India is the third most vulnerable country in terms of cyber attacks

 1. सुरक्षा समाधान प्रदाता संस्था ‘सिमेंटेक’ च्या ‘इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट’ अहवालानुसार, सायबर धोक्यांमधील जोखीम जसे मालवेयर, स्पॅम आणि रॅनसमवेयर यांच्या प्रकरणात, 2017 साली भारत तिसरा सर्वात असुरक्षित देश म्हणून समोर आला आहे.
 2. क्रिप्टोजॅकिंग विषयी:-
  1. क्रिप्टोजॅकिंग एक अशी पद्धत आहे, ज्यामध्ये हॅकर आपल्या कंप्यूटर, स्मार्टफोनच्या क्षमतेचा वापर करून क्रिप्टोकरंसी माइन करतात.
  2. या पद्धतीने हॅकर कंप्यूटर वापरकर्त्याला विना कळवता बॅकग्राउंड जावास्क्रिप्टच्या माध्यमातून सहजरीत्या क्रिप्टोकरंसी कमावतात, म्हणून याला क्रिप्टोजॅकिंग म्हणतात.
  3. या पद्धतीत हॅकरला आपल्या कंप्यूटरमध्ये कोणताही हल्ला करावा लागत नाही. जेव्हा कधी आपण एखाद्या असुरक्षित संकेतस्थळावर भेट देतो, तेव्हा हॅकर आपले काम करतो.
‘इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट’ अहवाल
 1. मुख्य बाबी:-
 2. हा अहवाल आठ प्रकारच्या हल्ल्यांवर आधरित आहे, ते आहेत - मालवेयर, स्पॅम, फिशिंग, बॉट्स, नेटवर्क हल्ले, वेब हल्ले, रॅनसमवेयर आणि क्रिप्टोमाइनर्स.
 3. 2017 साली 5.09% वैश्विक धोके भारतात आढळून आले होते. 2016 साली ही आकडेवारी 5.11% होती.
 4. अमेरिका (26.61%) या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत सर्वाधिक असुरक्षित देश आहे. त्यानंतर चीन (10.95%) चे स्थान आहे.
 5. अहवालानुसार, भारत स्पॅम आणि बॉट्स यांच्याद्वारे प्रभावित होण्याच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे, जेव्हा की नेटवर्क हल्ल्याच्या बाबतीत तिसरा आणि रॅनसमवेयरमुळे प्रभावित होण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे.
 6. सायबर गुन्हेगार आता 'क्रिप्टजॅकिंग' वर कार्य करीत आहेत. क्रिप्टोजॅकिंग सायबर आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी एक वाढता धोका आहे.

 


 World Health Day: April 7

 1. 7 एप्रिल 2018 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात ‘जागतिक आरोग्य दिन’ जगभरात पाळला जात आहे.
 2. यावर्षी हा दिवस “युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज: एव्हरीवन, एव्हरीव्हेयर” या विषयाखाली पाळला गेला आहे.
 3. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) हे व्यक्त करते की प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आरोग्य सेवा-सुविधा पुरवणे आणि हे सुनिश्चित करणे की त्यामुळे वापरकर्त्यास कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
 4. केवळ पैसे देऊ करू शकतात अश्या व्यक्तींनाच आरोग्य सेवा न देता, प्रत्येक गरजू व्यक्तीला आरोग्य सेवा मिळाव्यात असे मूळ उद्दिष्ट ही संकल्पना स्पष्ट करते.
जागतिक आरोग्य दिन
 1. या दिनामागचा इतिहास:-
 2. 1948 साली WHO ने प्रथम ‘जगातील आरोग्य सभा’ आयोजित केली होती. या सभेत दरवर्षी 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 1950 सालापासून प्रभावी करण्यात आला. प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय निवडला जातो.
 3. या दिनी विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती निर्माण केली जाते.
 4. जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे.
 5. इतर सात मोहिमा पुढीलप्रमाणे आहेत - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.


Top