MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गुरुवारी चौथ्या दिवशी भारताने वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई केली.

2. तर वर्षांच्या पूर्वार्धात आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या झिल्ली दालाबेहेराने महिलांच्या 45 किलो वजनी गटात 151 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले.

3. तसेच 49 किलो वजनी गटात स्नेहा सोरेनने 157 किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले. 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल अिजक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सोरोखायबाम बिंदियाराणी देवीने 181 किलो वजन उचलून अव्वल स्थान मिळवले.

4. मग पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात सिद्धांत गोगोईने 264 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात चौथ्या सुवर्णपदकाची नोंद केली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नो-बॉल’ प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अखेरीस तोडगा काढला असून आता मैदानावरील पंचांऐवजी तिसरे पंच गोलंदाजाच्या पायावर लक्ष ठेवून चेंडू ‘नो-बॉल’ आहे की नाही, याचा निर्णय घेणार आहेत.

2. तर सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज ट्वेन्टी-20 मालिकेत या नव्या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे.

3. हैदराबाद येथे भारत-विंडीजमध्ये पहिला ट्वेन्टी-20 सामना रंगणार असून त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा हा नियम लागू करण्यात येणार आहे.

4. तसेच काही महिन्यांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामात ‘नो-बॉल’ तपासण्यासाठी मैदानावर अतिरिक्त पंच ठेवण्याबाबत चर्चा झाली; परंतु आता मात्र ‘आयसीसी’ने तिसऱ्या पंचांनाही जबाबदारी सोपवली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पाकिस्तान बरोबर पुन्हा हवाई युद्धाचा प्रसंग उदभवल्यास F-16 फायटर विमानांना रोखण्यासाठी भारताने फ्रान्सला पहिली चारही राफेल फायटर विमाने मेटेओर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज करुन देण्याची विनंती केली आहे.

2. भारताने फ्रान्स बरोबर 36 राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे.

3. तर यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात फ्रान्सच्या हवाई दलाच्या तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या औपचारीक कार्यक्रमामध्ये पहिली चार विमाने भारताला सुपूर्द करण्यात आली.

4. त्याचवेळी भारताकडून फ्रान्सला आठ ते दहा मेटेओर क्षेपणास्त्रे देण्याची विनंती करण्यात आली. सध्या फ्रान्समध्ये इंडियन एअर फोर्सच्या इंजिनिअर्स आणि वैमानिकांना राफेल विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

5. तसेच पुढच्यावर्षी मे महिन्यात पहिल्या चार राफेल विमानांचे भारतामध्ये लँडिंग होईल. अंबाला बेसवर ही विमाने तैनात असतील.

6. मेटेओर हे एअर टू एअर लढाईमधील सर्वोत्तम मिसाइल आहे. बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे मिसाइल आहे.

7. मेटेओर मिसाइलद्वारे 120 ते 150 किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान पाडणे शक्य आहे. सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे असे मिसाइल नाही.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला.

2. तसेच बँकेने भलेही रेपो रेटमध्ये कपात केलेली नसली तरी सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. आरबीआयने एटीएमबाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे व एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत.

3. तर सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे ATM बद्दलचे नियम बदलणार आहेत. एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली 31 डिसेंबरला जारी होणार आहे.

4. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.

5. शॉपिंगसाठी नव्या कार्डसोबतच आरबीआयने प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट (PPI) लाँच करण्याची घोषणाही केली आहे. याचा वापर 10 हजार रुपयांपर्यंतचं सामान किवा सेवा खरेदी करण्यासाठी करता येईल.

6. आरबीआयनुसार हे कार्ड बँक अकाउंटद्वारे रिचार्ज करता येईल. याचा वापर बिल पेमेंट करण्यासह अन्य प्रकारच्या खरेदीसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय पीपीआय कार्डला बँकेत रोख रक्कम भरुन देखील रिचार्ज करता येईल. तसंच, डेबिट कार्डद्वारे रिचार्जचा पर्यायही उपलब्ध असेल. एका महिन्यात कमाल 50 हजार रुपयांपर्यंत

7. रिचार्ज करता येईल. याबाबत अधिक माहिती 31 डिसेंबर 2019 पर्यंत दिली जाणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. प्रमुख व्याजदर स्थिर ठेवताना रिझव्‍‌र्ह बँकेने केवळ चार महिन्यांच्या फरकाने विकासदर अंदाजात 1.90 टक्के कपात ही दशकातील सर्वात मोठी दर अंदाज कपात ठरली आहे.

