'124th Constitution Rule Bill, 2019' approved in Loksabha

 1. लोकसभेत ‘124 वी घटनादुरुस्ती विधेयक-2019’ याला मंजुरी देण्यात आली आहे. सवर्णांना आरक्षण देण्यासाठी भारतीय घटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल केला जाणार आहे.
 2. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण व सरकारी नोकर्‍यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे सर्व धर्मातील आर्थिक मागासांना लाभ मिळणार.
 3. प्रस्तावित सवर्ण आरक्षणाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत -
  1. वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयांपेक्षा कमी असावे;
  2. 5 हेक्‍टरपेक्षा कमी शेती असावी;
  3. स्वमालकीचे घर असल्यास 1000 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचे असावे;
  4. महापालिका क्षेत्राच्या बाहेर भूखंड असल्यास 209 यार्डापेक्षा कमी क्षेत्रफळाचा असावा.
 4. घटनेतील तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाने जातीनिहाय आरक्षणासाठी 50 टक्क्यांची कमाल मर्यादा घालून दिली आहे.
 5. आरक्षणात संतुलन राखण्यासाठी तो आदेश होता. मात्र, खुल्या प्रवर्गाला 10% आरक्षण निव्वळ आर्थिक निकषावर दिले जाणार आहे.
 6. या विधेयकामुळे सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.


Launch of the second 'khelo India Youth Games' in Pune

 1. दि. 9 जानेवारी 2019 पासून महाराष्ट्र राज्यात पुणे शहरात ‘खेलो इंडिया’ या क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
 2. केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड तसेच राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन केले गेले.
 3. देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देणाऱ्या, 12 दिवस रंगणाऱ्या या क्रिडा महोत्सवात 36 राज्यांमधील 6000 खेळाडू सहभागी होणार आहेत.
 4. या क्रिडा महोत्सवात 18 क्रिडाप्रकारांचा समावेश आहे.
 5. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, हॉकी, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, कबड्डी,  खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल असे 18 खेळ आहेत.
 6. ‘खेलो इंडिया’-
 7. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली.
 8. समाजाच्या अगदी तळागळात बदल करून राष्ट्रव्यापी क्रिडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या काळात ‘खेलो इंडिया स्कूल गेम्स’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले.
 9. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
 10. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रिडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रिडा केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जाणार.
 11. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यासंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले गेले. शालेय खेळांमध्ये 16 क्रिडा प्रकारांचा समावेश केला गेला.


RBI announces new guidelines for tokens in various card transactions

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डसारख्या विविध कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामधील टोकन प्रणालीच्या संदर्भात (tokenisation) मार्गदर्शके प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
 2. टोकनायझेशन म्हणजे काय?
  1. देयके प्रणालीच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने असणारी ‘टोकनायझेशन’ प्रक्रिया म्हणजे कार्डचा मूळ तपशील वापरण्याच्या जागी प्रदान करण्यात येणारा एक विशिष्ट पर्यायी कोड, ज्याला आपण 'टोकन' म्हणतो.  
  2. या सुविधेमुळे कार्डचा मूळ तपशील गुप्त राहतो आणि त्याऐवजी दिले जाणारे टोकन ‘विक्री केंद्र (PoS), क्विक रिस्पोन्स (QR) कोड मार्फत देयके अश्या संपर्क-विरहित पद्धतीत कार्डमार्फत व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.
 3. नवी मार्गदर्शके -
  1. नियर फिल्ड कम्युनिकेशन (NFC), मॅगनेटिक सेक्युअर ट्रान्समिशन (MST) आधारित संपर्क-विरहित व्यवहार, अॅपद्वारे देयके भरणे, QR कोड-आधारित देयके भरणे किंवा क्लाउड, सेक्युअर एलिमेंट आणि ट्रस्टेड एक्झिक्युशन एनवायरनमेंट यांच्या समावेशासह टोकन स्टोरेज यंत्रणा यासारख्या सर्व माध्यमांमध्ये टोकन पद्धत-आधारित कार्डमार्फत व्यवहार करण्याची सुविधा देण्याची परवानगी दिली गेली आहे.
  2. सध्या ही सुविधा केवळ मोबाइल फोनद्वारे किंवा टॅब्लेटद्वारे दिली जाईल आणि पुढे अनुभवाच्या आधारावर इतर उपकरणांसाठी विस्तारली जाईल.
  3. टोकन देण्याची पद्धत आणि न देण्याची पद्धत केवळ अधिकृत कार्ड नेटवर्कद्वारे संचालित केली जाईल आणि मूळ प्राथमिक खाते क्रमांक (PAN) याची पुनर्प्राप्ती ही केवळ अधिकृत कार्ड नेटवर्कसाठीच व्यवहार्य आहे.


Geeta Gopinath: Chief economist in the IMF

 1. गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund -IMF) मुख्य अर्थतज्ञपदी रूजू झाल्या आहेत.
 2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होणार्‍या गीता गोपीनाथ या प्रथम भारतीय महिला ठरल्या आहेत.
 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद यापूर्वी रघुराम राजन यांनी बजावले असून हा मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
 4. मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपी गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या.
 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)-
  1. दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसह आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली.
  2. ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली.
  3. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत.
  4. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.
  5. देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते.
  6. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.


Top