Rural sanitation coverage crosses the 85% mark :Swachh Bharat Mission

 1. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील गावांचा चेहरामोहरा बदलतो आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वच्छतेचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
 2. गावातल्या समुदायांनी एकत्र येऊन आतापर्यंत 7.4 कोटी शौचालये बांधली आहेत. तसेच 3.8 लाख गावे आणि 391 जिल्हे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.
 3. या अभियानाअंतर्गत सर्व गावांमध्ये अत्यंत वेगाने काम सुरू आहे. एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 6 हजार गावांमधील 90 हजार घरांमध्ये आता शौचालये वापरली जातील. प्रमाण 93.4 टक्के आहे.
 4. हागणदारीमुक्त आणि शौचालय बांधणी अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करणारे स्वच्छ भारत अभियान देशातले पहिलेच अभियान आहे.
 5. या दोन्ही उद्दिष्टांमुळे ग्रामीण जनतेत तळागाळापर्यंत स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली आहे आणि हे अभियान खऱ्या अर्थाने जन चळवळ झाली आहे.


tripura has declared queen pineapple as a state fruit

 1. त्रिपुरा राज्य शासनाकडून अननसाचे "राणी" हे वाण राज्याचे राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 2. ही अधिकृत घोषणा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केली. त्रिपुरा राज्याचे अननस फळाचे "राणी" हे वाण जगप्रसिद्ध आहे.
 3. आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षी ‘रामाचिलका’ आणि राज्य फूल ‘अदावी उथातीत्ती’ :
 4. गुलाबी रंगाचा मानेवर पट्टा असलेला पोपट, ज्याला रोज-रिंग पॅराकीट (किंवा सित्ताकुला क्रामेरी किंवा तेलुगूमध्ये ‘रामाचिलका’) म्हणून ओळखतात, याला आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षीम्हणून घोषित करण्यात आले आहे.
 5. शिवाय, स्थानिक पातळीवर 'अदावी उथातीत्ती' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलाला राज्य फूल म्हणून घोषित करण्यात आले आहे.


parliament award

 1. प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारासाठी सात खासदारांची निवड करण्यात आली असून, यामधील पाच खासदार महाराष्ट्राचे आहेत.
 2. या सर्व खासदारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चेन्नईत हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
 3. महाराष्ट्रातील ज्या पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे.
 4. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे.
 5. खासदारांची हजेरी, चर्चेमधील सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं यांच्या आधारे ही निवड केली जाते.
 6. सुप्रिया सुळे यांनी एकूण 74 चर्चांमध्ये सहभाग घेतला असून 16 खासगी विधेयकं सादर केली आहेत.
 7. तसंच त्यांनी 983 प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उपस्थिती एकूण 98 टक्के आहे.
 8. याशिवाय श्रीरंग बारणे यांनी 102 चर्चांमध्ये सहभाग घेतला, तर 16 खासगी विधेयकं सादर केली.
 9. त्यांनी 932 प्रश्न उपस्थित केले. त्यांची एकूण हजेरी 94 टक्के आहे.
 10. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना सलग चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला.


Indian football team nominated for asian games

 1. एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघ पात्र ठरला आहे
 2. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने फुटबॉल संघाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यासोबतच हॅण्डबॉल संघही पात्र ठरला आहे.
 3. फुटबॉल आणि हॅण्डबॉल दोन्ही संघ अत्यंत चांगली प्रगती करत असून त्यांना संधी मिळाली पाहिजे असं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं आहे.
 4. ‘फुटबॉल संघ प्रगती करत आहे. फुटबॉल संघ सध्या 16 व्या क्रमांकावर असून चांगली कामगिरी करत तो 10 व्या क्रमांकावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुरुष संघाला पात्र ठरवण्यात आले आहे’, असंही ते म्हणाले आहेत.
 5. हॅण्डबॉल संघाबाबात बोलताना, ते सध्या 12 व्या क्रमांकावर असून अजून चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितले.
 6. जिम्नॅस्टिक संघाची निवड करण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने पाच सदस्यीय निवड समिती गठीत केली आहे.
 7. याशिवाय घोडेस्वारी संघाला न पाठण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडीवरुन झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 8. तसेच जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने निवड समितीची पाच नावांची शिफारस केली असून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ती मान्य केली आहेत.


Italy's new prime minister Giuseppe Conte

 1. जुजेपी कोंटे यांनी 8 जून रोजी इटलीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
 2. आघाडी सरकारचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोंटे हे पतंप्रधानपदी विराजमान झाले असून आजच्या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.
 3. नवे सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत.
 4. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे. त्यामुळे ते सरकारचा गाडा कसा हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Indian scientist found new satellite

 1. अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर आहे.
 2. संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 27 पट असून, ग्रहाची त्रिज्या आहे पृथ्वीच्या सहापट. हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे, असे संशोधकांचे मत पीआरएलच्या संकेतस्थळावरील माहितीत नमूद करण्यात आले आहे.
 3. माऊंट अबूच्या गुरुशिखर येथील 1.2 मी दुर्बिण व भारतीय बनावटीच्या पीआरएल अ‍ॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी ऑल स्काय सर्च (पारस) या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे.
 4. तसेच या शोधामुळे काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक 211945201 किंवा के 2-236 असे ठेवले आहे. या ग्रहाचे तापमान खूपच अधिक म्हणजे 600 अंश सेल्सियस आहे. त्याच्यावर जीवसृष्टी असणे शक्यच नाही.


Top