World Bank Financial Assistance for 'Atal Bhujal' scheme of Rs. 6,000 crore

 1. भारत सरकारच्या जलस्रोत मंत्रालयाने तयार केलेल्या 6000 कोटी रुपये खर्च असलेल्या ‘अटल भूजल’ योजनेला जागतिक बँकेने अर्थसहाय्य देण्याकरिता नुकतीच आपली मंजुरी दिली आहे.
 2. देशाच्या अनेक भागांमध्ये भूजलाची पातळी खालावत आहे, ती पूर्ववत करण्यासाठी अटल भूजल योजना तयार करण्यात आली आहे.
 3. योजनेची वैशिष्ट्ये:-
  1. सन 2018-19 ते सन 2022-23 या पाच वर्षांच्या मुदतीमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.
  2. या योजनेंतर्गत लोकसहभागातून अनेक भूभागांमध्ये भूजल स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  3. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही योजना राबवली जाणार आहे.
  4. भूजलाचा स्तर कायम राखण्यासाठी आणि जल व्यवस्थापनाच्या कामी लोकसहभाग वाढविण्यासाठी या योजनेंतर्गत निधी पुरवठा केला जाणार आहे.
  5. या राज्यांमध्ये   भारतामधील भूजलाच्या दृष्टीने अधिक-वापरलेले, गंभीर आणि अर्ध-गंभीर विभागांच्या एकूण संख्येपैकी सुमारे 25% भाग आहेत.
  6. ते भारतात आढळणार्‍या दोन प्रमुख प्रकारच्या भूजल प्रणालींना व्यापतात, ते म्हणजे – गाळाची जमीन आणि कठीण दगडाखाली असलेले पाणकोठ्ठे.
  7. योजनेंतर्गत निधी व्यवस्थापनासोबतच पाण्याचे संवर्धन आणि पाण्याचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना पुरविण्यात येईल.
  8. शिवाय यासंदर्भात शासनाच्या सुरू असलेल्या योजनांनादेखील ही योजना पाठबळ देणार आहे.
  9. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे 78 जिल्ह्यांमधील 8350 ग्रामपंचायतींना लाभ होणे अपेक्षित आहे.
जागतिक बँक
 1. जागतिक बँक  ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे.
 2. हीची स्थापना डिसेंबर २७, इ.स. १९४4 मध्ये झाली. ब्रेटन वुडस् पद्धती समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या.
 3. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे.
 4. या बंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
 5. गरीबी दूर करण्यासाठी ही बँक जगभरात विषेश प्रयत्नशील आहे.
 6. जागतिक बँकेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :-
  1. सरकारांचे सबलीकरण व सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
  2. अर्थव्यवस्थांचा विकास
  3. भ्रष्टाचार निर्मूलन
  4. गरीबी हटाव
  5. संशोधन व शिक्षण
 7. शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे.
 8. भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. पैकी भारतातील गुजरात मधील नर्मदा नदी वरील विवादास्पद धरण सरदार सरोवर प्रकल्पाचे कर्ज या बेंकेने प्रकल्पातील धोके दिसून आल्याने परत घेतली आहे.
 9. इ.स. १९९८ सालातल्या मंदीच्या काळात या जागतिक बँकेने मेक्सिको व इंडोनेशिया या देशांना दिलेला सल्ला आर्थीक दॄष्ट्या अतिशय धोक्याचा ठरला आहे.

