टोकियोत ‘भारत-जपान वार्षिक संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद’ बैठक संपन्न

 1. 5 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2017 या काळात जपानच्या टोकियो शहरात आयोजित ‘भारत-जपान वार्षिक संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद’ बैठक संपन्न झाली. बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय वित्तमंत्री आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी केले.
 2. दोन्ही राष्ट्रांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी "जपान-भारत विशेष रणनीतिक आणि वैश्विक भागीदारी" च्या संरचनेच्या अंतर्गत सहमती दर्शविली.
 3. बैठकीत भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात सध्याच्या सुरक्षा परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आणि 3 सप्टेंबर 2017 ला उत्तर कोरियाने केलेल्या अणु-चाचणीचा जोरदार निषेध व्यक्त केला.

मान्य सहकार्य क्षेत्र:-

 1. मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रात आदानप्रदान वाढविण्यासाठी संभाव्य संधी शोधण्याविषयी एकमत होते आणि पुढील विषयात सहकार्य वाढविण्याचे ठरविले.

संस्थात्मक संवाद आणि भेटी:-

 1. 2018 साली वार्षिक संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद बैठकीत जपानचे संरक्षण मंत्री भारताचा दौरा करतील.
 2. 2018 सालच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताला जपानचे चीफ ऑफ स्टाफ, जॉइंट स्टाफ जपान सेल्फ डिफेन्स फोर्स यांची पहिली भेट आयोजित करण्यासाठी सहमत झाले.
 3. 2018 साली भारतात 6 वे डिफेन्स वाइस मिनिस्टर/ सेक्रेटरी लेव्हल डिफेन्स पॉलिसी डायलॉग आणि 5 वे वाइस मिनिस्टर/ सेक्रेटरी लेव्हल "2 +2" डायलॉग आयोजित करणार.
 4. जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स (JGSDF) व भारतीय लष्कर यांच्यातला कारभार
 5. दोन्ही पक्षांनी PKO, दहशतवाद-विरोधी आणि मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) च्या क्षेत्रात सक्रिय देवाणघेवाण वाढवण्यास मान्यता दिली आहे.
 6. JGSDF भारतीय लष्कराच्या कर्मचार्‍यांना त्यांच्याद्वारा आयोजित HADR सरावात प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण देणार.
 7. दोन्ही बाजूंनी 2018 साली भारतीय लष्कर आणि JGSDF यांच्यात दहशतवाद-विरोधी क्षेत्रात सराव आयोजित करण्याचा प्रयत्न करणार.

संरक्षण उपकरणे व तंत्रज्ञान:-

 1. दोन्ही बाजुंनी संरक्षण आणि दुहेरी-वापरात येणार्‍या तंत्रज्ञानाच्या समावेशासह उपकरणे बाबत सहयोग प्रोत्साहित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकार आणि संरक्षण उद्योगांमधील संवाद वाढवणे महत्त्वाचे आहे असे मान्य केले.
 2. दोन्ही देशांनी अॅक्वीजिशन, टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स एजन्सी (ATLA) आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) यांच्यातल्या विधायक प्रतिबद्धतेचे स्वागत केले आणि मानव-रहित जमिनीवरील वाहने आणि रोबोटिक्स क्षेत्रात संशोधनासाठी तांत्रिक चर्चा करण्यास सहमती दर्शवली.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला

 1. टाइम्स हायर एज्युकेशन या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणार्‍या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2017-18 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे.
 2. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे ते अव्वल ठरले आहे.
 3. तसेच हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही.
 4. देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे.
 5. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
 6. 'टाइम्स' या संस्थेकडून दर वर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते.
 7. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. या वर्षी संस्थेने 77 देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून जागतिक क्रमवारी जाहीर केली.
 8. या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर, 27 देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या 200 मध्ये आहे.
 9. मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होऊ शकलेला नाही. एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ 42 संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.
 10. पहिल्या 300 संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे.
 11. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.


 1. आज 8 सप्टेंबरला जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला गेला.
 2. या 51 व्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दि नी संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि संस्कृतिक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) द्वारा घोषित “लिट्रेसी इन ए डिजिटल वर्ल्ड” या संकल्पनेखाली जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
 3. या दिनी सक्रियपणे आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे आणि व्यक्ती, समुदाय आणि संघटना यांना सक्षम बनवण्यासाठी एक साधन म्हणून साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते. शिवाय शिक्षणाचा प्रचार करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देणार्‍यांना साक्षरता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.   

