International Women's Day: 8 March

 1. "द टाइम इज नाऊ: रूरल अँड अर्बन अॅक्टिविस्ट्स ट्रान्सफॉर्मिंग विमेन्स लाईव्हज"
 2. या संकल्पनेखाली आज 08 मार्च 2018 रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.
 3. यावर्षी, आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांचे अधिकार, समानता आणि न्याय यांसाठी अभूतपूर्व जागतिक चळवळीला प्रोत्साहन दिले जात आहे.
 4. लैंगिक शोषण, हिंसा आणि महिलांशी भेदभाव अश्या मुद्द्यांना आज चर्चेसाठी जागतिक मंच मिळत आहे, जे बदलासाठी निश्चितीच एक पाऊल आहे.
 5. यावर्षी हा दिन ग्रामीण आणि शहरी अश्या दोन्ही व्यवस्थेत महिलांच्या बाबतीत बदल आणण्याच्या दिशेने कृतीस चालना देण्यासाठी, महिलांच्या सबळीकरणासाठी आणि महिलांच्या अधिकारांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांसाठी एक संधी घेवून आलेला आहे.
 6. 2030 कार्यसूचीचे प्रमुख लक्ष्य:-
  1. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींना मोफत, न्यायसंगत आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळण्याची खात्री करणे.
  2. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींच्या गुणवत्तेसाठी बाल्यावस्थेचा विकास, घ्यावयाची काळजी आणि बालवाडीमधील शिक्षण यास प्रवेश मिळण्याची खात्री करणे, जेणेकरून ते प्राथमिक शिक्षणास तयार असतील.
  3. सर्वत्र सर्व महिला आणि मुलींच्या बाबतीत असलेला सर्व प्रकारचा भेदभाव समाप्त करणे.
  4. तस्करी आणि लैंगिक अत्याचार आणि शोषण अश्या आणि इतर प्रकारांच्या समावेशासोबतच सार्वजनिक आणि खाजगी कामाच्या वातावरणात सर्व महिला आणि मुलींच्या विरुद्ध असलेली सर्व प्रकारची हिंसा दूर करणे.
  5. बाल, लवकर आणि सक्तीचे विवाह आणि महिला जननेंद्रियासंबंधित विकृत कार्ये अश्या सर्व हानीकारक प्रथांना बाद करणे.
आंतरराष्ट्रीय महिला दिन
 1. पार्श्वभूमी:-
  1. आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. राष्ट्रीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा आर्थिक अश्या अनेक क्षेत्रात सामान्य स्त्रियांनी केलेल्या असामान्य कार्यांबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  2. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उगमस्थान उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या सुरूवातीला चालवण्यात आलेल्या कामगार चळवळीच्या उपक्रमामध्ये आढळून येते.
  3. 1909 साली पहिल्यांदा 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेमध्ये राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता. 1908 साली कामाच्या परिस्थिती विरोधात न्यूयॉर्कमध्ये महिला कापड कामगारांनी संप पुकारला होता. या घटनेच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या समाजवादी पक्षाने हा दिवस साजरा केला होता.
  4. त्यानंतर 1910 साली कोपनहेगन येथे झालेल्या सोशियालिस्ट इंटरनॅशनल संमेलनामध्ये ‘महिला दिन’ म्हणून स्थापना करण्यात आली. याविषयीचा प्रस्ताव फिन्निश संसदेत निवडून आलेल्या पहिल्या तीन महिलांच्या समावेशासह 17 देशांतील 100 महिलांनी या परिषदेत एकमताने मान्य केले.
  5. परिणामी, 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये प्रथमच 19 मार्च रोजी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा केला गेला.
  6. त्यानंतर 1975 साली “आंतरराष्ट्रीय महिला वर्ष” या काळात, संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘8 मार्च’ हा दिवस “आंतरराष्ट्रीय महिला दिन” म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
  7. 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची सनद (Charter) यावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. हा महिला आणि पुरुष दरम्यान समता तत्त्व या आधारावर भर देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. 
 2. भारताकडून या संदर्भात उचलली गेलेली पाऊले:-
  1. 1950 साली, भारत हा त्याच्या नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ (स्त्री-पुरुष) मतदान मान्य करणार्‍या जगातील काही देशांपैकी एक होता. 
  2. भारत सरकारने 1999 सालापासून ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले. हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो.
  3. हा पुरस्कार महिला व बाल विकास मंत्रालयाकडून विविध क्षेत्रातील महिलांना आणि संस्थांना दिला जातो. या क्षेत्रांमध्ये सामाजिक उद्योजकता, कला, फलोत्पादन, योग, पर्यावरण संवर्धन, पत्रकारिता, नृत्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रांचा समावेश केला जातो.
  4. यापूर्वीच्या पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये ISRO च्या अभियंता व शास्त्रज्ञ मुमताज काझी (पहिल्या डिझेल ट्रेन वाहक), पल्लवी फौजदार (मोटरसायकलस्वार) आणि सुनीता चोकेन (गिर्यारोहक) यांची नावे आहेत.


