1. महसूल सचिव हसमुख अधिया यांची भारताच्या केंद्रीय वित्त सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
  2. अधिया गुजरात संवर्गातील १९८१ सालचे भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) अधिकारी आहेत. मागील महिन्यात अशोक लवासा यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त होते.
  3. वित्त मंत्रालयातील जेष्ठ सचिवाला वित्त सचिव बनविण्यात येते. वित्त मंत्रालयाअंतर्गत खर्च, आर्थिक व्यवहार, वित्तीय सेवा, महसूल आणि गुंतवणूक व सार्वजनिक संपदा व्यवस्थापन विभाग (DIPAM) हे पाच विभाग येतात.


  1. भारतीय गोल्फपटू शिव कपूरने ७ व्या 'पॅनासोनिक ओपन २०१७' ही गोल्फ स्पर्धा जिंकून भारतात त्याचा पहिला एशियन टूर किताब जिंकला.
  2. ही स्पर्धा दिल्ली गोल्फ क्लब येथे खेळली गेली. स्पर्धेच्या दुसर्‍या स्थानी समान गुणांमुळे सात खेळाडूंनी हक्क मिळवला.


  1. ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खेळल्या गेलेल्या 'राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद २०१७' स्पर्धेत सत्येंद्र सिंह आणि संजीव राजपूत यांनी पुरुष ५० मीटर रायफल ३ पोजिशन प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून स्पर्धेची सांगता केली.
  2. स्पर्धेत भारताने एकूण २० पदकांची कमाई केली, त्यामध्ये ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
  3. पदकतालिकेत भारत प्रथम आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया (१७) तर तिसर्‍या स्थानी इंग्लंड (८) आहे.


  1. जर्मनीच्या बॉन शहरात ६ नोव्हेंबर २०१७ पासून यूनायटेड फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या COP-२३ परिषदेला सुरुवात झाली. ही परिषद १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत चालणार आहे.
  2. परिषदेत भारतीय प्रयत्नांचे प्रदर्शन घडविण्यासाठी भारतीय केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते भारतीय तंबूचे उद्घाटन करण्यात आले. त्यात भारताने 'कंजर्विंग नाऊ, प्रिजर्विंग फ्यूचर' या विषयाखाली प्रदर्शन भरविले आहे.
  3. यूनायटेड फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) हा संयुक्त राष्ट्रसंघाने ९ मे १९९२ रोजी अंगिकारलेला एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार आहे. यावर आतापर्यंत १६५ सदस्य राष्ट्रांच्या स्वाक्षर्‍या झालेल्या आहेत. २१ मार्च १९९४ रोजी हा करार प्रभावी झाला.


Top