Development of the world's poorest countries: UNCTAD

 1. संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायाला कमी विकसित देशांकडे (LDCs) विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांचा होणारा विकास हा अधोगतीने चाललेला आहे.
 2. बरेच LDC देश अजूनही मूलभूत वस्तूंच्या निर्यातीवर अवलंबून आहेत. शिवाय, वर्ष 2016 च्या अखेरीपासून बहुतांश मूलभूत वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्येही वाढ झाली आहे.
 3. वर्ष 2018 च्या अंदाजानुसार, LDC देशांची चालू खात्यातील तूट आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अश्या परिस्थितीत LDC आणि इतर विकसनशील देशांमधील असमानता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 4. UNCTAD:-
  1. संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 1964 साली करण्यात आली. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले.
  2. ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रात एक प्रमुख म्हणून कार्य करते. सध्या, UNCTAD चे 194 सदस्य राज्ये आणि देश आहेत. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.

अहवालातील ठळक बाबी

 1. वर्ष 2017 मध्ये LDC चा वृद्धीदर सरासरी 5% होता आणि तो वर्ष 2018 मध्ये 5.4% राहणार, जो शाश्वत विकास ध्येय 8 नुसार ठरविलेल्या निरंतर, समावेशक आणि सातत्यपूर्ण आर्थिक वाढीकरता लागणार्‍या 7% विकास दरापेक्षा कमी आहे.
 2. वर्ष 2017 मध्ये केवळ पाच LDC देशांनी 7% किंवा त्यापेक्षा जास्त वृद्धीदर दर्शविलेला आहे. त्यामध्ये इथिओपिया (8.5%), नेपाळ (7.5%), म्यानमार (7.2%), बांग्लादेश (7.1%) आणि जिबूती (7%) या देशांचा समावेश आहे.
 3. वर्ष 2017 मध्ये, LDC देशांच्या समुहात चालू खात्यात $50 अब्जची तूट नोंदवली गेली, जी आतापर्यंतची दुसर्‍या क्रमांकाची सर्वात उच्च तूट आहे. याउलट, LDC श्रेणीत नसलेल्या विकसनशील देशांच्या चालू खात्यात वाढीची नोंद केली गेली.
 4. LDC देशांसाठी विशेष विदेशी मदत म्हणून $43.2 अब्जच्या रकमेशी आंतरराष्ट्रीय समुदाय वचनबद्ध आहे. ही रक्कम सर्व विकसनशील देशांन दिल्या जाणार्‍या निव्वळ मदतीच्या केवळ 27% आहे आणि प्रत्यक्षात वर्षागणीक या मदतीत 0.5% वाढ केली जाते.
 5. डेन्मार्क, लक्झेंबर्ग, नॉर्वे, स्वीडन आणि ब्रिटन त्यांच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.20% पेक्षा अधिकची मदत LDC देशांना पुरवितात. तर नेदरलँड्सकडून हा वाटा सरासरी 0.15% इतका आहे.


Memorandum of Understanding with Railways Ministry of AYUSH

 1. रेल्वेच्या नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला आहे.
 2. वर्तमानात भारतीय रेल्वे स्थापना संचालनालयाच्या कार्मिक कल्याण कोषमधून 126 होमिओपॅथी आणि 40 आयुर्वेदिक वैद्यकीय केंद्र चालवीत आहे.
 3. आयुष मंत्रालय ही आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, सोवा-रिग्पा (पारंपारिक तिबेटी औषध) आणि इतर स्वदेशी औषध प्रणाली इत्यादी क्षेत्रांमध्ये विकास, शिक्षण आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने भारतामधील एक सरकारी संस्था आहे.
 4. मार्च 1995 मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी प्रणाली म्हणून हे विभाग तयार करण्यात आले.
 5. 9 नोव्हेंबर 2014 पासून याला AYUSH मंत्रालय म्हणून ओळखले जाऊ लागले.
तुम्हाला हे माहित आहे का?
 1. करारांतर्गत:- 
 2. बी. आर. सिंह रुग्णालय, 
 3. पूर्व रेल्वे, 
 4. पेरंबूर रेल्वे रुग्णालय, 
 5. दक्षिण रेल्वे, 
 6. उत्तर रेल्वेचे केंद्रीय रुग्णालय, 
 7. पश्चिम रेल्वेचे जे. आर. रुग्णालय
 8. उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेचे केंद्रीय रुग्णालय

या ठिकाणी आयुष सुविधा उभारली जाणार आहे.