Child marriage decreased by 20% in the last decade: UNICEF

 1. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) च्या ताज्या अहवालानुसार, एक दशक आधी भारतामध्ये जवळजवळ 47% मुलींचा विवाह वयाच्या 18 वर्षाआधीच लावला जात होता, मात्र आता यात 20% नी घट आलेली असून हा आकडा 27% वर आलेला आहे.
 2. भारतात बालविवाहांच्या बाबतीत मोठी घट नोंदवली गेली आहे. मात्र अजूनही देशाच्या कित्येक राज्यांमध्ये अज्ञान मुलांचा विवाह लावला जातो.
 3. बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथे बालविवाहाचा दर 40% हून अधिक आहे. तर तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये हा दर 20% हून कमी आहे.
 4. UNICEF च्या दाव्यानुसार, मुलींना दिले जाणारे शिक्षण आणि शासनाकडून चालवल्या जाणार्‍या उपक्रमांचा लोकांवर मोठा प्रभाव पडलेला आहे.
 5. कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये बालविवाहासंबंधी जागृती वाढलेली आहे. आता लोकांना या प्रथेचे नुकसान आणि बेकायदेशीर असल्याचे माहिती झाले आहे.
 6. बालविवाहाच्या प्रमाणात घट झालेली असूनही, यावर पुर्णपणे अंकुश आणणे अजून बाकी आहे. वर्तमानात जगभरात दरवर्षी 1.2 कोटी बालविवाह होत आहेत. असा दावा केला जातो आहे की, आज जगभरात 65 कोटी महिला अश्या आहेत, ज्यांचा विवाह 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच झालेला आहे.
 7. सन 2050 पर्यंत जगभरात या दरात घट होऊन 10% पर्यंत होण्याचा अंदाज आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष अहवाल
 1. ठळक नोंदी:-
 2. जगभरात मागच्या दशकात (सन 2005-06 ते सन 2015-16) जवळजवळ 2.5 कोटी बालविवाह रोखण्यात आले. याबाबतीत सर्वाधिक घट दक्षिण आशिया आणि मुख्यत्वे भारतात पाहायला मिळाली आहे.
 3. एकूणच अज्ञान मुलींच्या बालविवाहाच्या प्रमाणात 15% घट दिसून आलेली आहे. म्हणजेच प्रत्येक 4 मध्ये 1 बालविवाह या प्रमाणावरून 5 मध्ये 1 बालविवाह असे प्रमाण आहे.
 4. दक्षिण आशियात 18 वर्षाखालील मुलींच्या विवाहात जवळपास एक तृतीयांश घट दिसून आली आहे. वयाच्या 10 व्या वर्षी अज्ञान मुलांच्या विवाहाचे प्रमाण 50% वरून 30% वर आले आहे.
 5. बालविवाहाच्या बाबतीत सर्वाधिक खराब परिस्थिती आफ्रिकेतील देशांची आहे. तेथे हे प्रमाण 40% हून अधिक आहे. जगभरात होणारा प्रत्येक 3 पैकी 1 बालविवाह आफ्रिका देशांमध्ये होत असतो.


