Mithali Raj announces retirement from T20 Internationals

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राजीनामा दिला आहे.

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तिने आजवरच्या कारकीर्दीत तीन टी-20 विश्वचषकांसह 21 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं आहे. मितालीने 89 टी-20 सामन्यांमध्ये 37.52 च्या सरासरीने 2 हजार 364 धावांचा रतीब घातला आहे. यामध्ये तिच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे. एका भारतीय महिला फलंदाजाची टी-20 मधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांच्याही आधी मितालीने 2 हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारतातर्फे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मितालीच्याच नावावर आहे.


Former chief secretary UPS Madan will be the new state election commissioner (SEC)

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 
यू. पी. एस. मदान :

राज्याचे मुख्य सचिव राहिलेले हे 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते.

राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे.

त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे.

मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.


Top

Whoops, looks like something went wrong.