 


Methanol Economy: India's dream of creating a hydrogen-based fuel system

 1. भारताला वर्तमान परिस्थितीत दरवर्षी 2900 कोटी लीटर पेट्रोल आणि 9000 कोटी लीटर डिझेलची आवश्‍यकता भासते. आज याबाबतीत भारत जगातला सहावा सर्वात मोठा ग्राहक आहे.
 2. विकासामुळे वाढती ऊर्जा मागणी वर्षागणिक वाढणार आहे आणि 2030 सालापर्यंत हे प्रमाण दुप्पट होणार. सोबतच भारताचा कच्च्या तेलाचा आयात खर्च जवळपास 6 लाख कोटी रुपये आहे.
 3. हायड्रोकार्बन इंधनामुळे हरितगृह वायूंच्या होणार्‍या उत्सर्जनात, भारत जगातला तिसरा सर्वात मोठा ऊर्जेसंबंधी कार्बनडाय ऑक्‍साइड उत्‍सर्जक देश आहे.
 4. त्यामुळे NITI आयोगाने भारताला 'मिथेनॉल अर्थसत्ता' बनविण्याचा ध्यास घेतला आहे.
 5. त्यानुसार, आयोगाने 2030 सालापर्यंत मिथेनॉलने 20% कच्च्या तेलाच्या आयातीला पुनर्स्थापित करण्याची एक योजना तयार केलेली आहे.
 6. त्यामुळे 40% हून अधिक प्रमाणात प्रदूषण रोखले जाऊ शकते. त्यासाठी जवळपास 30 MT मिथेनॉलची आवश्‍यकता भासणार.
 7. मिथेनॉल आणि DME पेट्रोल-डिझेल स्वस्त असल्याने आपला इंधन खर्च 30% ने कमी होऊ शकतो.
 8. आयोगाने 2030 सालापर्यंत वार्षिक खर्चात $100 अब्ज कपात करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. 2022 सालापर्यंत भारताचा इंधन आयात खर्च 10% पर्यंत घटविण्याचे लक्ष्‍य निर्धारित केले गेले आहे.
 9. मिथेनॉल इंधन आणि त्याचे महत्त्व:-
  1. मिथेनॉल इंधन स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त असते. मिथेनॉलचा वापर केल्यास CNG च्या तुलनेत वाहनांमध्ये कमीतकमी बदल करण्याची आवश्यकता भासणार आहे.
  2. हे इंधन रेल्वे, सागरी क्षेत्र, जेनसेट्स, वीज निर्मिती यामध्ये वापरण्यात येणार्‍या डिझेल ला बदलण्यास वापरले जाऊ शकते आणि मिथेनॉल आधारित संशोधने हायब्रिड आणि इलेक्ट्रिक जनित वाहतुकीसाठी आदर्श पूरक ठरू शकतात.
  3. मिथेनॉल हे जवळपास शून्‍य SOx आणि NOx वायूंचे उत्‍सर्जन करते. या पदार्थाचा वायु रूप-DME ला LPG सोबत मिसळवले जाऊ शकते.
  4. पेट्रोलमध्ये मिथेनॉल 15 (M 15) प्रदूषणाला 33% पर्यंत कमी करणार आणि मिथेनॉलने डिझेलला बदलल्यास 80% हून अधिक प्रमाणात प्रदूषण कमी होणार. 
  5. मिथेनॉलला नैसर्गिक वायु, उच्च राख प्रमाण असलेला कोळसा, जैविक पदार्थ, MSW, इतर ज्वलनशिल वायूंपासून बनविले जाऊ शकते आणि भारतीय कोळसा व सर्व अन्य इंधन-पदार्थापासून प्रति लीटर 19 रुपये या दराने मिथेनॉलचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
  6. मिथेनॉलचा वापर ऊर्जा निर्मिती इंधन, वाहतूक इंधन आणि स्वयंपाकाच्या इंधनासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये भारताचे तेलाच्या आयातीवरील खर्च अंदाजे 20% नी कमी केले जाऊ शकते.
 10. NITI आयोगाची योजना:-
  1. भारतात सध्या मिथेनॉलसाठी वार्षिक 2 MT उत्‍पादन क्षमता प्रस्थापित झालेली आहे.
  2. NITI आयोगाच्या योजनेनुसार, भारत भारतीय उच्च-राख कोळसा, वातावरणातील उत्सर्जित वायु आणि जैविक पदार्थांपासून 2025 सालापर्यंत वार्षिक रूपाने 20 MT मिथेनॉलचे उत्‍पादन घेऊ शकतो.
  3. भारतात सध्या 125 अब्ज टन वजनी प्रमाणित कोळसा साठा आहे आणि वर्षाला 500 अब्ज टन जैविक पदार्थ निर्माण होते.
 11. क्षेत्रनिहाय :-
  1. लोहमार्ग क्षेत्र - भारतीय रेल्वे वर्षाला 3 अब्ज लिटर डिझेल वापरते आणि त्याचा वार्षिक खर्च 15000 कोटी रुपये येतो.
  2. एकदा का सर्व 6000 डिझेल इंजिने (प्रति इंजिन 1 कोटीहून कमी खर्चाने) मिथेनॉल इंधनासाठी रुपांतरित केल्या गेल्यास, वार्षिक खर्च 50% कमी केला जाऊ शकतो. 
  3. सागरी क्षेत्र - भारत 500 जहाजे संपूर्णता मिथेनॉलवर चालविण्याची योजना करीत आहे. अंतर्देशीय जलमार्गावर चालणार्‍या रो-रो (रोल ऑन अँड रोल ऑफ) जहाजांना संपूर्णता मिथेनॉलवर चालवले जाईल.
  4. ऊर्जा व इतर उद्योग क्षेत्र – एकट्या भारताने HFO (जड इंधन तेल) संबंधित 22000 MW ची क्षमता स्थापित केली आहे. संपूर्ण HFO चा वापर मिथेनॉलने बदलल्या जाऊ शकतो. मोबाइल टॉवर्स  (सुमारे 750000) यांच्यासाठीचे ऊर्जास्त्रोत पुढील दोन वर्षात मिथेनॉल आधारित रिफॉर्मर / फ्युएल सेलद्वारे पूर्णपणे बदलली जाऊ शकते. नाप्था, LFOI (हलके इंधन तेल) आणि इतर अस्वच्छ इंधनावर चालणारे औद्योगिक डिझेल जेनसेट्स, गॅस टर्बाइन देखील पूर्णपणे बदलली जाऊ शकते. औद्योगिक बॉयलरला देखील मिथेनॉल आधारित केले जाईल.
 12. किमान 20% डिझेलचा वापर पुढील 5-7 वर्षांमध्ये कमी केले जाऊ शकते आणि त्यामधून वर्षाला 26000 कोटी रुपयांची बचत होऊ शकणार आहे.
 13. येत्या 3 वर्षात LPG मध्ये 6000 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
 14. गॅसोलीन सहित मिथेनॉल मिश्रण कार्यक्रमामधून येत्या 3 वर्षात वर्षाला किमान 5000 कोटी रुपयांची बचत होऊ शकणार आहे. 