WTO's initiative to combat India-US dispute regarding the sale of solar energy equipment

 1. जागतिक व्यापार संघटना (WTO) याच्या विवाद निराकरण समितीने भारताच्या विनंतीवरून एक समिती तयार करण्याचे मान्य केले.
 2. ती समिती हे सुनिश्चित करणार की विनंती करणारा देश सौर ऊर्जा उपकरणांच्या व्यापारावरून अमेरिकेसोबत असलेल्या आपल्या विवादामध्ये WTO च्या निर्णयाचे पालन करीत आहे अथवा नाही.
 3. सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये एका किमान निश्चित प्रमाणात स्वदेशी सौर सेल आणि मॉड्यूल यांच्या वापरासंबंधी भारत आपल्या धोरणाच्या बाबतीत अमेरिकेच्या सोबत असलेले प्रकरण 2016 साली हरला होता.
 4. अमेरिकेच्या दाव्यांनुसार राष्ट्रीय सौर मिशनसाठी भारत सरकारकडून केले जाणारे वीज खरेदी करार आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नियमांचे पालन करीत नाही आणि त्यामुळे अमेरिकेने यासंबंधी WTO कडे तक्रार केली होती.
जागतिक व्यापार संघटना (WTO)
 1. पार्श्वभूमी:-
  1. जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरशासकीय संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 
  2. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वीत्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.
  3. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश करारांतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.
  4. WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतींनिधीद्वारे सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.


IMPRINT-II sanctioned Rs. 1000 crores from center for India program

 1. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशात शोध व संशोधन तसेच अभिनवता यांना प्रोत्‍साहन देण्याच्या उद्देशाने IMPRINT-II (इंपॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्‍नोलॉजी) भारत कार्यक्रमांतर्गत 1000 कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.
 2. ‘IMPRINT-II भारत’:-
  1. अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकत्रितपणे एक कोष तयार केला आहे.
  2. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने हा प्रकल्प एका विशेष कार्य योजनेच्या रूपात संचालित केला जाणार आहे.
  3. IIT खडगपुरचे प्रा. इंद्रनील मन्‍ना याचे राष्‍ट्रीय समन्‍वयक असतील. कार्यक्रमांतर्गत 16 मार्चपासून प्रस्‍ताव आमंत्रित केले जातील आणि मे महिन्यात प्रस्‍तावांना मंजूरी दिली जाणार आहे.
 3. ‘IMPRINT-I भारत’:-
  1. अंतर्गत 318.71 कोटी रुपयांच्या खर्चासह 142 प्रकल्प विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.
  2. या प्रकल्पांमध्ये संरक्षण व सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, शाश्वत अधिवास, प्रगत सामुग्री, आरोग्य सेवा, नॅनो-तंत्रज्ञान, हवामान बदल आदी विषयांना सामील करण्यात आला होता.


