1. कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील महिन्यात ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
 2. शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. अॅना पोलित्स्काया या एक  निर्भीड  पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या आहेत. ‘ हिंदुस्थान टाइम्स’ने यासंदर्भातले वृत्त दिले.
 3. जे पत्रकार लढतात, भूमिका मांडतात त्यावर ठाम राहतात आणि निर्भीड लेखन करतात, त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया  गौरी लंकेश यांची बहिण कविता यांनी थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनशी बोलताना दिली.
 4. तसेच गौरी लंकेशना मिळालेला पुरस्कार फक्त कुटुंबाचा नाही तर जे लोक गौरी लंकेश यांच्या बाजूने उभे राहिले त्या सगळ्यांचा आहे, असेही कविता यांनी म्हटले आहे.
 5. गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. तसेच विविध वर्तमानपत्रांमध्येही त्या स्तंभलेखनही करत. त्यांच्या हत्येची  सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने केली.
 6. गौरी लंकेश यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ते अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्यांचे मारेकरी पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा गौरी लंकेश यांच्या कुटुंबाने व्यक्त केली.


 1. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असली तरी, शहरात किती अनधिकृत बांधकामे आहेत, हे तपासण्यासाठी  महापालिका मिळकतकर विभागाच्या सर्वेक्षणाचा आधार घेणार आहे.
 2. त्यानंतर बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले
 3. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची नियमावली राज्य सरकारने  7 ऑक्टोबर रोजी जाहीर केली. 
 4. महापालिकेने यासाठीची प्रक्रिया सहा महिन्यांत सुरू करावी, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. त्यानुसार या बाबतचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.  बांधकामे नियमित करण्याचा अर्ज तयार करावा लागेल.
 5. त्यानंतर त्याला मंजुरी घेऊन नागरिकांना ' जाहीर प्रकटना' व्दारे आवाहन करण्यात येईल. बांधकामे नियमित करण्यासाठी स्वतंत्र ' सेल' स्थापन करता येईल का, याचाही आढावा घ्यावा लागेल, असे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी स्पष्ट केले. 
 6. कोणतेही बांधकाम नियमित करण्यासाठी  शुल्क किती असेल, आदींबाबत राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या शासकीय आदेशाची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येईल. 
 7. तसेच नागरिकांना काही माहिती हवी  असल्यास ती देखील  उपलब्ध करून देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले


 1. भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यातल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सहकार्याची तसेच दोन्ही देशांतल्या धोरणात्मक भागीदारीलाही 20 वर्षे पूर्ण झालेली आहेत.
 2. या प्रसंगाला चिन्हांकित करण्यासाठी डर्बनमध्ये दोनही देशांमधील विज्ञान व तंत्रज्ञान विभागांच्या संयुक्त सहकार्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, भुविज्ञान आणि पर्यावरण, वन व हवामान बदल  मंत्री  डॉ. हर्ष वर्धन यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधिमंडळ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे.
 3. दोन्ही देशांमध्ये विज्ञानसंबंधी सहकार्याला आणखीन सुदृढ करणे तसेच अंतराळ  संशोधनापासून ते जैव-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधि शोधणे हा या दौर्‍याचा प्रमुख उद्देश आहे.

 4. अलीकडेच दोन्ही देशांच्या सहकार्याने चालविल्या जात असलेले उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत - भारताचा SKA प्रकल्पात सहभाग - दक्षिण आफ्रिकेच्या पुढाकाराने ‘स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA)’ हा विशाल मल्‍टी-रेडियो टेलीस्‍कोप प्रकल्प राबवला जात आहे, ज्यांचा विकास ऑस्‍ट्रेलिया, न्‍यूजीलँड आणि दक्षिण आफ्रिकेत होत आहे.

 5. या प्रकल्पांतर्गत किमान 3000 किलोमीटरच्या अंतराने रिसीविंग स्‍टेशन स्‍थापित केले जात आहेत. SKA हा वैश्विक प्रकल्प आहे, ज्यात 12 सदस्‍य राष्ट्रांचा सहभाग आहे आणि त्यात भारत देखील आहे. भारताचे अणुऊर्जा विभागाखालील राष्‍ट्रीय रेडियो खगोल भौतिकी केंद्र या प्रकल्पात गुंतलेले आहे. भारत ‘SKA’ च्या संरचनेच्या कार्यात गुंतलेले आहे, ज्यात सेंट्रल सिग्‍नल प्रोसेसिंग अँड टेलीस्‍कोप मॅनेजर सिस्‍टम मुख्य आहे.

 6. HIV लसीचे संशोधन - HIV लसीच्या संशोधनात सहयोगाची एक बहु-संस्थात्मक योजना या वर्षी सुरू करण्यात आली आहे. या संशोधनामुळे HIV प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

 7. गांधी-मंडेला प्रोग्राम ऑन ग्रास रूट इनोव्हेशन  - ओपन सोर्स टेक्नॉलॉजीचे आदानप्रदान करण्याच्या आणि देशी ज्ञान प्रणालींच्या बौद्धिक संपदेच्या अधिकारांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ‘गांधी-मंडेला प्रोग्राम ऑन ग्रास रूट इनोव्हेशन’ नावाने एक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. भारताच्या बाजूने नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, अहमदाबाद हा कार्यक्रम चालवणार आहे.

 8. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य चालवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 1995 साली आंतर-सरकारी करार झाले होते. तेव्हापासून दोनही देशांमधील धोरणात्मक भागीदारी प्रगतीशीलपणे विकसित झालेली आहे. आतापर्यंत, खगोलशास्त्र आणि खगोल-भौतिकीशास्त्र, कृषी विज्ञान, हरित रसायनशास्त्र, देशी ज्ञान प्रणाली आणि आरोग्य विज्ञान यासारख्या निवडक क्षेत्रांमधील सहकार्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

 


Top