भगवान गौतमबुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी झाली. यासाठी विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून येथे १७ बौद्ध देशांचे राजदूत हजेरी लावणार आहेत.

यानिमित्त काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी विश्व शांतता रॅली काढण्यात येईल. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्‌घाटन करणार आहेत.

सायंकाळी श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरिसेना तसेच थायलंडचे उच्चायुक्त एकापोल पोलपिपट भारतासोबतचे सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासंबंधीचे विचार मांडणार आहेत.


कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष घटनापीठाने आज (मंगळवार) कर्नन यांना शिक्षा सुनावली.

या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कर्नन यांना सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच कर्नन यांचे विधान किंवा त्यांनी काढलेले "आदेश" प्रसिद्ध करण्यास प्रसारमाध्यमांनाही बंदी केली आहे.


भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे. सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. ते नवीन पदाची सूत्रे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला घेणार आहेत. अब्दुल बासित यांचा भारतातील तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.