up will also ban plastic

 1. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. 15 जुलैपासून उत्तर प्रदेशातही प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. काही वेळापूर्वीच या संदर्भातले वृत्त आले आहे. महाराष्ट्रात या निर्णयाचा मनसेने विरोध केला आहे.
 3. उत्तर प्रदेशात प्लास्टिकबंदीचे स्वागत होते की विरोध हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्याला 5 हजारांपासून 25 हजारांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
 4. तसेच अशी काही नियमावली उत्तरप्रदेश सरकारने म्हणजेच योगी आदित्यनाथ सरकारने तयार केली आहे का? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र आता उत्तरप्रदेशात 15 जुलैपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.


ISRO SUCCESSFULL TEST

 1. चांद्रयान, मंगळस्वारी, एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 6 जुलै रोजी आणखी एक पाऊल पुढे टाकले.
 2. मानवी अवकाश मोहिमेतील आणीबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्यासाठीच्या तंत्राची इस्रोने यशस्वी चाचणी केली.
 3. मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू एस्केप सिस्टीमची म्हणजेच अवकाशवीरांना आणीबाणीच्या क्षणी जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी इस्रोने यशस्वी केली.
 4. मानवी अवकाश मोहिमेमध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यासही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. त्यानंतर हे क्रू मोडय़ुल म्हणजे अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो. उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली ही पहिलीच आकस्मिक आपदा चाचणी असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
 5. श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन केंद्रावरून 6 जुलै रोजी सकाळी प्रक्षेपक आकाशात झेपावले. प्रक्षेपक यान जमिनीपासून 2.7 कि.मी. ऊंचीवर असताना एस्केप सिस्टीम आणि क्रू मोडय़ुल प्रक्षेपक यानापासून वेगळे करण्यात आले.
 6. चाचणीच्या वेळी अंतराळवीराऐवजी त्याचा पुतळा वापरण्यात आला होता. यानाचे दोन भाग होताच अंतराळवीराचा पुतळा असलेले कॅप्सूल पॅराशूटच्या साहाय्याने बंगालच्या उपसागरात विशिष्ट ठिकाणी उतरविण्यात आले.


PRITI TANEJA HAS WON DESMAND ELIAT AWARD

 1. भारतीय वंशाच्या तरुण लेखिका प्रीती तनेजा यांच्या ‘वुइ दॅट आर यंग’ या पुस्तकाला डेस्मंड एलियट पुरस्कार मिळाला आहे.
 2. कोणत्याही लेखकाच्या पहिल्या इंग्रजी कादंबरीकरिता १० हजार पौंडांचा हा पुरस्कार दिला जातो.
 3. ‘वुइ दॅट आर यंग’ ही कादंबरी शेक्सपीअरच्या ‘किंग लियर’ या शोकांतिकेवर असून, त्याला आताच्या काळातील पार्श्वभूमी आहे.
 4. ही कादंबरी फ्रान्स, डेन्मार्क, इस्रायल व जर्मनी या देशांत त्यांच्या भाषांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. आता अमेरिका व कॅनडातही प्रसिद्ध होणार आहे. या कादंबरीला झलक प्राइज व फोलिओ प्राइज हे दोन पुरस्कार आधीच मिळाले आहेत.
 5. प्रीती तनेजा यांचा जन्म इंग्लंडमधला असून, त्यांचे आईवडील दोघेही भारतीय आहेत. वॉरविक विद्यापीठाच्या त्या स्नातक आहेत.
 6. इराक, जॉर्डन, रवांडा, कोसोवो येथे त्यांनी मानवी हक्क वार्ताहर म्हणून काम केले आहे. त्यांचे लेखन ‘द गार्डियन’ व ‘ओपन डेमोक्रसी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.
 7. २०१४मध्ये त्यांच्या ‘कुमकुम मल्होत्रा’ या कादंबरीस गेटहाऊस प्रेस न्यू फिक्शन पुरस्कार मिळाला होता.
 8. व्हिज्युअल व्हर्सच्या संपादक व नव्या जगातील तरुण विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्या इंग्लंडमध्ये वंचितांसाठी काम करीत आहेत.


Mukesh Ambani Reelected as reliance industry

 1. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.
 2. तर अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर 1977 पासून आहेत.
 3. त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै 2002 मध्ये कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
 4. मुंबई येथे 5 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 5. तसेच ठरावानुसार मुकेश अंबानी यांना वार्षिक 4.17 कोटी वेतन व 59 लाख रुपयांचे इतर भत्ते देण्यात येतील.
 6. तर यात निवृत्तीच्या लाभांचा समावेश नाही. निव्वळ नफ्याच्या आधारे मुकेश हे बोनसला पात्र असतील.


Top