France to collaborate with ISRO for Gaganyan

 1. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो'च्या गगनयान या अंतराळवीरांचा समावेश असलेल्या पहिल्या अवकाश मोहिमेसाठी फ्रान्सचे सहकार्य लाभणार आहे.
 2. याबाबतच्या करारावर भारत-फ्रान्स यांच्यात गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 3. याअंतर्गत इस्रोला फ्रान्समधील अंतराळ रुग्णालयाच्या सुविधेचा वापर करता येणार असून अवकाश मोहिमांदरम्यान औषधे, अंतराळवीरांच्या आरोग्याची पाहणी, जीवरक्षक प्रणाली, किरणोत्सारापासून तसेच अवकाशातील कचऱ्यापासून संरक्षण आणि वैयक्तिक स्वच्छता या मुद्द्यांवर परस्परांच्या कौशल्याचा लाभ दोन्ही देशांच्या अवकाश यत्रणांना घेता येणार आहे, अशी माहिती फ्रान्सच्या अवकाश यंत्रणा 'सीएनईएस'चे जीन-युवेल ला गॉल यांनी दिली.
 4. सन २०२२पर्यंत तीन अंतराळवीरांना अवकाश मोहिमेवर पाठवण्याची इस्रोची योजना आहे. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर अंतराळवीर अवकाशात धाडणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.


Rest in Peace Burt Reynolds!

 1. हॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
 2. डॅन ऑगस्ट आणि गन स्मोकसारख्या अनेक टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. तर १९९७ मध्ये बुगी नाइट्स या सिनेमासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते.
 3. इव्हिनिंग शेड्स या सिनेमातील भूमिकेसाठी बर्ट रेनॉल्ड्स यांना गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 4. हॉलिवूड सिनेसृष्टी आणि टीव्ही यामध्ये बर्ट रेनॉल्ड यांची कारकीर्द प्रदीर्घ होती. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’या सिनेमासह इतर काही सिनेमांमध्ये ते आत्ताही काम करत होते.
 5. या सिनेमात त्यांच्यासोबत ब्रॅड पिट आणि लिओनार्दो डी कॅप्रिओही यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अँजल बेबी हा १९६१ मध्ये आलेला त्यांचा पहिला सिनेमा होता. ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या सिनेमांनी त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले.
 6. त्यांना जेम्स बॉन्डच्या भूमिकेसाठीही विचारणा झाली होती. मात्र एक अमेरिकन अभिनेता कधीही जेम्स बॉन्ड साकारू शकत नाही असे म्हणत त्यांनी ती नाकारली.
 7. बर्ट रेनॉल्ड्स यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पुतणीने दिले. माझे काका बर्ट रेनॉल्ड्स हे एक उत्तम अभिनेते, संवेदनशील माणूस होते. त्यांनी त्यांचे आयुष्य कुटुंब, मित्र, चाहते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी घालवले.
 8. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत बिघडली होती. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका येईल आणि त्यांचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते. ज्या चाहत्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले त्या सगळ्यांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया बर्ट रेनॉल्ड्स यांची पुतणी नॅन्सी लीने दिली आहे.


Sourabh Choudhary's Golden Hole with Worldwinds in Junior Group

 1. सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 2. त्याचवेळी अभिषेक वर्माला गुरुवारी सिनिअर गटात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे आॅलिम्पिक कोटा मिळविता आला नाही.
 3. सौरभने ५८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये २४५.५ अंकांची नोंद करीत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुनसिंग चीमाने आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २१८ अंकांसह कांस्यपदक पटकावले.
 4. सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात आयएसएसएफ विश्वकपदरम्यान १० मीटर एअर पिस्तुलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम २४३.१ अंकांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
 5. सौरभच्या स्पर्धेत अर्जुनसिंग चीमाने कांस्यपदक पटकावले, तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या १६ वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला.
 6. सौरभ, चीमा व अनमोल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने एकूण १७३० गुणांची कमाई करत रौप्यपदकाचा मान मिळवला. १७३२ गुणांची नोंद करणारा कोरियन संघ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. रशियाने १७११ गुणांसह कांस्यपदक पटकावले.


Top

Whoops, looks like something went wrong.