1. सर्वोच्च न्यायालयाच्या ४५व्या सरन्यायाधीशपदी दीपक मिश्रा यांनी नियुक्ती झाली आहे. ते ३ ऑक्टोबर २०१८पर्यंत या पदावर राहणार आहेत.सध्याचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ २७ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यानंतर दीपक मिश्रा त्यांचा पदभार सांभाळणार आहेत.सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या दीपक मिश्रा यांच्या नावावर अनेक ऐतिहासिक सुनावण्या आहेत.
 2. याकूब मेमनच्या प्रकरणात त्यांनी रात्र जागवून सुनावणी केली होती. त्यानंतर न्यायपूर्णरीत्या याकूब मेमनला फाशी देण्यात आली.निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यासह त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचे आदेशही मिश्रा यांनीच दिले होते.
 3. ३ ऑक्टोबर १९५३ रोजी जन्मलेले मिश्रा हे मूळचे ओदिशाचे आहेत. त्यांची सर्वसामान्यांमध्ये ‘प्रो सिटीझन जज’ अशी ओळख आहे.कायद्याची पदवी मिळवल्यानंतर १९७७मध्ये ओदिशा उच्च न्यायालयात त्यांनी आपल्या वकिली व्यवसायास प्रारंभ केला.
 4. काही वर्षांतच दिवाणी, फौजदारी, विक्रीकर विषयक तसेच घटनात्मक मुद्दे असलेल्या क्षेत्रातील नामवंत विधिज्ञ म्हणून त्यांचा लौकिक झाला.१९ ९६मध्ये त्यांना  दिशा उ च्च न्याया लयात न्याया धीशपदी नियुत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेश व पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदही भूषविले.
 5. २०० ९मध्ये पाट णा उ च्च न्यायालया चे ते मुख्य न्यायाधीश बनले. नंतर काही काळ दि ल्ली उ च्च न्याया लयात त्यांनी न्यायदान केले. २० ११ मध्ये पदोन्नती मिळून ते सर्वोच्च न्यायालयाचे न्याया धीश बनले.दीपक मिश्रा हे  १९९० ते ९१ दरम्यान सरन्यायाधीश राहिलेले रंगनाथ मिश्रा यांचे पुतणे आहेत. 


 1. इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) सामन्यांमध्ये "स्पॉट फिक्‍सिंग" केल्याच्या आरोपावरून आजन्म बंदी घातलेला एस. श्रीशांतवरील बंदी हटविण्याचा आदेश केरळ उ च्च न्या यालयाने "बीसीसीआय"ला दिला.
 2. चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या "स्पॉट फिक्‍सिंग " प्रकरणात श्रीशांतला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. तत्कालीन "राजस्थान रॉयल्स"च्या संघाकडून खेळताना श्रीशांतने हे कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप होता.
 3. या आरोपामुळे २०१३ च्या सप्टेंबरमध्ये श्रीशांतवर "बीसीसीआय"ने बंदी घातली होती. त्याच्यासह राजस्थान रॉयल्सचे खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही ही कारवाई झाली होती.


 1. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांना 21 ऑगस्टपासून ग्लास्गो येथे होणार्‍या बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.
 2. विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची 2013 आणि 2014 ची कांस्यपदक  विजेती सिंधू हिला ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर ठेवण्यात आले आहे. 2015 मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या आणि जगातील 16व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला 12 वे मानांकन प्राप्त झाले आहे.
 3. चीन  तायपेची जगातील नं बर व  खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे  जपा नच्या अकाने यामागुची  णि को रियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहि ले आ णि  दुस रे मानांकन प्राप्त झाले आहे.
 4. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणार्‍या आठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो.तसेच इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी.साई प्रणीत यांना अनुक्रमे 13 व 15 वे मानांकन प्राप्त झाले आहे. 


 1. इराणचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी पुन्हा एकदा आपल्या दुसर्‍या कार्याकाळासाठी पदाची शपथ घेतली आहे.
 2. इराण हा पर्शियन (अरबी) आखातामधील एक इस्लामिक प्रजासत्ताक देश आहे.
 3. या देशाची राजधानी तेहरान हे शहर आहे. देशाचे चलन इराणी रियाल आणि अधिकृत भाषा पर्शियन ही आहे.


Top