1. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या  'जीवनगौरव' पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक  डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड  झाली आहे.
 2. १४ जून रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
 3. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी नाट्य परिषदेतर्फे १४ जून रोजी पुरस्कार प्रदान केले जातात.


 1. विमुद्रीकरणानंतर अर्थव्यवस्था कॅशलेसकडे वळत असताना राज्यातही डिजिधन जनजागृती कार्यक्रम धडाक्यात राबविला जातोय. तसेच या उपक्रमाचाच एक भाग म्हणून  मुख्यमंत्री कार्यालय व  तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे महाविद्यालये कॅशलेसवर भर  दिला जात असून, राज्यातील ४७६  महाविद्यालयांनी नोंदणी केली.
 2. मुख्यमंत्री कार्यालय व तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे एप्रिल अखेरीस व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील प्राचार्यांना पत्र पाठवून कॅशलेस व्यवहार करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. शुल्क आकारण्याची पद्धती; तसेच उपाहारगृहे व अन्य बाबींसाठी कॅशलेस व्यवहार व्हावेत, असे या पत्रात नमूद केले होते.
 3. चांगली कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांचा सत्कार करणार असल्याचेही जाहीर केले होते. प्राचार्य व उपक्रम संयोजनाची जबाबदारी असलेल्या समन्वयकांच्या जबाबदारीचीही माहिती नमूद केली होती.
 4. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांना संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत गेल्या महिनाभरात ४७६  महाविद्यालयांनी नोंदणी केली.


 1. देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. 'क्यूएस' या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात २०१८ साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
 2. विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत ४८१ - ४९१ स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत ८०१  ते १००० असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ 'पुणे विद्यापीठ' असा उल्लेख केलेला आहे.
 3. 'ब्रिक्स' देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला १३१ ते १४० आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ १७६  व्या स्थानावर दाखविले आहे. कर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच  देशात अव्वल स्थान पटकावले आहे.


 1. रोहण बोपन्नाने कॅनडाची त्याची  सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.
 2. बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज  2-6, 6-2, 12-10 ने मोडून काढली.
 3. भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.


Top

Whoops, looks like something went wrong.