'Operation Greens': A campaign for food processing industries ministry

 1. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स’ या मोहीमेसाठी कार्यान्वयन धोरण मंजूर केले आहे.
 2. 2018-19 या वर्षाच्या अर्थसंकल्पात टोमॅटो, कांदा आणि बटाटा या प्रमुख पिकांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी तसेच वर्षभर स्थिर किंमतीनुसार देशात संपूर्ण पिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च असलेल्या या मोहीमेची घोषणा करण्यात आली होती.
 3. मंत्रालयाने निश्चित केलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत –
 4. अल्पमुदत किंमत स्थिरीकरण उपाययोजना – यांची अंमलबजावणी करण्यासाठी राष्‍ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) ही केंद्र संस्था असेल.
 5. पिकांचे उत्पादन गोदामापर्यंत वाहतूक करण्याच्या साखळीला आणि योग्य गोदामांची नियुक्ती या दोन घटकांना 50% अनुदान दिले जाईल.
 6. दीर्घकालीन एकात्मिक मूल्य श्रृंखला विकास प्रकल्प – प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 50%-70% किंवा जास्तीतजास्त 50 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार.
 7. यात उद्योगांचा समूह, क्षमता निर्मिती, गुणवत्ता, कापणीनंतरच्या सोयी-सुविधा, वाहतूक, विपणन आदी. अश्या घटकांचा समावेश आहे.


The Memorandum of Agreement between the WAPCOS, Doppelmayer for the Passenger Rodeway Project was signed

 1. देशात ‘प्रवासी रोपवे’ प्रकल्पासाठी उपाययोजना पुरविण्यासाठी WAPCOS (भारत सरकारची अग्रगण्य अभियांत्रिकी सल्लागार संस्था) आणि डोपेलमायर (ऑस्ट्रियाची जगातली सर्वात मोठी रोपेवे निर्माता कंपनी) यांच्यादरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 2. या करारामधून प्रकल्पासाठीचा अभ्यास, प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल, बांधकाम, उपकरणांचा पुरवठा, कार्ये व देखरेख इ. घटकांच्या बाबतीत मदत मिळणार आहे.
 3. देशाला वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी भविष्यातील तंत्रज्ञान आवश्यक आहे.
 4. स्वस्त आणि परिणामी कमी प्रदूषणाचे लक्ष्य समोर ठेवत रोपेवे, केबल कार, फनिक्युलर रेल्वे हे डोंगराळ आणि क्लिष्ट भूभागांसाठी वाहतूकीचे अतिशय उपयुक्त मार्ग असू शकतात.
 5. शिवाय हे वाहतूक पर्याय टीयर II शहरांसाठी खूप उपयोगी ठरतील.


"Shakti": Indigenous 'microprocessor' chip developed by IIT Madras

 1. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास येथील संशोधकांनी संपूर्णपणे पहिले स्वदेशी बनावटीचे ‘मायक्रोप्रोसेसर’ (इलेक्ट्रॉनिक चीप) विकसित केले आहे.
 2. या मायक्रोप्रोसेसरला ‘शक्ती (SHAKTI)’ हे नाव देण्यात आले आहे.
 3. त्यांनी सहा औद्योगिक क्षेत्रात मानक ठरणार्‍या ‘फॅमिली ऑफ सिक्स’ प्रकारच्या मायक्रोप्रोसेसरसमधली पहिली इलेक्ट्रॉनिक चिप विकसित केली आहे.
 4. या मायक्रोप्रोसेसरची मायक्रोचीप भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) चंदीगड येथील प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे.
 5. ‘प्रोजेक्ट शक्ती’ अंतर्गत विकसित या चिपला ‘शक्ती’ तसेच ‘RISECREEK’ हे नाव देण्यात आले आहे.
 6. ही ‘फॅमिली ऑफ सिक्स’ प्रकारच्या मायक्रोप्रोसेसरसमधल्या ‘C क्लास’ या श्रेणीतली चिप आहे. अमेरिकेच्या ओरेगॉनमधील इंटेल कंपनीच्या सुविधेत 300 चिपसह पहिल्या तुकडीची निर्मिती करण्यात आली आहे.
 7. भारताचे मायक्रोप्रोसेसर इतरांद्वारे स्वीकारले जाऊ शकतात, कारण हे डिझाइन ‘ओपन सोर्स’ पद्धतीचे आहे.
 8. ते ऊर्जेचा पुरेपूर वापर करतात आणि ‘अॅडव्हांस्ड RISC मशीन्स (ARM) मधील ‘कॉर्टेक्स A5’ यासारख्या आंतरराष्ट्रीय चिपशी स्पर्धा करते. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील हे महत्वपूर्ण यश असून यामुळे परदेशी मायक्रोप्रोसेसरवरील अवलंबित्व कमी होणार असून सायबर हल्ल्याचा धोकाही कमी होईल.
 9. या चीपचा उपयोग भारतीय उपग्रहांमध्ये आणि संरक्षण उपकरणांमध्ये होऊ शकतो. तसेच ही चीप मोबाइल, कॅमेरा आणि स्मार्ट मीटर्स आदी उपकरणांमध्ये वापरली जाऊ शकणार.


Top