 RBI announces second bimonthly 'Monetary Policy 2018-19'

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यांच्या नेतृत्वाखालील मौद्रिक धोरण समिती (MPC) ने द्वितीय द्वैमासिक ‘मौद्रिक धोरण 2018-19’ (नाणे/ चलनविषयक/ Monetary Policy) जाहीर केले आहे.
 2. नव्या धोरणात्मक दरांनुसार, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट यांच्यामध्ये 0.25% वाढ करण्यात आली आहे.
 3. त्यामुळे नवे रेपो रेट (लघुकालीन कर्जाचा दर) 6.25% आणि रिव्हर्स रेपो रेट 6% एवढे झाले आहे. रोकड साठा गुणोत्तर (Cash reserve ratio) 4% एवढे कायम ठेवले आहे.
 4. अन्य बाबी :-  
 5. RBI ने वित्त वर्ष 2018-2019 साठी GDP वृद्धीदराचा अंदाज 7.4% इतका कायम ठेवला.
 6. लिक्विडिटी कव्हरेज रेशीयोची (LCR) पूर्तता करण्यासाठी स्टॅट्यूटरी लिक्विडिटी रेशीयो (SLR) याच्या 2% एवढ्या अधिक भागाला परवानगी दिली गेली.
 7. बँका आता LCRची पूर्तता करण्यासाठी 13% पैकी SLRचा भाग वापरू शकतात.
 8. वित्त वर्ष 2019 च्या एप्रिल-सप्टेंबर या कालावधीसाठी RBI च्या किरकोळ महागाई दाराचे लक्ष्य 4.7-5.1% एवढे ठेवले गेले आहे.
 9. RBI कडून देशभरातील बँकांना कर्ज पुरवठा केला जातो.
 10. या कर्जावर RBI कडून आकारल्या जाणार्‍या व्याज दराला ‘रेपो रेट’ म्हणतात. तर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँकेच्या ठेवीवर RBI कडून बँकांना देय केले जाणारे व्याज दर होय.


