Justice Pradeep Nandrajog: New Chief Justice of the Bombay High Court

 1. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी 7 एप्रिल 2019 रोजी पदाची शपथ दिली.
 2. न्यायमूर्ती नंदराजोग हे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते. तसेच, 2017 साली राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 
 3. भारतीय उच्च न्यायालय:-
  1. भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
  2. सध्या देशात 25 उच्च न्यायालये (नव्या आंध्रप्रदेश उच्च न्यायालयामुळे) कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत.
  3. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.
  4. उच्च न्यायालयात एक मुख्य न्याय‍धीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेल्या संख्येनुसार इतर न्याय‍धीश असतात.
  5. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


Due to man-made redemption, 'Nilkurinji' plants are at risk

 1. मानवनिर्मित वनव्यामुळे म्हणजेच मानवी हस्तक्षेपामुळे वनात लागलेल्या आगीचा तेथील वनस्पती व पशूंवर प्रतिकूल परिणाम होतो.
 2. वसंत ऋतुत पर्वतीय भागात फुलणार्‍या रमणीय 'नीलकुरिंजी' (Strobilanthes kunthianus) या फूल-वनस्पतीला या वनव्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे.
 3. पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गवत वाढते आणि उन्हाळ्यात ते वाळते. त्यामुळे आगीच्या एका ठिणगीने संपूर्ण क्षेत्र नष्ट होण्याचा धोका असतो.
 4. नीलकुरिंजी:-
  1. ‘नीलकुरिंजी’ (जैविक नाव: स्ट्रोबिलंथस कुंथिएनस) ही वनस्पती दक्षिण भारताच्या पश्चिम घाटामध्ये 1800 मीटर उंचीवर शोला गवती मैदानामध्ये मुख्यताः आढळून येते. या रोपाला 12 वर्षांमध्ये केवळ एकदाच बहर येतो.
  2. निलगिरी पर्वताला याच वनस्पतीच्या नावावरून नाव मिळाले.
  3. निलगिरी पर्वताच्या ‘कलहट्टी’ नावाच्या उतारी प्रदेशात ही वनस्पती बहरल्याचे आढळून आले आहे.
  4. त्याच्या निळ्या रंगाच्या फुलांमुळे त्याला नील हे नाव मिळाले. हे परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षन केंद्र आहे.


World Homeopathy Day: 10th April

 1. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येतो. यावर्षी डॉक्‍टर हॅनिमेन यांची 264 वी जयंती साजरी केली जात आहे.
 2. या दिनानिमित्त भारतात नवी दिल्लीत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH) यांच्यावतीने 9 एप्रिल 2019 रोजी दोन दिवस चालणारी परिषद भरविण्यात आली आहे.
 3. दिनामागचा इतिहास:-
  1. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्‍मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
  2. डॉ. सॅम्युअल हॅनिमेन यांनी 1969 साली पर्यायी औषधोपचार म्हणून होमिओपॅथी ही पद्धत विकसित केली.


Famous playwright Kartik Chandra Rath passed away

 1. प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्र रथ यांचे आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते.
 2. सलग 25 वर्षापासून न चुकता इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल आणि थिएटर ओलंपियाड ही लोकप्रिय कार्यक्रमे एकट्याने आयोजित करण्यामध्ये कार्तिक चंद्र रथ यांचा हातखंडा होता.
 3. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत 500 पेक्षा अधिक नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केलीत.
 4. 1980च्या दशकातल्या "भगवान जाने मनीषा" या नाटकाने त्यांच्या कारकि‍र्दीला सुरुवात झाली.
 5. त्यांना केंद्र संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि ओडिशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार दिला गेला.


Chinese Lin Dane won the Malaysian Open badminton tournament

 1. चीनचा बॅडमिंटनपटू लिन डॅन ह्याने क्वालालम्पूर येथे खेळल्या गेलेल्या ‘मलेशियन ओपन 2019’ या स्पर्धेत पुरुष एकल गटाचे जेतेपद पटकावले आहे.
 2. स्पर्धेच्या अंतिम लढतीत चीनच्या लिन डॅनने चीनी चेन लाँगला पराभूत केले.
 3. स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते -
  1. महिला एकल - तेई तेजु यिंग (तैपेई).
  2. पुरुष दुहेरी - युचेन ल्यू व जुहेन ली (चीन)
  3. महिला दुहेरी - चेन-जिया (चीन)
 4. स्पर्धेविषयी:-
  1. मलेशिया ओपन ही एक वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा आहे, जी 1937 सालापासून मलेशिया या आशियाई देशात खेळवली जात आहे.
  2. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) 2018 सालापासून नव्या कार्यक्रमावलीनुसार या स्पर्धेला BWF वर्ल्ड टूर सुपर 750 याच्या पाच कार्यक्रमांच्या यादीत स्थान दिले गेले आहे.


Top