2. तर चालू वित्त वर्षांसाठीचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर अंदाज 5 टक्के व्यक्त करण्यात आला असून, चार महिन्यांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने 6.9 टक्के विकासदराचे भाकीत केले होते.

3. तसेच चालू वित्त वर्षांतील आतापर्यंतच्या पाच द्विमासिक पतधोरणादरम्यान झालेली एकूण 2.40 टक्के विकास दर अंदाज कपात ही 2012-13 मधील 1.80 टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे.

4. रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारच्या पतधोरणाद्वारे व्याजदर बदलेले नाहीत. यापूर्वी सलग पाच पतधोरण आढावा बैठकीत विकास दराला प्राधान्य देताना व्याजदर कपात केली गेली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.

2. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.

3. संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.

4. पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.

5. सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

6. सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेच्या पाचव्या दिवशी भारताने एकूण 41 पदकांची कमाई करीत अग्रस्थान कायम राखतानाच यजमान नेपाळपासूनचे अंतरही वाढवले आहे.

2. भारताने 19 सुवर्ण, 18 रौप्य आणि चार कांस्यपदकांची भर घातली. आता भारताच्या खात्यावर 81 सुवर्ण, 59 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 165 पदके जमा आहेत.

3. तर दुसऱ्या स्थानावरील नेपाळच्या खात्यावर 116 पदके (41 सुवर्ण, 27 रौप्य, 48 कांस्य) जमा आहेत. शुक्रवारी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत आहे.

2. तर दर वर्षी संमेलनामध्ये एक प्रकाशक आणि एका साहित्यिकाचा विशेष सन्मान केला जातो. साहित्य संमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्रकाशकाचा सन्मान केला जाणार आहे.

3. तसेच शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना संमेलनात गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचाही सन्मान होणार आहे.

4. साहित्य संमेलनात महिला साहित्यिकांना अध्यक्षपद भुषवण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून एक साहित्यिक आणि एक प्रकाशक यांचा संमेलनात विशेष सन्मान केला जातो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. महिलांवरच्या राक्षसी हल्ल्यांमुळे देशाच्या विवेकालाच हादरा बसला आहे त्यामुळे ज्यांना पॉक्सो कायद्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे त्यांचा दयेच्या अर्जाचा (याचिकेचा) अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी जळजळीत भाष्य करताना ठोस संदेश दिला.

2. अशा आरोपींचा दयेच्या अर्जाचा अधिकार नाकारायचा की नाही याचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे, त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. पण आमचा सर्वाचा विचार आता त्या दिशेने आहे, असे त्यांनी माउंट अबू येथे महिला सुरक्षेवर आयोजित कार्यक्रमात सांगितले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर्सना परदेशी एजंट घोषित करण्याच्या प्रस्तावाला रशियन सरकारनं मंजुरी दिली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याबद्दलच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर देशात एकच गदारोळ झाला.

2. नव्या कायद्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना माध्यम आणि सरकारी संघटनांना परदेशी एजंट घोषित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. हा नवा कायदा तत्काळ लागू करण्यात आल्याची माहिती रशियन सरकारनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. राजकारणात सहभाग घेणाऱ्या आणि परदेशातून पैसे स्वीकारणाऱ्यांना नव्या कायद्यामुळे परदेशी एजंट परदेशी एजंट घोषित करता येऊ शकतं.

3. सरकारी यंत्रणेनं एखाद्या व्यक्तीला परदेशी एजंट ठरवल्यास त्या व्यक्तीला निर्दोषत्व सिद्ध करणारी कागदपत्रं द्यावी लागतील किंवा दंड भरावा लागेल.

4. पाश्चिमात्य देश आमच्या पत्रकारांना परदेशी एजंट ठरवतात. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कायदा मंजूर केल्याचं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे. २०१७ मध्ये रशियानं पहिल्यांदा अशा प्रकारचा कायदा केला होता. त्यावेळी आरटी टेलिव्हिजनला अमेरिकेनं परदेशी एजंट घोषित केलं होतं.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 7 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय लष्कर ध्वज दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन‘ आहे.

2. सन 1825 मध्ये बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते.

3. पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात सन 1856 मध्ये झाला.

4. स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.


Top

Whoops, looks like something went wrong.