'Solarum 2.0' may have water-rich planets: a study

 1. वर्ष 2016 मध्ये पहिल्यांदा आकाशात 39 प्रकाशवर्षे दूर असलेला “ट्रॅपीस्ट (TRAPPIST)-1” नावाच्या तार्‍याभोवती परिभ्रमण करणार्‍या ग्रहांना शोधून काढण्यात आले होते, ज्याला ‘सूर्यमाला 2.0’ असे नाव देण्यात आले आहे.
 2. या ग्रहांचा वेध NASA च्या स्पिट्झर अंतराळ दुर्बीणच्या सहाय्याने आणि ला सिल्ला येथील ‘ट्रॅपीस्ट’ रोबोटिक दुर्बिणीच्या निरिक्षणामधून घेतला गेला होता.
 3. स्वित्झर्लंड येथील बर्न विद्यापीठातल्या खगोलशास्त्रज्ञ सायमन ग्रिम यांच्या नेतृत्वाखाली एका चमूने आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व माहितीवरून एक अतिशय जटिल संगणकीय संरचना पद्धतींचा वापर केला आहे आणि त्यापासून ग्रहांच्या घनतेसंदर्भात अधिक चांगल्याप्रकारे स्पष्टता दिली आहे.
 4. आपल्या सूर्यमालेबाहेरील पहिला ग्रह वर्ष 1992 मध्ये शोधला गेला.
 5. तेव्हापासून याप्रकारचे एकूण 3,577 ग्रह सापडले आहेत. यापैकी 12 पेक्षा कमी ग्रहांवर जीवन आढळण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे मानले जाते.

ट्रॅपीस्ट-1 सूर्यमाला

 1. ट्रॅपीस्ट-1 सूर्यमालेत कमीतकमी सात ग्रह आहेत, प्रत्येकाचे आकारमान पृथ्वीच्या समान आहे. ह्या ग्रहांची नावे आहेत – ‘ट्रॅपीस्ट-1b, c, d, e, f, g आणि ट्रॅपीस्ट-1h’.
 2. असे आढळून आले आहे की, ट्रॅपीस्ट-1 ग्रह इतक्या जवळ-जवळ आहेत, की ते एकमेकांच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात व्यत्यय आणतात, त्यामुळे ते जेव्हा तार्‍यापुढून समोर जातात तेव्हा ते अगदी थोड्याप्रमाणात स्थानांतरीत होतात. हे स्थानांतरण ग्रहाचे आकारमान, त्याचे तार्‍यापासूनचे अंतर आणि इतर परिभ्रमण कक्षेच्या मापदंडावर अवलंबून आहे.
 3. अभ्यासात असे आढळून आले आहे की, सातही ट्रॅपीस्ट-1 ग्रहांवर नापीक खडकाळ जगत नाही. ग्रहांवर बहुसंख्य प्रमाणात अस्थिर पदार्थ आहेत.
 4. काही प्रकरणांमध्ये या पदार्थांचे प्रमाण ग्रहांच्या वस्तुमानापैकी 5% इतके असल्याचे दिसते. जेव्हा की आकारमानाच्या तुलनेत पृथ्वीवर फक्त 0.02% पाणी आहे. ट्रॅपीस्ट-1b आणि ट्रॅपीस्ट-1c हे अगदी आतल्या ग्रहांपैकी आहेत, ज्याचा केंद्र भाग कठीण असण्याची शक्यता आहे.
 5. ट्रॅपीस्ट-1d चे वस्तुमान पृथ्वीचा वस्तुमानाच्या सुमारे 30% एवढे आहे आणि सर्व ग्रहांमध्ये सर्वात लहान आहे. शास्त्रज्ञ याबाबत अनिश्चित आहेत, की त्यावर मोठ्या प्रमाणात वायूमंडळ असावे का त्यावर महासागर किंवा बर्फाचा थर आहे. 
 6. ट्रॅपीस्ट-1e हा एकमेव ग्रह आहे जो पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोड्या प्रमाणात अधिक घन आहे आणि त्याचा केंद्र भाग हा प्रामुख्याने लोखंडी असण्याची शक्यता आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणात वायूमंडळ, महासागर किंवा बर्फाचा थर नसावा.
 7. ट्रॅपीस्ट-1f, g आणि ट्रॅपीस्ट-1h हे तार्‍यापासून दूर अंतरावर आहेत, ज्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावरील पाणी बर्फामध्ये रूपांतरित झालेला असावा. या ग्रहांवर विरळ वातावरणात असल्यास पृथ्वीवर आढळणार्‍या कार्बन डायॉक्साईडसारख्या जड रेणूंचा शोध घेणे संभव ठरणार नाही.
 8. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे सर्वाधिक घनता असलेले ग्रह तार्‍याजवळ नाहीत आणि सर्वाधिक गोठलेल्या ग्रहांवर घनदाट वातावरण नाही, असे आढळून आले आहे. 


Maratha Light Infantry completed 250 years

 1. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या व मराठ्यांच्या युद्धकौशल्याची शौर्यगाथा त्रिखंडात दुमदुमत ठेवणाऱ्या ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’ या लष्करातील सर्वात जुन्या सैन्यदलास ३ फेब्रुवारी रोजी २५० वर्षे पूर्ण झाली.
 2. या रेजिमेंटच्या द्विशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत.
 3. या कार्यक्रमांची सुरुवात दिल्लीतून होणार आहे.
 4. दिल्ली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठा लाइट इन्फन्ट्रीची अभिमानास्पद शौर्यगाथा विषद करणाऱ्या ‘व्हिक्टरी अँड व्हेलॉर’ या सचित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल.

