India upgraded 'MiG-29' fighter aircraft

 1. भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील 'मिग-२९' ही विमानं अपग्रेड करत त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे. 
 2. लढाऊ विमानांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने भारतीय हवाई दलाने मिग विमानांना अधिक शक्तिशाली आणि संहारक बनवलं आहे.
 3. रशियन बनावटीची मिग विमानं आता हवेतच इंधन भरू शकतात. तसंच या विमानातून एकावेळी अनेक दिशांना मारा करता येऊ शकतो.
 4. ही विमानं चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर तैनात असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.
 5. आधीच्या व्हर्जनमधील मिग विमानांनीही महत्त्वाचे योगदान दिले होते. १९९९ च्या कारगिल लढाई दरम्यान 'मिग-२९' विमानांनी पाक सैन्याला पराभूत करण्यात मोठी कामगिरी बजावली होती.
 6. गेल्या आठवड्यात हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेल्या 'मिग-२९' विमानांची प्रत्यक्षिकं सादर करण्यात आली.
 7. हवाई दलाच्या उद्या होणाऱ्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ही विमानं आपली प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. या 'मिग-२९' विमानांमध्ये मल्टि-फंक्शनल डिस्प्लेही लावण्यात आला आहे.
 8. हवाई दलाचे अदमपूर विमानतळ हे पाकिस्तानपासून १०० किमी आणि चीनपासून २५० किमी अंतरावर आहे. यामुळे सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेली 'मिग-२९' विमानं तैनात करण्यात आली आहेत.
 9. हवाई दलातील 'मिग-२९' विमानांची तीन स्क्वॉड्रन सध्या कार्यरत आहेत. या पैकी दोन स्क्वॉड्रन अदमपूर विमानतळावर तैनात आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये किमान १६-१८ विमानं असतात.
 10. भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरीची कुठलीही माहिती मिळताच 'मिग-२९' हे विमान केवळ ५ मिनिटांत उड्डाण करू शकते, अशी माहिती कोहली यांनी दिली.
 11. अपग्रेड केलेल्या 'मिग-२९' विमानांची मारक क्षमता आता उत्तम झाली आहे. या विमानांद्वारे आपण हवेतू-हवेत, हवेतून-जमिनीवर आणि समुद्रातील जहाजांविरोधातही कारवाई करू शकतो.
 12. 'मिग-२९'च्या अपग्रेड व्हर्जनमध्ये सर्व अत्याधुनिक फिचर्स आहेत, अशी माहिती 'मिग-२९' विमान उडवणाऱ्या एका पायलटने दिली.
 13. हवाई दलाच्या अदमपूर विमानतळाने १९९९च्या कारगिल लढाईत मोठी भूमिका बजावली होती. भारतीय लढाऊ विमानांनी शत्रूची विमानं १५ हजार फूट उंचीवरच उद्ध्वस्त केली होती.


Hooka parlor ban imposed in the state

 1. ​​​​​राज्यात हुक्का पार्लर बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 'सिगारेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम 2003' या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधिताला एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने जारी केली.
 2. गुजरात राज्यात यापूर्वी हुक्का पार्लर बंदी लागू करण्यात आली होती.
 3. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही बंदी लागू करण्यात आली आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
 4. नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मागील वर्षी 2017 डिसेंबरमध्ये विधिमंडळामध्ये हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता.
 5. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये हे विधेयक विधिमंडळात पारित करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.
 6. दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये लोअर परळ येथील कमला मिलमध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
 7. तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.


The record double century of karn kaushal of Uttarakhand in vijay Hazare Trophy

 1. सलामीवीर कर्ण कौशल याने साकारलेली विक्रमी द्विशतकी खेळी व त्याला विनित सक्सेनाने दिलेल्या सुरेख शतकी साथीच्या बळावर उत्तराखंड संघाने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेतील प्लेट गटात सिक्कीमवर तब्बल १९९ धावांनी मात केली.
 2. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या फलंदाजाने द्विशतक ठोकले आहे. सात सामन्यांतून उत्तराखंडचा हा सहावा विजय ठरला.
 3. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने धडाक्यात सुरुवात केली. २६ वर्षीय कर्ण आणि विनित यांनी चौफेर फटकेबाजी करताना पहिल्या विकेटसाठी २९६ धावांची अभेद्य भागीदारी रचली.
 4. चार चौकारांसह १०० धावा काढून विनित मंदूप भुतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला, मात्र कर्णने त्याचा तडाखा सुरूच ठेवला.
 5. १८ चौकार व ९ षटकारांच्या साहाय्याने कर्णने १३५ चेंडूंत २०२ धावा ठोकल्या. भुतियानेच त्याला बाद करत संघाला दिलासा दिला.
 6. मात्र उत्तराखंडने निर्धारित ५० षटकांत अवघ्या दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ३६६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, सिक्कीमचा संघ ५० षटकांत ६ बाद १६७ धावाच करू शकला.
 7. सिक्कीमतर्फे ली यांग लेप्चा ६६ व पद्म लिंबूने ५१ धावांची खेळी करून संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दीपक ढापोलाने सर्वाधिक तीन बळी घेत सिक्कीमला रोखले.
 8. रहाणेचा विक्रम मोडला:-
  1. द्विशतक ठोकणाऱ्या कर्णने अजिंक्य रहाणेचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
  2. मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजिंक्यने २००७-०८ च्या हंगामात महाराष्ट्राविरुद्ध १८७ धावांची खेळी साकारली होती.
  3. यंदाच्या हंगामात कर्णने सात सामन्यांतून तीन शतकांसह ४६७ धावा केल्या असून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो पुनित बिश्तनंतर (४८८ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे.


Prithvi-2 test is successful

 1. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची रात्रीच्या वेळेत घेण्यात आलेली चाचणी शनिवारी यशस्वी झाली. 
 2. चंडीपूर येथील तळावर या क्षेपणास्त्राची चाचणी झाली.
 3. यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजीही पृथ्वी-२ची रात्री घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली होती.
 4. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असून, त्याचा पल्ला ३५० किमीचा आहे.


The first Dolphin Research Station to open in India and Asia at Patna

 1. गंगा नदीतील लुप्तप्राय डॉल्फिन (Gangetic river species) यांची संख्या कमी होत आहे आणि ते आपले निवासस्थान बदलत आहेत. 
 2. अश्या परिस्थितीत त्यांच्या संरक्षणार्थ आणि संवर्धनासाठी बिहार राज्याच्या पटना शहरात ‘राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र’ (NDRC) उघडण्यात येणार आहे.
 3. ‘राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र’ (NDRC) हे भारत आणि आशियाचे प्रथम डॉल्फिन संशोधन केंद्र असेल.
 4. याच्या माध्यमातून गंगा नदीतील या सस्तन प्राण्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 5. देशाच्या अंदाजे 3,000 डॉल्फिनपैकी निम्मी संख्या बिहारमध्ये आढळते. 2012 साली झालेल्या सर्वेक्षणात जवळजवळ 1,500 डॉल्फिन मोजले गेलेत.


Top