The 8 agreement between India and Russia

 1. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान भारत आणि रशिया यांच्यात झालेले ८ सामंजस्य करार:-
  1. भारत आणि रशिया यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २०१९-२३ या काळासाठी सल्लामसलतीसाठी करार.
  2. रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय आणि भारताचा नीति आयोग यांच्यात सामंजस्य करार.
  3. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि फेडरल स्पेस एजन्सी, रशिया (ROSCOSMOS) यांच्यात मानवासहित अवकाश भरारी कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार.
  4. भारत आणि रशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातला सहकार्य करार.
  5. आण्विक क्षेत्रात संकल्पना आणि सहकार्य अंमलबजावणी संदर्भातला कृती आराखडा.
  6. परिवहन शिक्षण क्षेत्रात सहकार्य विकासाबाबत रशियाचे परिवहन मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्यातला सामंजस्य करार.
  7. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारताच्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) आणि रशियाच्या लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ (आरएसएमबी) यांच्यातला सामंजस्य करार.
  8. खत क्षेत्रात रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंड (आरडीआयएफ), आणि पीजेएससी फॉसॲग्रो आणि इंडियन पोटॅश लिमिटेड यांच्यात करार. 


Pankaj Sharma Permanent Representative for UN Disarmament Conference

 1. संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून पंकज शर्मा यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते अमरदीप गिल यांची जागा घेतील.
 2. पंकज शर्मा सध्या परराष्ट्र मंत्रालयातील निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
 3. संयुक्त राष्ट्र निशस्त्रीकरण परिषद:-
  1. स्थापना: १९८४
  2. मुख्यालय: जिनिव्हा (स्वित्झर्लंड)
  3. सदस्य: ६५ देश
  4. हा एक बहुराष्ट्रीय मंच आहे आंतरराष्ट्रीय समुदायाद्वारे शस्त्रांच्या वापरावरील नियंत्रण आणि निशस्त्रीकरण यासाठी वाटाघाटी केली जाते.
  5. संयुक्त राष्ट्रांपासून जरी हा मंच स्वतंत्र असला तरीही इतर अनेक माध्यमातून तो संयुक्त राष्ट्रांशी जोडलेला आहे.
  6. हा मंच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला दरवर्षी त्याच्या कामाचा अहवाल सादर करतो.
  7. जिनिव्हामधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयाचे संचालक हे या मंचाचे पदसिद्ध सरचिटणीस असतात.


Award for the contribution of cleanliness to the Ministry of Railways for fortnight

 1. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला स्वच्छता पंधरवड्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या श्रेणीमधील योगदानासाठी पुरस्कृत करण्यात आले.
 2. सरकारी कार्यालये आणि आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने हा उपक्रम राबविला होता.
 3. स्वच्छ भारत अभियानाच्या चौथ्या वर्धापन दिnaच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाला हा पुरस्कार देण्यात आला.
 4. लोकांना शौचालय बांधणी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने २०१७मध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम सुरू करण्यात आली होती.
 5. स्वच्छ भारत अभियान:-
  1. भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेला हा राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे.
  2. या अभियानाचे घोषवाक्य ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हे आहे.
  3. महात्मा गांधींच्या वाढदिवसाच्या दिवशी २ ऑक्टोबर २०१४ रोजी या मोहिमेची सुरूवातझाली.
  4. भारताच्या शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला.
  5. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.
  6. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण आणि शहरी अशा दोन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.
  7. ग्रामीण भागात या अभियानाची अंमलबजावणी केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे तर शहरी भागात केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे करण्यात येते.


Sanjay Verma New Ambassador to India in Spain

 1. स्पेनमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. संजय वर्मा १९९०च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत.
 3. सध्या ते परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.
 4. याव्यतिरिक्त अरिंदम बागची यांची क्रोएशिया प्रजासत्ताकमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले.
 5. ते १९९५च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत.


Death: Nobel laureate Dr. Leon Lederman

 1. गॉड पार्टिकल म्हणजेच हिग्ज बोसॉनच्या संशोधनात महत्वपूर्ण कार्य करणारे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ. लियोन लेडरमन यांचे ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.
 2. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकीत १९६४ मध्ये वर्तवण्यात आले होते.
 3. जगभरातील अनेक वैज्ञानिक यासाठी काम करीत होते. डॉ. लियोन लेडरमन हे त्यातील एक होते.
 4. डॉ. लियोन लेडरमन:-
  1. लियोन यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी न्यूयॉर्क शहरात झाला. तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर रसायनशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले.
  2. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ३ वर्षे त्यांनी अमेरिकी सैन्यात काढली. या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास सुरू केला.
  3. नंतर सैन्यदलातील नोकरी सोडून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी संशोधन करून पीएचडी मिळविली.
  4. १९५८मध्ये ते याच विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले. २ वर्षांनंतर त्यांनी आधी फोर्ड फाऊंडेशनचे फेलो म्हणून २ वर्षे काम केले.
  5. तेथून ते फर्मिलॅबचे संचालक बनले. विज्ञानविषयक चळवळीतही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
  6. १९९१मध्ये लियोन हे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’चे अध्यक्ष बनले.
  7. शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांच्या तुलनेत भौतिकशास्त्राला प्राधान्य मिळावे यासाठी काही शास्त्रज्ञांनी ‘फिजिक्स फर्स्ट’ ही स्वतंत्र चळवळ अमेरिकेत सुरू केली. लियोन हे त्यातील एक प्रमुख होते.
  8. ‘द गॉड पार्टिकल’ हे त्यांचे पुस्तक तेव्हा जगभरात गाजले.
  9. १९८८मध्ये म्यूऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारमिळाला होता. या शोधात मेल्विन श्वार्त्झ व जॅक स्टीनबर्गर हेही सहभागी असल्याने या तिघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला.
  10. याशिवाय त्यांना वूल्फ पारितोषिक, अर्नेस्ट ओ लॉरेन्स पदक असे अनेक प्रतिष्ठेचे मानसन्मान मिळाले.
  11. अखेरच्या काळात त्यांना असाध्य रोगाने ग्रासले. यावरील उपचार खूपच महागडे असल्याने शेवटी त्यांना हा खर्च भागवण्यासाठी नोबेल पारितोषिकाचे पदकही विकावे लागले.
 5. हिग्ज बोसॉन:-
  1. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. त्याला देवकण (गॉड पार्टिकल) असेही म्हणतात.
  2. हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोसयांच्यावरून ठेवण्यात आले आहे. कलकत्त्यातल्या बोस यांचे हे मूलकण शोधण्यात मूलभूत योगदान आहे.
  3. डॉ. पीटर हिग्ज आणि फ्रँकस एंग्लर्ट यांनी या हा कण अस्तित्वात असावा असे भाकित १९६४मध्ये केले गेले होते.
  4. ४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले.
  5. या कणांचा शोध लावणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज आणि बेल्जियमचे फ्रँकस एंग्लर्ट या शास्त्रज्ञांना २०१३चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.


Top