 Krishibahushan Dadaji Khobragade passed away

 1. तांदळाचे संशोधक म्हणून देशात प्रसिद्ध असणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांचे चंद्रपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते नांदेडमधील नागभीड तालुक्यातील होते.
 2. दादाजी खोब्रागडे हे मागील काही महिन्यांपासून अर्धांगवायू या दुर्धर आजाराशी झुंज देत होते. अर्धांगवायूने त्यांचे शरीर सुन्न झाले होते.
 3. त्यांनी आपल्या संशोधनातून शेतकऱ्यांना पर्यायाने देशाला समृद्ध केले होते. प्रसिद्ध ‘एचएमटी’ या तांदळाचा प्रकारासह त्यांनी इतर ८ वाणे शोधली आहेत.
 4. त्यांचे शिक्षण जेमतेम इयत्ता तिसरीपर्यंत झाले. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणसुद्धा घेता आले नाही.
 5. मात्र त्यांनी आपल्या अवघ्या दीड एकर शेतात धान पीक लावून त्यावर संशोधन केले.दादाजींनी धान संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे.
 6. १९८५-९०च्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या एचएमटी कंपनीच्या घड्याळ्यांमुळे त्यांनी शोधलेल्या एका प्रसिद्ध वाणाला ‘एचएमटी’ हे नाव देण्यात आले होते.
 7. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोर्ब्सने २०१०मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले होते.
 8. ५ जानेवारी २००५ रोजी अहमदाबाद येथे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 9. तर २००६ मध्ये महाराष्ट्र शासनानेदेखील तांदूळ संशोधनातील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले.
 10. शालेय पाठ्यपुस्तकात ‘थोरांची ओळख’ या शिर्षकाखालील एका धड्यात त्यांच्या कार्याची ओळख करुन देण्यात आली आहे.
 11. त्यांनी विकसित केलेली धानाची प्रजाती आजही देशाच्या विविध भागात उत्पादित केली जाते.
 12. दादाजींनी विकसित केलेले नऊ वाण : एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू


Deputy Director of the Reserve Bank M. K. Jain

 1. आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. के. जैन यांची रिझर्व्ह बँकेतील डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. बँक क्षेत्रातून नियुक्त करण्यात येणाऱ्या पदाकरिता जैन यांची नियुक्ती झाली आहे. या पदावर जैन हे पुढील तीन वर्षांसाठी असतील.
 3. डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा हे जुलै २०१७मध्ये निवृत्त झाल्यापासून आरबीआयचे चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नरपद रिक्त होते.
 4. रिझर्व्ह बँकेत सध्या विरल आचार्य, एन. एस. विश्वनाथन आणि बी. पी. कांगो हे तीन डेप्युटी गव्हर्नर आहेत.
 5. जैन हे आयडीबीआय बँकेत मार्च २०१७पासून व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत.
 6. तीन दशकांचा अनुभव असलेल्या जैन यांनी यापूर्वी इंडियन बँकत वरिष्ठ अधिकारी पदावर जबाबदारी हाताळली आहे.


Top