International Women's Day: March 8

 1. दरवर्षी 8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन पाळला जातो.
 2. यावर्षी "थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट, इनोव्हेट फॉर चेंज" या संकल्पनेखाली हा दिन पाळला गेला. तसेच “# बॅलन्स फॉर बेटर” या संकल्पनेखाली एक मोहिम चालू करण्यात आली आहे.
 3. या दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
 4. भारताचा नारी शक्ती पुरस्कार:-
  1. या दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार 2018’ प्रदान करण्यात आले.
  2. यावर्षी 44 महिला आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्राच्या 6 महिलांचा समावेश आहे.
  3. महाराष्ट्रातल्या सीमा राव (देशातल्या एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक), स्मृती मोरारका (‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून हातमाग समूह सुरू केला), कल्पना सरोज (पद्मश्री पुरस्कारप्राप्त उद्योजिका), सीमा मेहता, राहीबाई पोपरे (अहमदनगर जिल्ह्यातल्या त्यांच्या कृषी क्षेत्रातल्या वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी), चेतना गाला सिन्हा (सातारा जिल्ह्यातील माणदेशी महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका) यांचा सन्मान करण्यात आला.
 5. यासंबंधीचा इतिहास
  1. आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरातल्या अनेक देशांमध्ये पाळला जातो.
  2. राष्ट्रीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा आर्थिक अश्या अनेक क्षेत्रात महिलांनी केलेल्या असामान्य कार्यांबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  3. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उगमस्थान उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकाच्या सुरूवातीला चालवण्यात आलेल्या कामगार चळवळीच्या उपक्रमामध्ये आढळून येते.
  4. 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये 19 मार्चला पहिला “आंतरराष्ट्रीय महिला दिन” साजरा करण्यात आला.
  5. त्यानंतर 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘8 मार्च’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून पाळण्यास सुरुवात झाली.
  6. हा महिला आणि पुरुष दरम्यान समता या तत्त्वाच्या आधारावर भर देणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार होता. 
 6. ठरविण्यात आलेली ‘2030 कार्यसूची (अजेंडा)’ची प्रमुख लक्ष्ये -
  1. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींना मोफत, न्यायसंगत आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळण्याची खात्री करणे.
  2. 2030 सालापर्यंत, सर्व मुला-मुलींच्या गुणवत्तेसाठी बाल्यावस्थेचा विकास, घ्यावयाची काळजी आणि बालवाडीमधील शिक्षण या सुविधांना प्रवेश मिळण्याची खात्री करणे, जेणेकरून ते प्राथमिक शिक्षणास तयार असतील.
  3. सर्वत्र सर्व महिला आणि मुलींच्या बाबतीत असलेला सर्व प्रकारचा भेदभाव समाप्त करणे.
  4. तस्करी आणि लैंगिक अत्याचार आणि शोषण अश्या आणि इतर प्रकारांच्या समावेशासोबतच सार्वजनिक आणि खासगी कामाच्या वातावरणात सर्व महिला आणि मुलींच्या विरुद्ध असलेली सर्व प्रकारची हिंसा दूर करणे.
  5. बाल, लवकर आणि सक्तीचे विवाह आणि महिला जननेंद्रियासंबंधित विकृत प्रथा अश्या सर्व हानीकारक प्रथांना बाद करणे.
 7. भारताकडून या संदर्भात उचलली गेलेली पाऊले
  1. 1950 साली, भारत हा त्याच्या नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ (स्त्री-पुरुष) मतदान मान्य करणार्‍या जगातील काही देशांपैकी एक होता. 
  2. भारत सरकारने 1999 साली ‘नारी शक्ती पुरस्कार’ देण्याचे सुरू केले. हा पुरस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो.
  3. हा पुरस्कार भारत सरकारच्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाकडून विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना आणि संस्थांना दिला जातो.
  4. हा भारतातल्या महिलांना मिळणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


'E-Earth' Mobile App of the Ministry of Home and Urban Welfare

 1. गृह व शहरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘ई-धरती’ नावाचे एक नवे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे.
 2. ‘ई-धरती’ जियो पोर्टल ही एक ऑनलाइन प्रणाली आहे.
 3. या पोर्टलवर भूमी व विकास कार्यालय (L&DO) संबंधित सर्व सेवा-सुविधा कार्यरत करण्यात आली आहेत.
 4. ही GIS आधारित एक मॅपिंग सिस्टम आहे, जो कार्यालयाच्या जवळपास 65000 मालमत्तांचा एक नकाशा आहे. 
 5. याचा वापर करून प्रत्येक सरकारी मालमत्ता येथे शोधली जाऊ शकते.
 6. भूमी व विकास कार्यालय (L&DO) याच्या संबंधित देयक प्रणाली पूर्णपणे डिजिटलीकृत करण्यात आली आहे.
 7. ऑनलाईन अर्ज आणि त्याचा पाठपुरावा, विक्रीसाठी परवानगी, कंत्राटासाठी परवानगी अश्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


Approval of running 'Atal inovation mission' for the financial year 2019-20

 1. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी ‘अटल अभिनवता अभियान’ (AIM) सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजुरी दिली आहे. त्यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 2. या निधीतून देशभरात 10,000 विद्यालयांमध्ये शालेय पातळीवरील अटल टिकरिंग लॅब उभारल्या जातील.
 3. याव्यतिरिक्त, देशभरात शंभराहून अधिक अटल इनक्यूबेशन सेंटर स्थापित होण्याची शक्यता आहे. शंभराहून अधिक कल्पक संशोधकांना/स्टार्टअप कंपन्यांना आर्थिक पाठिंबा दिला जाईल.
 4. अभियानाबाबत:-
  1. देशात अभिनवता आणि उद्योजकता रुजविण्यासाठी राष्ट्रीय भारत पारिवर्तन संस्था (NITI) आयोगाने देशात अटल अभिनवता अभियान (Atal Innovation Mission -AIM) चालविले आहे.
  2. या अभियानाच्या अंतर्गत शालेय पातळीवर अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी यामधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जात आहे.
  3. प्रयोगशाळेसोबतच विद्यापीठ आणि उद्योगांसाठी जागतिक दर्जाचे अटल इनक्यूबेशन सेंटर (AIC) आणि अटल कम्युनिटी इनोवेशन सेंटर (ACIC) यांची स्थापना देखील केली जात आहे.
  4. वर्तमानात 5441 प्रयोगशाळा आणि 101 संगोपन केंद्रांना मंजूर करण्यात आले आहे.
  5. अटल न्यू इंडिया चॅलेंज (ANIC) कार्यक्रमांच्या अंतर्गत 24 आव्हाने जाहीर करण्यात आली आहेत.


Top