Enabling strict action on SEBI exchange as well as new market intermediaries

 1. वित्त विधेयक-2018 मध्ये प्रस्तावित सुधारणांचा एक भाग म्हणून, भारतीय कर्जरोखे व विनिमय बोर्ड (SEBI) ला स्टॉक एक्स्चेंज आणि संबंधित मंजूर करणारी महामंडळे यांसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठ मध्यस्थांवर आर्थिक दंड आकारण्यास अधिक शक्ती प्रदान करण्यात आली आहे.
 2. शिवाय गुंतवणूक सल्लागार, संशोधन विश्लेषक, रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (REIT) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) आदींचा समावेश असलेल्या भागीदारांच्या नवीन श्रेणींविरुद्ध कारवाई करण्यास SEBI ला अधिक शक्ती प्रदान करण्यात आली आहे.

प्रस्तावित दुरुस्त्या

 1. नियामक नियमांचे पालन न केल्यास SEBI स्टॉक एक्स्चेंज, मंजूर करणारी महामंडळे आणि डिपॉझिटरी यांवर कमीतकमी 5 कोटी रुपयांचा दंड आकारू शकतील.
 2. त्याचेही पालन न केल्यास हा दंड 25 कोटी किंवा तिप्पट केला जाईल. यापूर्वी केवळ SEBI कडे कोणत्याही प्रकारच्या अपयशाच्या विरूद्ध गुप्तता राखण्याची किंवा निर्देश देण्याची शक्ती होती.
 3. SEBI ला अशा कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी मिळते, जे नियामकांना खोटी किंवा अपूर्ण माहिती देतात. यापूर्वी, कंपनीने जर कोणतीही माहिती दिली नसेल तरच SEBI कार्य करू शकत होती.
 4. वर्तमान परिस्थितीत भारतात AIF, InvIT आणि REITs यांसारख्या भरपूर संकरित निधीस वाव मिळत आहे. त्यांच्या नियमाबाबत दक्षता घेत वित्त विधेयकात प्रस्तावित तरतुदींनुसार, संशोधन विश्लेषक आणि गुंतवणूक सल्लागारांसह REITs आणि InvITs यांच्यावर आता नियमांचे पालन न केल्यास SEBI ला दररोज 1 लाख रुपयापर्यंत दंड आकारण्याची परवानगी दिली गेली आहे.
 5. शिवाय, नियामक कारवाईदरम्यान जर डिफॉल्टरच मृत्यू झाला तर डिफॉल्टरच्या कायदेशीर प्रतिनिधींच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी SEBI ला दिली गेली आहे.
 6. SEBI बाबत
 7. भारतीय कर्जरोखे व विनिमय बोर्ड (Securities and Exchange Board of India -SEBI) हे भारतामधील कर्जरोखे (सिक्युरिटी) संबंधित बाजारपेठेचे नियामक आहे. 1988 साली याची स्थापना केली गेली आणि SEBI अधिनियम 1992 अन्वये 30 जानेवारी 1992 रोजी आला वैधानिक दर्जा दिला गेला.


February 6 - International Day of zero tolerance against female genital mutilation

 1. जगभरात दरवर्षीप्रमाणे 6 फेब्रुवारी रोजी ‘स्त्री जननेंद्रिय विकृती विरोधात शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ (International Day of Zero Tolerance for Female Genital Mutilation) साजरा करण्यात आला.
 2. स्त्री जननेंद्रिय विकृती (FGM) अश्या सर्व प्रक्रियांचा समावेश आहे, ज्यामध्ये कोणतेही वैद्यकीय कारण नसताना स्त्रीच्या जननेंद्रियाला मान्यतेशिवाय जखम दिली जाते. अश्या अनैसर्गिक पद्धतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रियांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन म्हणून मान्यता दिले गेले आहे.
 3. अश्या रूढी स्त्रियांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि भौतिक एकात्मतेच्या अधिकारांचे आणि अत्याचार किंवा अमानुष वागणूकीपासून मुक्त असण्याचा त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करीत आहे.
 4. UNICEF सह 2008 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (United Nations Population Fund -UNFPA) या संघटनेनी FGM विरोधात आणि या पद्धतीच्या निर्मूलनासाठी सर्वात मोठा जागतिक कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम सध्या 17 आफ्रिकेतील देशांवर केंद्रित आहे आणि प्रादेशिक व जागतिक पुढाकारांना देखील मदत करतो.
 5. जागतिक स्वरूप:-
  1. जागतिक पातळीवर, सध्या किमान 200 दशलक्ष मुली आणि स्त्रियांना FGM संबंधी कोणत्यातरी स्वरुपात व्याधी असल्याचा अंदाज आहे.
  2. स्त्री जननेंद्रिय विकृती (FGM) ने प्रभावित असलेल्या 14 वर्ष आणि त्याखालील वयोगटातील 44 दशलक्ष मुली या सर्वाधिक प्रमाणात गॅम्बिया मध्ये (56%), त्यानंतर मॉरिटानिया (54%) राहतात. यासंबंधित 11 वर्ष आणि त्याखालील वयोगटातील मुलींमधील अर्धी लोकसंख्या इंडोनेशिया मध्ये आढळते.
  3. 15 ते 49 वर्षे वयोगटातील मुली आणि महिला यांच्यामध्ये सर्वाधिक प्रभावीत असलेले देश म्हणजे सोमालिया (98%), गिनी (97%) आणि जिबूती (93%) हे आहेत.
  4. सर्व संयुक्त राष्ट्रसंघ सदस्यीय देशांनी स्त्री जननेंद्रिय विकृती (FGM) संबंधी प्रथांचे निर्मूलन तसेच बाल आणि सक्तीचे विवाह यासारख्या इतर हानीकारक प्रथांचे निर्मूलन हे वर्ष 2030 पर्यंतच्या शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG) ठेवलेले आहे.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. 20 डिसेंबर 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ठराव पारित करून दरवर्षी 6 फेब्रुवारी हा दिवस ‘स्त्री जननेंद्रिय विकृती विरोधात शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून पाळण्याचे मान्य केले.
 3. या दिवशी अश्या रूढी विरोधात नागरी समाजात जागरुकता वाढविण्याच्या मोहिमा वाढविण्यासाठी कार्य केले जाते.
 4. डिसेंबर 2014 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ‘स्त्री जननेंद्रिय विकृती (FGM) च्या निर्मूलनासाठी तीव्र वैश्विक प्रयत्न’ यासंबंधी ठराव मंजूर करण्यात आला.