Nobel laureate Gunther Blobel, American biologist, died

 1. नोबेल विजेते अमेरिकी जीवशास्त्रज्ञ गुंथर ब्लोबेल यांचे १८ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 2. पेशींच्या अंतर्गत भागांमध्ये प्रथिनांच्या हालचालींशी संबंधित संशोधनासाठी १९९९मध्ये त्यांना नोबेल मिळाले होते.
 3. त्यांचा जन्म १९३६साली तेव्हा जर्मनीमध्ये आणि आता पोलंडमध्ये असेलेल्या वॉल्टर्सडॉर्फ शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनीतून अमेरिकेत आले.
 4. ब्लोबेल यांनी टुबिनगेन विद्यापीठातून एमडी केली व नंतर मॅडिसनमधील विस्कॉन्सिन विद्यापीठात आले.
 5. रॉकफेलर विद्यापीठातून त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पेशी जीवशास्त्रातील कारकीर्द सुरू ठेवली.
 6. पेशीतील प्रथिनांच्या हालचालींवर आधारित सिग्नल हायपोथेसिस त्यांनी पेशी जीवशास्त्रज्ञ डेव्हिड डी साबातिनी यांच्याबरोबर काम करताना मांडले.
 7. रेणवीय झिपकोड या पेशीतील रेणूंच्या हालचालींच्या संकेतावलीचा उलगडा त्यांनी केला. त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांची कारणमीमांसा करणे शक्य झाले.
 8. त्यांच्या संशोधनातून पुढील काळात सिस्टीक फायब्रॉसिस, ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), स्किझोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंग), एड्स, कर्करोग व इतर आनुवंशिक रोगांवर मोठी प्रगती झाली.
 9. १९९९मध्ये त्यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे फ्रेंड्स ऑफ ड्रेसडेन या संस्थेच्या पुनर्उभारणीसाठी दिले.
 10. त्यांना १९९३मध्ये मूलभूत वैद्यकीय संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला होता. १९९७मध्ये त्यांना विज्ञान संशोधनात न्यूयॉर्कच्या महापौराचा पुरस्कार मिळाला.


Navjyot Courala gold medal in Asian wrestling championship

 1. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
 2. एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत नवज्योतने जपानच्या मिया इमेईला ९-१ असे सहज हरवले. यापूर्वी तिने २०१३मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य व २०१४मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
 3. याशिवाय ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला ६२ किलो गटात कांस्यपदक, तर विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्यपदकावर नाव कोरले.
 4. या दोन पदकांमुळे भारताच्या खात्यावर १ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य अशी ६ पदकेजमा झाली आहे.
 5. साक्षीने कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या अयाल्यिम कासीमोवाला १०-७ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.
 6. राष्ट्रकुल क्रीडा विजेती खेळाडू विनेशला चीनच्या चुआन लेईने अंतिम लढतीत ३-२ असे पराभूत केले.
 7. भारताच्या संगीता कुमारीनेही ५९ किलो गटांत कांस्यपदक मिळवले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन खेळाडू जिऊन उमला पराभूत केले.


Sindhutai Sakpal and Urmila Apte proud of the President at the Glance

 1. अनाथ मुलांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला आपटे यांना नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
 2. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
 3. दरवर्षी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. यंदाच्या यादीत महाराष्ट्रातल्या या दोन महिलांचा समावेश आहे.
 4. सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आयुष्य व्यतीत करुन शेकडो अनाथ मुलांना आईच्या मायेचं छत्र दिलं.
 5. त्यांना याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव इथला आहे.
 6. उर्मिला बळवंत आपटे या मुंबईतील भारतीय स्त्री शक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
 7. भारतीय स्त्री शक्ती ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारिरीक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या या पंचसुत्रीवर काम करते.
 8. गेल्या 30 वर्षांपासून भारतीय स्त्री शक्ती जे काम करतंय, त्याचाच सन्मान या पुरस्काराच्या रुपानं झाल्याची भावना यावेळी उर्मिला आपटे यांनी व्यक्त केली.
 9. केंद्रीय कॅबिनेटनं ज्या सरोगसीसंदर्भातल्या विधेयकाला मंजुरी दिली, त्यात भारतीय स्त्री शक्तीनं केलेल्या महत्वाच्या सूचनांचा समावेश असल्याचं समाधान आहे, भविष्यातही महिलांच्या प्रश्नांवर आपण काम करत राहू असं आपटे यांनी म्हटलं आहे.


The Importance of Today's Day in History 8 march

 1. जागतिक दिवस:- जागतिक महिला दिन
 2. महत्वाच्या घटना:-
 • महत्वाच्या घटना
  1. १८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
  2. १९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
  3. १९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
  4. १९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
 • जन्म
  1. १८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)
  2. १९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
  3. १९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
  4. १९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)

 

मृत्यू
 1. १७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
 2. १९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
 3. १९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)


Top