भारतामधील साक्षरता स्थिती:-

 1. नवीनतम जनगणना 2011 च्या अहवालानुसार, भारतात निरक्षरता दर 22% आहे.
 2. 2011 च्या जनगणनेनुसार, केरळ हे 93.91% ने सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य ठरले आहे. त्यानंतर 92.28 % ने लक्षद्वीप, 91.58% ने मिझोराम, 87.75% ने त्रिपुरा आणि 87.40% ने गोवा साक्षर आहे.
 3. बिहार आणि तेलंगणा मध्ये अनुक्रमे 63.82% आणि 66.50% याप्रमाणे सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आढळले आहे.
 4. 2014 मध्ये, भारतामधील साक्षरता दर 10 टक्क्यांनी वाढलेले आहे. तर भारतामध्ये साक्षर असलेले जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे.
 5. समुदायानुसार, जैन समुदायमध्ये सर्वाधिक म्हणजे 86.73 % लोक सारक्षर आहेत, तर 13.57 % अशिक्षित आहेत. सर्वाधिक निरक्षरता मुस्लिम (42.72%) समुदायमध्ये आहे, त्यानंतर हिंदू मध्ये 36.40%, शीख लोकांमध्ये 32.49%, बौद्ध लोकांमध्ये 28.17% आणि ख्रिस्ती लोकांमध्ये 25.66 % याप्रमाणे निरक्षरता आहेत.
 6. लिंग नुसार, 61.6% पुरुष आणि 38.4% महिला यांनी पदवी किंवा त्यापुढचे शिक्षण घेतलेले आहे.

भारत सरकारचे साक्षरतेसाठीचे प्रयत्न:-

 1. भारतात राष्‍ट्रीय साक्षरता अभियान प्राधिकरण (SLMA) 1988 सालापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करीत आहे.
 2. भारत सरकारकडून साक्षरतेविषयी जागरूकता निर्माण करण्याकरिता आधिकाधिक प्रयत्न केले गेले आहे आणि आजही चालू आहे. 1996 साली ‘मशाल मार्च’ चे आयोजन केले गेले, ज्यात शालेय विद्यार्थी आणि साक्षरता कार्यकर्त्यांचा सहभाग होता. त्यानंतर राज्‍य स्‍तरावर विविध स्पर्धा, प्रदर्शनी आणि सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
 3. शिवाय सरकारने विविध अभियान चालवलेली आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -  
 4. राष्ट्रीय साक्षरता अभियान - वर्ष 2035 पर्यंत 41% साक्षरतेचे प्रमाण प्राप्त करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभर सन 1988 मध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियान (National Literacy Mission) सुरू केली. यामधून 35-75 वर्षे वयोगटातील निरक्षर लोकांना साक्षर करण्याचे कार्य हाती घेतले गेले होते. सर्व शिक्षा अभियान हे निरक्षरता निर्मूलनासाठी NLM चे मुख्य धोरण आहे. निरंतर शिक्षण योजनेच्या माध्यमातून शिक्षण अखंड चालू राहण्यासाठी एकूण साक्षरता आणि साक्षरतेनंतर कार्यक्रम चे प्रयत्न करण्यात आले.
 5. सर्व शिक्षा अभियान - सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात सन 2001 मध्ये करण्यात आली, या मार्फत वर्ष 2010 पर्यंत 6-14 वर्षांच्या वयोगटातील सर्व मुलांना आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची खात्री केली जात आहे. योजनेचा एक महत्वाचा घटक म्हणजे शिक्षण हमी योजना, पर्यायी व अभिनव शिक्षण हा आहे, जे एक किलोमीटर च्या त्रिज्येच्या परिसरात औपचारिक शाळा नसलेल्या भागात मुलांसाठी प्रामुख्याने सुरू केले गेले आहे. त्याचाच भाग म्हणून, केंद्र पुरस्कृत जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1994 मध्ये सुरू करण्यात आले. ज्यामधून सन 2005 पर्यंत 160,000 पेक्षा जास्त नवीन शाळा उघडल्या गेल्या, ज्यामध्ये जवळजवळ 84,000 पर्यायी शाळा होत्या.

इतिहास:-

 1. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगात साजरा केला जातो. 1965 साली या तारखेला तेहरानमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या वैश्विक शिखर परिषदेच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच बैठक आयोजित केली गेली. UNESCO ने नोव्हेंबर 1966 मध्ये आपल्या 14 व्या सत्रात 8 सप्टेंबर या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ म्हणून घोषित केले.


Top