MIRABAI CHANU WEIGHTLIFTING

 1. विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. या दुखापतीमुळे चानू 2018 मध्ये सहा महिन्यांपासून अधिक वेळ विविध स्पर्धांपासून दूर राहिली होती. 

 2. मिळालेल्या माहितीनुसार चानू हीने 48 किलो गटात 192 किलो वजन उचलून सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्ण मिळवले आहे. टोकियो 2020 आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्या कटसाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वपूर्ण ठरतील.

 3. चानूने स्नॅचमध्ये 82 किलो व क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 110 किलो वजन उलचून अव्वल स्थान मिळवले. दुखापतीतून सावरण्यासाठी तिला विस्तृत फिजीओथेरपी करावी लागली.

 4. चानू ही दुखापतीमुळे गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. ही स्पर्धा गोल्ड लेव्हल आॅलिम्पिक पात्रता आहे. तिला दुखापतीमुळे जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते.


AIRFORCE ISRO MISSION

 1. अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी दिली.

 2. लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे 67व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते.

 3. पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट आॅफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

 4. अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2022 पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.


DIN VISHESH

 1. भारताचे तिसरे राष्ट्रपतीशिक्षणतज्ञपद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.

 2. सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.

 3. NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.

 4. सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.

 5. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.


Top