 मराठा लाइट इन्फन्ट्री

 1. स्थापना : सन १७६८ (मुंबई बेटांवरील ईस्ट इंडिया कंपनीच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी ‘बॉम्ब शिपाई’ दलाची दुसरी फलटण म्हणून.)
 2. मुख्यालय : बेळगाव (कर्नाटक)
 3. आदर्श : छत्रपती शिवाजी महाराज.
 4. ध्येय : कर्तव्य, सन्मान, धैर्य.
 5. युद्धघोषणा : बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
 6. स्फूर्तिस्थान : गनिमी युद्धातील मराठा योद्ध्यांचे कौशल्य.
 7. युद्धभूमीवर अत्यंत चपळ हालचाली ही ओळख असलेले हे सैन्यदल ब्रिटिश काळापासून ‘लाइट इन्फन्ट्री’चा दर्जा मिळालेली पहिली रेजिमेंट आहे.
 8. ही रेजिमेंट नौदलाच्या ‘आयएनएस मुंबई’ युद्धनौकेशी व हवाईदलाच्या २० व्या स्क्वाड्रनशी (सुखोई) संलग्न आहे.
 9. दोन व्हिक्टोरिया क्रॉस व चार अशोकचक्रांसह एकूण ३२० शौर्य पदके व युद्ध पदके या रेजिमेंटच्या नावावर आहेत.
 10. पहिल्या महायुद्धात मोसापोटेमिया आघाडीवरील विजयात सिंहाचा वाटा.
 11. दुसऱ्या महायुद्धात दक्षिण आशियाई आघाडी, उत्तर आफ्रिका व इटलीमधील युद्धआघाड्यांवर अजोड पराक्रम.
 12. गोवामुक्ती व हैदराबाद मुक्तीसह स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक युद्धात शौर्याची पराकाष्ठा.
 13. या रेजिमेंटचे अधिकारी जनरल जे. जे. सिंग सन २००५ मध्ये देशाचे लष्करप्रमुखझाले.
 14. रेजिमेंटचे सध्याचे प्रमुख : (कर्नल) लेफ्ट जनरल पी जे एस पन्नू


With the help of high technology 'Akhil Bharat Tiger Recognition 2018' will be done

 1. भारत सरकारकडून देशात चौथी ‘अखिल भारतीय व्याघ्र मोजणी-2018’ उपक्रम राबविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
 2. यासाठी सुमारे 15 हजारांहून अधिक ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहे.
 3. मोजणी करण्यासाठी मोबाइल अनुप्रयोग आणि M-STrIPES (मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर्स- इंटेन्सिव प्रोटेक्शन अँड इकोलॉंजी स्टेटस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
 4. या उपक्रमाला 10.22  कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे.
 5. देहरादून मधील भारतीय वन्यजीव संस्था (WII) कडून भारतात दर चार वर्षांमध्ये एकदा राष्ट्रीय पातळीवर वाघांची मोजणी केली जाते.
 6. WII राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या निर्देशावरून वाघांची मोजणी करते आणि यासाठी राज्याच्या वन विभाग आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाते.
 7. वन्यजीव (संरक्षण) कायदा-1972 अंतर्गत हा कार्यक्रम आहे.
 8. वर्ष 2014 मध्ये झालेल्या मोजणीमध्ये देशात वाघांची संख्या 2,226 इतकी होती. त्याआधी ही संख्या वर्ष 2006 मध्ये 1411, वर्ष 2010 मध्ये 1,706 इतकी होती.


Prime Minister Modi's 'Anxam Warriors' book for students

 1. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्लीत झाले.
 2. या पुस्तकात परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा टाळावा याबाबत विद्यार्थ्यांना मौलीक सल्ले देण्यात आले आहेत.
 3. पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थ्यांना सल्ले देत असतात. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी ते विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमही करतात.
 4. यातूनच या पुस्तकाची कल्पना आकाराला आली आणि त्यांनी या विषयावरील आपल्या विचारांचे संकलन करण्याचे ठरवले.
 5. २०८ पानांचे हे पुस्तक पेंग्विन रँडन हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले असून, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 6. या पुस्तकात, कुठलाही तणाव किंवा चिंता याशिवाय परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी जवळजवळ २५ ‘मंत्र’ दिले आहेत.
 7. परीक्षेशी संबंधित ताणाशी कसे जुळवून घ्यावे, परीक्षेच्या काळात शांत कसे राहावे, तसेच परीक्षा संपल्यानंतर काय करावे यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यात भर देण्यात आला आहे.


Top