1. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्यात येणार आहे.
 2. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 3. तसेच या तीन सदस्यीय समितीची बैठक झाली. या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.


 1. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Board of Direct Taxes -CBDT) यांच्याकडून एक नवी 'सेफ हार्बर व्यवस्था' अधिसूचित करण्यात आली आहे.
 2. सेफ हार्बर व्यवस्था ही हस्तांतरणादरम्यानच्या किंमतीसंदर्भात असलेल्या विवादांमध्ये कमतरता आणणे, करदातांना निश्चितता उपलब्ध करणे, सेफ हार्बर मार्जिनला औद्योगिक मानकांच्या अनुरूप करणे आणि सेफ हार्बर ट्रांजॅक्शनला व्यापक करण्यासाठीच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
 3. नवी व्यवस्था 1 एप्रिल 2017 रोजी म्हणजेच कर निर्धारण वर्ष 2017-18 च्या आरंभी प्रभावी करण्यात आली आहे, जी पुढील दोन वर्षासाठी म्हणजेच कर निर्धारण वर्ष 2019-2020 पर्यंत प्रभावी राहणार.
 4. कर निर्धारण वर्ष 2017-18 पर्यंतच्या उपस्थित हार्बर व्यवस्थेअंतर्गत पात्र करदातांना सर्वाधिक फायदेशिर पर्याय निवडण्याचा अधिकार असणार.
 5. ट्रांजॅक्शनची एक नवी श्रेणी ‘रिसीट ऑफ लो वॅल्यू-अॅडिंग इंट्रा ग्रुप सर्विसेज’ ला सुरू करण्यात आले आहे.
 6. सॉफ्टवेयर विकास क्षेत्रातील सेवा, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग सेवा, सॉफ्टवेयर विकास क्षेत्राशी तसेच जेनेरिक औषधांशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवा यांच्या बाबतीत नवी सेफ हार्बर व्यवस्था 200 कोटी रुपयांपर्यंत ट्रांजॅक्शनसाठी उपलब्ध आहे.
 7. सॉफ्टवेयर विकास क्षेत्रातील सेवा व माहिती तंत्रज्ञान आधारित सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात सेफ हार्बर मार्जिन दर आधीच्या व्यवस्थेमध्ये 22% ने कमी करून 18% इतक्या कमाल स्तरावर आणली गेली आहे.
 8. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात 24%, 21%, आणि 18% या तीन विभिन्न दरांची एक श्रेणीबद्ध संरचना तयार करण्यात आली आहे, ज्याला आधीच्या व्यवस्थेच्या 25% इतक्या एकल दराच्या जागेवर आणले गेले आहे.
 9. सॉफ्टवेयर विकास क्षेत्राशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवा आणि जेनेरिक औषधांशी जोडलेल्या पूर्णत: वा आंशिक करारबद्ध संशोधन व विकास सेवांशी जोडलेल्या ट्रांजॅक्शन संदर्भात सेफ हार्बर मार्जिनला आधीच्या व्यवस्थेच्या अनुक्रमे 30% व 29% वरून कमी करून 24% इतके केले गेले आहे.


 1. चीनची राजधानी बीजिंगमध्ये BRICS (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या प्रथम ‘मीडिया फोरम’ बैठकीला 8 जून 2017 रोजी सुरुवात करण्यात आली.
 2. जागतिक अस्थिर अर्थव्यवस्थेमुळे BRICS देशांच्या आर्थिक-व्यापारी-राजकीय संबंधांवर गैरसमज दूर करून व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आला आहे.
 3. या बैठकीत 27 वृत्तसंस्था, दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे आणि BRICS देशांतील इतर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Top

Whoops, looks like something went wrong.