1. शहरी भागाच्या विकास व परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते.
  2. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेट्रो प्रकल्पांसाठी ६७ हजार ५२३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.हागणदारीमुक्त मोहिमेत राज्य आघाडीवर आहे, असे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
  3. सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय नगरविकासमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत राज्यातील नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी नायडू बोलत होते.
  4. नायडू म्हणाले, की राज्यात सुरू असलेल्या शहर विकासाच्या, गृहनिर्माणाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय नगरविकास विभागाच्या योजना यशस्वी राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.


  1. भारतीय प्रजासत्ताकाचे 15 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम  निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीचे मतदान १७ जुलै रोजी होईल व गरज पडल्यास २० रोजी मतमोजणी होईल.
  2. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे. त्याआधी एक आठवडा किंवा चार दिवस आधी मुखर्जी यांचा उत्तराधिकारी म्हणून देशाच्या या सर्वोच्चपदावर पुढील पाच वर्षे कोण बसेल हे स्पष्ट होईल. एकाहून जास्त उमेदवार रिंगणात नसतील, तर १ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतीचे नाव समोर येईल.
  3. आयोगाने या निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव अनूप मिश्रा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
  4. तसेच महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. ए.एन. कळसेउपसचिव आर.जे. कुडतरकर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.


  1. कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नियुक्ती  झाली आहे. ७ जून रोजी त्यांनी हा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.
  2. डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास,सोलापूर जिल्हाधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, बेस्टचे महाव्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केले आहे.
  3. १९९१ मध्ये केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने  देखील सन्मानित करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादनाच्या क्षेत्रात विशेष काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.


Top