'A Century is Not Enough' - Autobiography of Sourav Ganguly

 1. सौरव गांगुली लिखित ‘ए सेंच्युरी इज नॉट इनफ: माय रोलर-कोस्टर राइड टु सक्सेस’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे.
 2. गौतम भट्टाचार्य यांच्या सहकार्याने त्यांचे हे पहिले पुस्तक आहे.
 3. ‘जगरनॉट’ हे प्रकाशक आहेत.
 4. सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार आहेत.
 5. 2002 साली, विस्डेन क्रिकेटर्सच्या 'अल्मनॅक’ ने त्यांना सहाव्या क्रमांकावर क्रम दिला, जो एकदिवसीय क्रिकेटपटूने प्राप्त केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे. 
 6. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 100 पेक्षा जास्त कसोटी आणि 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला एक खेळाडू आहे. 
 7.  सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 
 8. ते पद्मश्रीने सन्मानित आहेत.


India's largest floating island in Neckanpur Lake

 1. हैदराबादमधील नेकनामपुर तलावात भारतातला सर्वात मोठा तरंगता बेट तयार करण्यात आला आहे.
 2. इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्सने याला देशातील सर्वात मोठे फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड (FTW) म्हणून मान्यता दिली आहे.
 3. हैदराबाद नगर विकास प्राधिकरण आणि रंगा रेड्डी जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी 'ध्रुवंश' या NGO ने हा बेट उभारला आहे.
 4. तलावाची रचना:-
  1. तरंगत्या धर्तीवर 3,500 पाणथळ क्षेत्राचे 2500 चौरस फुट बेट तयार करण्यात आले आहे.
  2. फ्लोटिंग ट्रीटमेंट वेटलँड (FTW) हा कमी माती वापरुन जलधर्मीय तंत्रज्ञानावर आधारित चार थराची भूमी आहे.
  3. तरंगते बांबू त्याचा पाया तयार करतात. त्यावर स्टायरोफोम क्युबिकल ठेवलेले आहेत.
  4. त्यावरील थर गनीबॅगने तयार केला आहे आणि सर्वात वरचा थर खडकाळ आहे.
  5. याप्रकारामुळे वनस्पती सूर्यप्रकाशात आणि पाण्यात वाढतात.
  6. या कृत्रिम बेटावर विविध प्रकारच्या वनस्पतींना वाढविण्यात आल्या आहेत, ज्या पाण्यातील प्रदूषणाला कमी करण्यासाठी मदत करतात.
  7. या तलावामधील पाण्याची गुणवत्ता बहाल करून जलजीवनासाठी समृद्ध वातावरण तयार करणे हा यामागचा उद्देश्य आहे.


Mukesh Khanna resigns as chairman of Indian Children's Film Society

 1. प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी भारतीय बाल चित्रपट सोसायटी (CFSI) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
 2. मुकेश खन्ना यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ येत्या एप्रिलला संपणार होता.
 3. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकि‍र्दीत 'महाभारत', 'शक्तिमान' अश्या मालिकांमध्ये भूमिका वठवल्या होत्या.
 4. भारतीय बाल चित्रपट सोसायटी (Children's Film Society India -CFSI) ही भारत सरकारची एक नोडल संस्था आहे.
 5. जी विविध भारतीय भाषांमध्ये बाल चित्रपटांची निर्मिती आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करते.
 6. याची स्थापना 11 मे 1955 रोजी मुंबईमध्ये करण्यात आली.


Scientists have developed a way to print QR codes for medicines for serving

 1. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठ आणि फिनलंडमधील अबो अकादेमी विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने औषध निर्मितीसाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे.
 2. शास्त्रज्ञांनी औषधीचा वापर करून सेवन केल्या जाऊ शकणारे QR कोड मुद्रित करण्याचा एक मार्ग विकसित केला आहे.
 3. या नव्या पद्धतीत, त्यांनी एक पांढरा खाद्य पदार्थ तयार केला, ज्यावर त्यांनी QR कोड मुद्रित केले ज्यात वैद्यकीय औषधांचा समावेश आहे.
 4. हा QR कोड म्हणजे एक द्वि-आयामी बारकोड आहे ज्यामध्ये यंत्राद्वारे वाचच येण्याजोगी माहिती समाविष्ट असते.
 5. नव्या पद्धतीची मदत रोगीला मिळणार्‍या वैद्यकीय उपचाराप्रमाणे जुळवून घेण्यास होणार आहे.
 6. शिवाय QR कोडच्या आकारामुळे "गोळी" मध्येच त्यासंबंधी माहिती संग्रहित करण्यास मदत होते.
 7. फक्त एक द्रुत स्कॅन करून, त्या औषधी उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवू शकता येणार ज्यामुळे चुकीची औषधे आणि बनावट औषधांच्या प्रकरणांची संख्या कमी होऊ शकते.


Top