'Sangwari' polling center for women in Chhattisgarh assembly elections

 1. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगडमधील विविध मतदारसंघांमध्ये 'संगवारी' मतदान केंद्राची स्थापना केली आहे.
 2. छत्तीसगढी भाषेत 'संगवारी' याचा अर्थ मित्र असा होतो. या मतदान केंद्रावर सर्व अधिकारी व सुरक्षा कर्मचारी महिला असतील.
 3. राज्यात 12 आणि 20 नोव्हेंबर अश्या दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
 4. भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था आहे. आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.
 5. आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.
 6. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत. पूर्वी आयोग एक सदस्य असलेले मंडळ होते, परंतु 1989 सालानंतर दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्त पद निर्माण करण्यात आले.
 7. ओम प्रकाश रावत हे भारताचे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.
 8. भारतात विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
 9. ही निवडणूक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. विधानसभा निवडणुका सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
 10. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


For the creation of infrastructure, the RBI relaxed the ECB criteria

 1. पायाभूत सुविधांसाठी बाह्य व्यावसायिक कर्ज (ECB) नियंत्रित करणार्‍या निकषांना भारतीय रिझर्व्ह बँकेनी शिथिल केले आहेत.
 2. अधिसूचनेनुसार - 
 3. पात्र कर्जदारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ECBसाठी आवश्यक असलेला किमान सरासरी परिपक्वतेचा कालावधी आधीच्या पाच वर्षांवरून कमी करीत तीन वर्षांचा केला आहे.
 4. अनिवार्य बचाव व्यवस्थेसाठी सरासरी परिपक्वता आवश्यकतेचा कालावधी आधीच्या दहा वर्षांवरून कमी करीत पाच वर्षांचा केला आहे.
 5. दीर्घकालीन मालमत्तांसाठी अल्पकालीन निधीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार्‍या बिगर-बँक कर्जदारांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी आणि तरलता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


The members of the ITU Council were selected along with India

 1. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) परिषदेचे सदस्य म्हणून भारताला पुढील चार वर्षांसाठी म्हणजेच सन 2019 ते सन 2022 या काळासाठी निवडण्यात आले आहे.
 2. दुबई (संयुक्त अरब अमीरात) येथे 7 नोव्हेंबर 2018 रोजी पार पडलेल्या ‘ITU प्लेनिपोटेंशीयरी परिषद 2018’ मध्ये ही निवड झाली.
 3. भारत आशिया-ऑस्ट्रेलेशिया क्षेत्रामधून परिषदेसाठी निवडलेल्या 13 देशांपैकी तिसऱ्या आणि जागतिक पातळीवर परिषदेसाठी निवडलेल्या 48 देशांमध्ये आठव्या क्रमांकावर निवडून आला आहे.
 4. शिवाय, नवी दिल्ली येथे ITU दक्षिण आशिया क्षेत्र कार्यालय आणि तंत्रज्ञान अभिनवता केंद्र उभारण्याचा ITUने निर्णय घेतला आहे.
 5. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) हा माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विशेष विभाग आहे.
 6. 17 मे 1865 रोजी संघाची स्थापना करण्यात आली. जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे याचे मुख्यालय आहे. 
 7. संघाचे 193 देश आणि सुमारे 800 खासगी क्षेत्रातल्या कंपन्या आणि शैक्षणिक संस्था सदस्य आहेत.
 8. 1869 सालापासून भारत ITUचा सक्रिय सदस्य आहे. 1952 सालापासून भारत ITU परिषदेचा नियमित सदस्य म्हणून कार्यरत आहे.


Top