असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, त्याला अपयश आले आणि ब्राँझवर समाधान मानावे लागले.
  3. बोल्टने लंडनमध्ये २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर शर्यत पार करून जागतिक विक्रम केला होता. आता याच ठिकाणी त्याला कारकिर्दीची अखेर ब्राँझने करावी लागली.
  4. गॅटली नने ९.९२ सेकंद आणि  कोलोमनने ९.९४ सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण व रौप्य मिळविले. तर, बोल्टने ही शर्यत ९.९५ सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत बोल्ट २०० मीटर, ४०० मीटर आणि रिले शर्यतीत धावणार आहे. 


Top

Whoops, looks like something went wrong.