RANAJI KARANDAK COMPETITION

 1. सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचे इनाम घोषित करण्यात आले आहे.

 2. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने 3 तर बीसीसीआयने विदर्भासाठी 2 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

 3. अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

 4. पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन आपले पहिले विजेतेपद मिळवले होते. तर रणजी करंडकानंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचे आव्हान असणार आहे.


HELINA MISSILE

 1. हेलिकॉप्टरवरून मारा करता येईल, अशा अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची भारताने ओदिशा किनारपट्टीवरून चाचणी घेतली.

 2. हेलिना‘ असे या क्षेपणास्त्राचे नाव असून ती रणगाडाविरोधी ‘नाग‘ या मार्गदर्शित क्षेपणास्त्रीची आधुनिक आवृत्तीआहे. 

 3. हेलिनाचा माऱ्याचा पल्ला हा सात ते आठ किलोमीटर इतका आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून त्याची चाचणी करण्यात आली.

 4. बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरमधील एकात्मिक चाचणी केंद्रातून दुपारी 12.55 वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली.

 5. अत्यंत सुरळीतपणे सुटलेल्या या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. यामुळे देशाची संरक्षणसिद्धता आणखी वाढली आहे.

 6. तसेच यापूर्वी हेलिनाची चाचणी जैसलमेर, पोखरण येथूनही करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या सामरिक सामर्थ्यांत मोलाची भर घालणारे ठरणार आहे.


GREEN CARD AMERICA

 1. ग्रीन कार्डबाबत प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा संपुष्टात आणण्याबाबतची विधेयके अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी आणि सिनेटमध्ये मांडण्यात आली आहेत. या विधेयकांचे कायद्यामध्ये रूपांतर झाल्यास अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी कायदेशीर वास्तव्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार आहे. 
 2. सिनेटमध्ये रिपब्लिकन नेते माइक ली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्या कमला हॅरिस यांनी फेअरनेस फॉर हाय-स्किल्ड इमिग्रण्ट्स अ‍ॅक्ट (एचआर 1044) विधेयक मांडले. त्यामुळे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाबाबत असलेली मर्यादा दूर होणार आहे.
 3. लोकप्रतिनिधी सभागृहात काँग्रेस नेते झो लॉफग्रेन आणि केन बक यांनी मांडले. हे विधेयक काँग्रेसने मंजूर केल्यास आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास एच1बी व्हिसा असलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांना लाभ होणार आहे.


DIN VISHESH

 1. स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.

 2. सन 1900 मध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

 3. महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी झाला होता.

 4. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1951 पासून सुरू झाली.


Top